बायबल आपल्याला याची जाणीव करून देते की ख्रिस्त हा प्रभु आहे असा विश्वास ठेवून व कबूल करण्याद्वारे आपले तारण झाले आहे, देवापासून आपला जन्म झाला आहे (१ योहान ५:१).
ते, त्यामुळे, याचा अर्थ आपल्यामध्ये देवाचा स्वभाव आहे. आणि देवापासून जन्म झाल्याच्या सद्गुणामुळे, आपल्यामध्ये देवाच्या प्रकारची प्रीति आहे. त्यामुळे, देवाच्या लेकरांस हे स्वाभाविकच आहे की प्रीति करावी, जसे कुत्र्याला भुंकणे हे स्वाभाविक आहे. तुम्हाला मुद्दा कळला ना!
"....पवित्र आत्म्या जो आपल्या दिला होता त्याद्वारे आपल्यामध्ये देवाची प्रीति ही ओतली गेली आहे" (रोम ५:५). ही जगाच्या प्रकारची प्रीति नाही; ही देवाच्या प्रकारची प्रीति आहे. २ तीमथ्यी १:७ मध्ये बायबल स्पष्टपणे सांगते की, "ज्या प्रकाराचा आत्मा हा आपल्याला दिला गेला आहे तो प्रीतीचा आत्मा आहे.
त्यामुळे आपण केवळ मानवी-सत्व नाहीत; आपण प्रीति-सत्व आहोत. प्रीति हा आपला स्वभाव आहे. तो आपला "नियमित मार्ग" आहे. म्हणून आपण इतर लोकांवर कृतीत प्रीति करतो, जर आपण केवळ आपल्या ह्या स्वभावास व्यक्त केले. होय, जीवनात, येथे अनेक परिस्थिती येतात, जेथे हे इतके सोपे नाही की लोकांवर प्रीति करावी. लोक आपल्याला इतके दु:खावितात की ते आपल्या हृदयामध्ये खोलवर घात करून जाते. तथापि, सर्वांमध्ये, परमेश्वर प्रीति करण्यास आपल्याला साहाय्य करण्यास समर्थ आहे, मग काहीही होवो. त्यामुळेच त्याने आपल्याला त्याचा स्वभाव दिला आहे, आपल्याला प्रीति करण्यास समर्थ करतो जे आपण केले पाहिजे.
तुम्ही पाहा, एका कुत्र्याच्या पिल्ला ला भुंकण्याची जन्मजात सवय आहे जसे एक मोठा कुत्रा करतो, पिल्ला चा जन्म झाल्याबरोबर त्याने भुंकावे याची आपण अपेक्षा करीत नाही. तथापि, जेव्हा पिल्लू मोठे होऊ लागते, तो ती समर्थता उघड करू लागतो. त्याच मनप्रवृत्ति मध्ये, जेव्हा आपल्यामध्ये देवाच्या प्रकारची प्रीति आहे, आपल्याला त्यास व्यक्त करण्याची गरज आहे. जेव्हा आपण जास्त मोठे होतो व देवाबरोबर अधिक घनिष्ठतेत चालतो, आपण त्यामध्ये अधिक उत्तम होत जाऊ.
हे पुरेसे नाही की आपल्यामध्ये देवाच्या प्रकारची प्रीति हीच केवळ राहावी; ती आपल्यावर जबाबदारी आहे की त्यास व्यक्त करावे आणि त्याद्वारे आपल्या जीवनाद्वारे देवाचे गौरव व्हावे. मी तुम्हाला प्रोत्साहन देतो, कृपा करून हे लक्षात ठेवा की तुमच्या मधील देवाच्या प्रकारच्या प्रीतीने व्यक्त व्हावे. जेव्हा तुम्ही तुमची देवाच्या प्रकारची प्रीति व्यक्त करता तेव्हा इतर आशीर्वादित व्हावेत. तुम्ही त्यामध्ये अचानकपणे सिद्ध असे होणार नाही परंतु लक्षात ठेवा, "हजारो मैलाचा प्रवास, हा एक पाऊल उचलण्याने सुरु होतो". आज तुम्ही जेथे आहात तेथून सुरुवात करा, आणि परमेश्वर तुम्हाला साहाय्य करेल.
"तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहां" (योहान १३:३५). जेथे कोठे तुम्ही जाल तेथे तुमचे जीवन काय प्रभाव आणेल याचा विचार करा.
प्रार्थना
पित्या, मी तुझा धन्यवाद करतो की मी तुझ्यापासून जन्मलो आहे. मी तुझी प्रशंसा करतो कारण तूं मला तुझ्या प्रीतीचा स्वभाव दिला आहे. मी प्रार्थना करतो की माझ्यामधील ह्या देवाच्या प्रकारच्या प्रीतीला अधिक व्यक्त करण्यास समर्थ व्हावे. मी इतरांवर जशी प्रीति केली पाहिजे तशी करण्यास मला साहाय्य कर, ते अशाप्रकारे की माझ्याद्वारे तुझ्या नांवाचे अधिक गौरव व्हावे. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वर अंत:करण शोधतो● गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही
● भीतीचा आत्मा
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी सामर्थ्य मिळवा
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● लोक बहाणे करण्यासाठी कारणे देतात -भाग 2
टिप्पण्या