उत्पत्ति ही सर्व प्रारंभाचीसुरुवात आहे. जर तुम्हाला विवाह, संपत्तिहे समजावयाचे आहे, तर तुम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकाकडे जाण्याची गरज आहे. जर तुम्हाला प्रकटीकरणाचे पुस्तक समजावयाचे आहे तर तुम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकाकडे जाण्याची गरज आहे. जर तुम्ही उत्पत्ति समजली नाही तर तुम्ही जीवनच समजणार नाही.
प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. (उत्पत्ति १:१-३)
कदाचित तुमचे जीवन, तुमचा व्यवसाय, तुमची कारकीर्द ही आकारविरहित व शून्य असेन. सर्व काही जे तुम्ही पाहत आहात तो केवळ अंधकार आणि आशा नाही. सैतान हा खोटारडा आहे. तो तुम्हाला म्हणतो की देवाने तुमचा त्याग केला आहे आणि तुमच्या जीवनात काहीही चांगले घडणार नाही. परंतु लक्षात घ्या, देवाचा आत्मा कशावर तरी तळपत होता, जेआकारविरहित व शून्य होते. परमेश्वर हा सदा उपस्थित परमेश्वर आहे. तो तुम्हाला असेच सोडून देणार नाही.
परंतु तो अंधकार तुम्हाला सोडणार नाही जोपर्यंत काहीगोष्टी तुम्ही जीवनात कार्यरत करणार नाही. चला मला स्पष्ट करू दया.
केवळ या कारणासाठी नाही की देवाचा आत्मा कशावर तरी तळपत होता जे अंधकारमय व आकारविरहित होते ते काहीही बदलले नाही. प्रत्यक्षात काहीही घडले नाही जोपर्यंत देवाचे वचन हे बोलले गेले नाही.तेव्हा देव बोलला, प्रकाश होवो.
देवाचे वचन हे बोलले गेले पाहिजे याअगोदर की जीवन हे प्रगट व्हावे. तोच सिद्धांत तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागाला लागू आहे जेथे तुम्हाला पाहिजे की देवाने प्रगट व्हावे. चला असे म्हणू या तुम्ही नोकरी, आध्यात्मिक वाढ, इत्यादी साठी प्रार्थना करीत आहात. ह्या भागाशी संबंधित वचन कबूल करा. (तुम्ही नोहा ऐप वर दररोजची पापकबुली वर क्लिक करू शकता व तुमच्या गरजे नुसार वचन कबूल करू शकता.) तुमचे तोंड उघडा व त्या परिस्थितीवर अधिकाराने बोला केवळ तेव्हाच तुमच्या जीवनात व्यवस्था ही होईल.
जितके कमी आपण समजतो की परमेश्वर कसे कार्य करतो आपण आपल्या ख्रिस्ती जीवनात तितकेच निराश असे होतो.
मग आपण शेवटी देवाला दोष देतो, चर्च बरोबर निराश होतो, आणि कोणी चर्च सुद्धा सोडून देतात.
अंगीकार
१. मी सतत मार्गदर्शन बाळगून राहतो कारण मी कबूल करतो, "परमेश्वर सतत मला मार्गदर्शन करेल" (यशया ५८:११).
२. मी देवाची शांति बाळगून राहतो, कारणमी कबूल करतो, "देवाचीशांति, जी सर्व समजेच्यापलीकडेआहे, ती माझे हृदय व मन ख्रिस्त येशूच्या ठायी राखील" (फिलिप्पै ४:७).
३. मी भयापासून मुक्तता बाळगून आहे कारण मी कबूल करतो, "मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो" (यशया ४१:१३).
२. मी देवाची शांति बाळगून राहतो, कारणमी कबूल करतो, "देवाचीशांति, जी सर्व समजेच्यापलीकडेआहे, ती माझे हृदय व मन ख्रिस्त येशूच्या ठायी राखील" (फिलिप्पै ४:७).
३. मी भयापासून मुक्तता बाळगून आहे कारण मी कबूल करतो, "मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो" (यशया ४१:१३).
Join our WhatsApp Channel
Most Read
● अभिषेक आल्या नंतर काय होते● दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● नवीनजीव
● काही अतिरिक्त भार घेऊ नये
● २१ दिवस उपवासः दिवस १६
● महाकाय लोकांचे वंशज
● अत्यंत वाढणारा विश्वास
टिप्पण्या