मला शिक्षकांसाठी मोठा आदर आहे आणि प्रत्येक दिवशी ते सामोरे जाणाऱ्या आव्हानांना समजतो. माझ्या जीवनात एकेकाळी शाळेच्या शिक्षक होतो आणि तरुण लेकरांना आदर्श लावण्यात आवश्यक असलेले समर्पण आणि संयम पहिल्या प्रथम समजतो. शिकवणे हे केवळ व्यवसाय नाही, ते एक पाचारण आहे जे करूणा आणि प्रीती आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या प्रगतीसाठी अटळ कटिबद्धतेची मागणी करते.
प्रथम शिक्षक म्हणून आई-वडिलांची भूमिका
जरी औपचारिक शिक्षण हे महत्वाचे असले तरी, आईवडील त्यांच्या मुलांना आधारभूत कौशल्ये आणि शिष्टाचार शिकवण्यात मुलभूत भूमिका बजावतात. शिक्षक म्हणून त्यांना नेहमी दुर्लक्षिले जाते, परंतु मुलांच्या विकासावर त्यांचा प्रभाव हा गहन असतो. ज्या क्षणापासून बाळाचा जन्म होतो, तेव्हापासून आईवडील हे त्याचे प्रथम शिक्षक असतात, त्यांना आयुष्याच्या प्रारंभीच्या टप्प्यापासून मार्गदर्शन करीत असतात.
नीतिसूत्रे २२:६ मध्ये देवाचे वचन आईवडिलांच्या शिकवणीच्या महत्वावर भर देते, “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” हे वचन आपल्याला स्मरण देते की आपले आईवडील टिकणारा प्रभाव निर्माण करतात, त्यांच्या मुलांचे चरित्र आणि भविष्याला वळण देत असतात.
शिक्षक म्हणून पवित्र आत्मा
पृथ्वीवरील शिक्षकांपेक्षा, आपण दैवी शिक्षक, पवित्र आत्म्याला मानले पाहिजे. योहान १४:२६मध्ये, येशूने म्हटले, “तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.” पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्या मानवी क्षमतेपलीकडील शहाणपण आणि समज प्रदान करतो. ही दैवी शिकवण आपल्याला जीवनाच्या जटीलतेतून जाण्यासाठी चालण्यासाठी साहाय्य करते, जे आध्यात्मिक समज आणि स्पष्टता प्रदान करते.
शिक्षकांचा त्याग
शिक्षक हे कर्तव्याच्याही पलीकडे जातात, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या लाभासाठी वेळ आणि शक्तीचा त्याग करतात. ते केवळ शिक्षक नाहीत, परंतु सुधारक, सल्लागार आणि आदर्श असे आहेत. शिक्षक त्यांच्या भविष्यात निवेश करतात, धड्यांची तयारी करणे, गृहपाठांवर गुण देणे आणि अतिरिक्त साहाय्य देण्यासाठी नेहमी अधिक कार्य करत असतात.
१ करिंथ. १५:५८मध्ये, आपल्याला अशा समर्पणाच्या मुल्याबद्दल स्मरण करून दिले आहे, “म्हणून, माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.” जर तुम्ही एक शिक्षक आहात तर मला तुम्हांला प्रोत्साहन द्यायचे आहे आणि तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे मला तुम्हांला सांगायचे आहे; तुम्ही उत्तम भविष्यासाठी पाया निर्माण करत आहात.
आपल्या जीवनात शिक्षक
माझ्या स्वतःच्या अनुभवांवर चिंतन करत, ज्या शिक्षकांनी माझ्या जीवनावर प्रभाव टाकला आहे त्यांच्यासाठी मी कृतज्ञ आहे. त्यांनी माझ्या जीवनात शिकण्याच्या प्रीतीची आवड निर्माण केली आणि माझ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले आहे. विशेषेकरून, रविवार शब्बाथ शाळेच्या माझ्या शिक्षकांनी, माझ्यावर कायमचा प्रभाव टाकलेला आहे. त्यांनी मला प्रीती, आदर आणि विश्वासाबद्दल अशा प्रकारे शिकवले आहे जे व्यस्त ठेवणारे आणि सहज प्राप्त करता येणारे आहे. मत्तय १९:१४ आपल्याला अशा शिकवणींच्या महत्वाबद्दल स्मरण करून देते, “येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
आज ह्या शिक्षकदिनाच्या दिवशी, मी माझ्या सर्व शिक्षकांचा आदर आणि उत्सव करतो. तुमचे योगदान जगाच्या दृष्टीआड गेलेले असू शकते, परंतु ते देवाच्या दृष्टीसमोर चुकलेले नाही. तुमच्या अटळ समर्पणासाठी मी प्रामाणिकपणे माझी कृतज्ञता आणि प्रशंसा व्यक्त करतो .
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, शिक्षकांच्या बक्षीसाबद्दल मी तुझे आभार मानतो. त्यांना शहाणपण, संयम आणि शक्तीने आशीर्वादित कर जेव्हा ते भविष्यातील पिढीला घडवत राहतात. त्यांची प्रशंसा केली जात आहे असे त्यांना वाटावे आणि त्यांचे परिश्रम हे कधीही व्यर्थ जाणार नाही हे त्यांनी ओळखावे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२● बदलण्यासाठी अडथळा
● दिवस १४ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● देवाच्या प्रकारची प्रीति
● लहान बियापासून ते उंच झाडांपर्यंत
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
टिप्पण्या