कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. (तीताला पत्र २:११)
स्वर्गाकडून येथे विशेष पुरवठा आहे जे प्रत्येक मनुष्यास समान हक्क देते की देवाच्या राजासनाजवळ यावे व ख्रिस्तामध्ये जडून असलेल्या अमर्याद शक्यतेचा आनंद घ्यावा. प्रत्येक मनुष्याला दैवी चलन हे देण्यात आले आहे ज्याचे मूल्य किंवा किंमत कमी होण्याकडे प्रवृत्ति नसते. देवाची कृपा ही जितक्यानी त्यास प्राप्त केले तितक्यांसाठी उपलब्ध आहे. ते व्यक्तींमध्ये भेदभाव किंवा प्रतिष्ठितांचा पक्षपात करणारे नाही. ते एकापेक्षा दुसऱ्यांवर अधिक कृपा करीत नाही किंवा एकास दुसऱ्यापेक्षा कमी लेखत नाही. देवाची कृपा ही सर्वांमध्ये कार्य करण्यास सिद्ध आहे.
तुमच्या जीवनात एका क्षणी किंवा दुसऱ्या क्षणी, तुम्ही ह्या कृपेचा भाग हा प्राप्त केला आहे, ह्या कृपेच्या बाह्य कार्याचा आनंद घेतला आहे, आणि त्याच्या एखादया लाभा सह संगती केली असेन. देवाच्या कृपेचा एक लाभ हा सर्वांसाठी पुन्हा प्राप्ती आहे. ते आपल्याला त्याच्याबरोबर समेट मध्ये आणते व परमेश्वर जो पिता व पुत्रा सह आपल्याला आपल्या मूळ अवस्थेमध्ये पुनर्स्थापित करते.
येशूचा उद्धार तुम्ही प्राप्त करण्यापूर्वी, तुम्ही त्याच्या कृपेची वाढ ही देवाच्या वचनाद्वारे प्राप्त केली आहे. हे कदाचित त्यावेळी स्पष्ट असे नसेल ज्या कृपेचा अपार आनंद घेतला असेन परंतु तुम्ही तो घेतला. पवित्र शास्त्र प्रगट करते की ह्या कृपेने सर्व मनुष्यांची भेट घेतली आहे व त्यांना तारण किंवा विनाश ची निवड ही दिली आहे. (तीताला पत्र २:११)
जितके अधिक परमेश्वराची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे, तो ती निवड आपण स्वतः करण्यासाठी आपल्याला मोकळे सोडतो. म्हणजे तो स्वतःमध्येच कृपेचा एक प्रकार आहे. आपले जीवन एक विश्वासणारे असे हे कृपे द्वारे बनविले जाते. काही हा वाद करतील की हे विश्वासाचे जीवन आहे, परंतु याची पर्वा न करता, विश्वास जो आपण आचरणात आणतो तो देवाच्या कृपे द्वारे निर्माण होतो.
कृपे द्वारे, राजासनाजवळ सर्वाना प्रवेश मिळवून दिला आहे ज्यांनी तारणाचे दान प्राप्त केले आहे. यामध्ये काहीही चूक करू नका. देवाची कृपा ही पापा मध्ये कायम राहण्यास बहाणा नाही परंतु देवाला प्रसन्न करीत एक धार्मिक जीवन जगण्यास लाभदायक आहे. आपल्या सामर्थ्याद्वारे शरीराच्या मर्यादेबाहेर जगण्यासाठी परमेश्वर आमची असमर्थता समजतो म्हणून त्याने तंत्रज्ञान हे निर्माण केले ज्याद्वारे मनुष्य हा मर्यादेबाहेर जाऊ शकतो, कृपेच्या अक्षय लाभाच्या केवळ सामर्थ्याद्वारे. कैश ची काही मर्यादा नसलेल्या क्रेडीट कार्ड प्रमाणे हे आहे.
बायबल आपल्याला सांगते की धैर्याने यावे व कृपा मागावी कारण ती सर्वांसाठी उपलब्ध व प्राप्त करण्यायोगे अशी केली आहे. इब्री ४:१६ आपल्याला सांगते की, "तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ."
देवाची कृपा, जरी सर्वांसाठी उपलब्ध केलेली आहे, ती काढून घेतली जाऊ शकते जर तीचा योग्य उपयोग केला नाही किंवा तिला स्वीकारले नाही. देवाच्या लेकरा, कृपा ही सर्व परिस्थितीमध्ये तुझ्यासाठी सदैव उपलब्ध व पुरेशी आहे. हे कदाचित नेहमीच असे दिसणार नाही जेव्हा तुम्ही त्याची इच्छा करता, परंतु तरीही ती येतेच. ह्या अमर्याद अर्थव्यवस्थेचा हिस्सा होण्याचे आजच निवडा व तुमच्या जगाला आशीर्वाद व्हा.
प्रार्थना
पित्या, माझ्या जीवनावर तुझी कृपा ही नेहमीच प्रगट आहे, जरी जेव्हा तीचा स्वीकार करण्यास मी नकार करतो. परमेश्वरा, कृपेच्या ह्या अर्थव्यवस्थेच्या दैवी पुरवठ्यासाठी, तुझा धन्यवाद होवो. मला साहाय्य कर की तीचा गैरवापर करू नये किंवा माझ्या जीवनात त्याच्या कार्यास निराश करू नये. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चिकाटीची शक्ती● जीवनाच्या चेतावणीचे पालन करणे
● दिवस १५ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा
● वारा जो डोंगराला देखील सरकवतो
● एक घुंगरू व एक डाळिंब
● याची प्रत्यक्ष पर्वा आहे काय?
टिप्पण्या