डेली मन्ना
प्रभावीपणे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे
Friday, 9th of August 2024
26
21
372
Categories :
वेळेचे व्यवस्थापन
वेळेचा[प्रत्येक संधीस प्राप्त करा]सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. (इफिस 5:16)
"जर मला अधिक वेळ असता!" ही अनेक यशस्वी लोकांची ओरड आहे. आपणां सर्वांना इतके व्यस्त आहोत असे वाटते आणि आपल्या सर्वकाहीकरण्याच्या-गोष्टींमुळे आपण सरळपणेओझ्याखाली राहतो. कधीकधी हे फारच त्रासदायक होते. माझी खात्री आहे यातून तुम्ही जात असाल?
विश्वा मध्ये वेळ ही सर्वात अमुल्य स्त्रोत आहे. देवाने पापी आणि संत या दोघाव्यक्तीला ते दिले आहे-24 तास.
आज व्यस्त-राहणे हे सामान्य झाले आहे. तथापि, व्यस्त राहणे नेहमीच यशस्वी होत आहे यासमान नाही. आपल्याला हे खरेच लक्षात ठेवण्याची गरज आहे.
ख्रिस्ती म्हणून, वेळेचा सदुपयोग करणे हे महत्वाचे आहे कारण देवाने आपल्याला बोलाविले आहे की जे सर्वकाही त्याने आपल्याला सोपविले आहे त्याचे योग्य असे सेवक व्हावे. काही लोक असा विचार करतात की वेळेचे व्यवस्थापन करणे म्हणजे तुमचे कार्यक्रम हे जितके शक्य होईल तितके भरगच्च असे करणे. हा विचार चुकीचा आहे.
प्रथम, नेहमीच, एक कार्यक्रम पद्धत वापरा, तुमच्या भेटी ची योजना करण्यासाठी कॅलेंडर ठेवा. जरी तुम्ही घरकाम करणारे किंवा विद्यार्थी असाल. हे तुम्हाला साहाय्य करेल की तुमच्यावेळेचे योग्यपणे आणि प्रभावीपणे व्यवस्थापन करावे.
दुसरे, कशाचाही होकार, कोणाला भेटणे वगैरे याचे वचन देण्याअगोदर, मी नेहमीच विचार करतो, काय हे देवाच्या दृष्टीत महत्वाचे आहे? कायहे देवाच्या गौरवाकरिता फळ देईल? प्रभू येशूने प्राथमिकतेचा महत्वाचा सिद्धांत आपल्याला दिला आहे.
"पहिल्या प्रथम तुम्ही स्वर्गाचे राज्य मिळविण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांस प्राप्त होतील" (मत्तय 6:33). नेहमीच तुमच्या प्राथमिकतेला वेळ दया. तुमचे मन महत्वाच्या उद्धेशाकडे केंद्रित करा.
तिसरे, वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे याचा अर्थ तुम्ही प्रत्येकाला 'हो' म्हणू शकत नाही. वेळेच्या व्यवस्थापनात काही गोष्टींना नाही म्हणणे सामाविलेले आहे. येथे अनेक लोक आहेत जे प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात आणि मग त्यांचे जीवन सतत व्यस्त राहून बेजार आणि निराशअसे करून टाकले आहे.
शेवटी, मी नेहमीच प्रार्थना करतो की प्रभूने मला समज व ज्ञान दयावे की माझ्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करावे. उदाहरणार्थ: जेव्हाकेव्हा मला संदेश देण्याचे आमंत्रण येते, मी ताबडतोब 'हो' म्हणत नाही. मी ते प्रार्थने मध्ये प्रभू कडे नेतो. मी प्रतिदिवशी सुद्धा प्रार्थना करतो की प्रभूने मला निष्फळ कार्यापासून राखावे. तुम्ही सुद्धा प्रार्थनेचे हे मुद्दे तुमच्या प्रार्थने मध्ये टाकावे.
आणखी, महत्वाचीसुचनाकी वेळेचे योग्य व्यवस्थापन करावे जे मी वापरतोते हे की, मी मदतीसाठी विनंती करतो. मी नेहमी घरातील कार्यात मदतीसाठीमाझी पत्नी आणि मुले यांची मदत ही यादीत ठेवतो.जेव्हा गरज आहे तेव्हा मदत मागण्यासाठी तुमचे कुटुंब आणि मित्रांना विनंती करण्यात लाजू नका.
आपल्या वेळेचे व्यवस्थापन करण्याद्वारे, आपणअधिक प्रगत होऊ शकतो-आणिभार कमी होतो, आपले पाचारण पूर्ण करण्यास अधिक समर्थ होतो जे देवाला गौरव आणेल.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी मला ज्ञान, समज आणि पारख दे.
पित्या, येशूच्या नांवात, निष्फळ कार्यापासून मला राख. तुझ्या गौरवाकरिता मला फळ निर्माण करण्यास साहाय्य कर. आमेन.
पित्या, येशूच्या नांवात, निष्फळ कार्यापासून मला राख. तुझ्या गौरवाकरिता मला फळ निर्माण करण्यास साहाय्य कर. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१● परमेश्वर पुरवठा करेल
● चिकाटीची शक्ती
● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
● दु:खा पासून कृपे कडे जाणे
● बीज चे सामर्थ्य-१
● तुमच्या समस्या व तुमचा दृष्टीकोन
टिप्पण्या