डेली मन्ना
देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
Monday, 15th of July 2024
25
21
525
Categories :
आज्ञाधारकपणा
असे का आहे की मानवी स्वभावाला सरळ चेतावणी ऐकण्यात इतका त्रास का होतो? प्रकरणाचा मुद्दा: तुम्ही एका लहान मुलाला सांगा, " इस्त्री ला स्पर्श करू नको", ती गरम आहे. अंदाज करा, जेव्हा तुम्ही मुला कडे पाहत नाहीत तेव्हा लहान मुलगा ज्यास तुम्ही त्या गरम इस्री ला स्पर्श करू नका असे म्हटले होते तो त्यास स्पर्श करेल किंवा करण्याचा प्रयत्न करेल. हा त्रास की चेतावणी कडे दुर्लक्ष करणे हे केवळ लेकारांपुरतेच मर्यादित नाही, तर ते सर्वांमध्ये असते.
तुम्ही लोकांना पाहिले आहे काय जेव्हा ते लावलेले एखादे चिन्ह पाहतात, जे म्हणते, "स्पर्श करू नका, रंग ओला आहे?" अनेक जण हे प्रत्यक्षात त्यास स्पर्श करतील, हे पाहण्यास की रंग हा खरेच ओला आहे काय. मुद्दा जो मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तो हा आहे: चेतावणी कडे लक्ष न दिल्याने तुमचे जीवन गोंधळात पडू शकते. आपणांस चेतावणी कडे दुर्लक्ष करण्याची वृत्ति असते, आणि आपण चेतावणीला फारच औपचारिकपणे घेतो.
मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढविण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घेण्यास लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे. राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे; तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये. (अनुवाद १७:१६-१७)
परमेश्वराकडे राजांसाठी विशेष चेतावणी होती, जे त्याच्या लोकांवर राज्य करणार होते. देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करून शलमोन ने, "अनेक परराष्ट्रीय स्त्रियांवर प्रेम केले". देवाच्या आदेशा विरोधात त्याने त्यांची मोहकता व सुंदरतेने स्वतःला प्रभावित करू दिले. त्यांनी मग शलमोन ला प्रभावित केले की उच्च स्थाने बनवावी व मूर्तींची उपासना करावी. शलमोनाच्या पत्नी, "त्यांच्या दैवतांपुढे धूप दाखवीत व अर्पणे सादर करीत" (१ राजे ११:१-८)
परमेश्वराने याची सुद्धा चेतावणी दिली होती की इस्राएलच्या राजांनी, "त्यांच्यासाठी पुष्कळ घोडदळ वाढवू नये." तरीसुद्धा, "शलमोन जवळ रथांच्या घोड्यांची ४०००० ठाणी व १२००० स्वार होते. आणि, देवाच्या चेतावणीच्या उल्लंघनात शलमोन ने ह्यापैकी अनेक घोडे (तसेच रथ) मिसर मधून मागविले होते. (१ राजे ४:२६-२९)
मला खातरी आहे की इतिहास हा वेगळा लिहिला गेला असता जर शलमोन ने देवाची आज्ञा मानली व पाळली असती. परमेश्वराची चेतावणी ही केवळ चांगला सल्ला नाही, ती त्याची आज्ञा आहे की पाळावी, ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात अनेक समस्यांना टाळू शकतो.
प्रार्थना
पित्या, मला साहाय्य कर की माझ्या जीवनात तुझ्या वचनास पाया असे करावे. तुझ्या वचनाशी संवेदनशील राहावे यासाठी मी तुला विनंती करीत आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वरा, मला अडथळ्यापासून सोडीव● पवित्र आत्म्या विरुद्ध निंदा म्हणजे काय आहे?
● सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी
● विश्वासाद्वारे कृपा प्राप्त करणे
● प्रीति-जिंकण्याची योजना -१
● पैसे कशा साठी नाही
● नीतिमान रागास स्वीकारणे
टिप्पण्या