डेली मन्ना
शेवटच्या समयाच्या चिन्हांची पारख करावी?
Monday, 19th of August 2024
24
20
433
Categories :
शेवटच्या वेळा
त्याने त्यास उत्तर दिले आणिम्हटले, "तुम्ही संध्याकाळी म्हणता, उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे; आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता येत नाहीत? (मत्तय 16:2-3)
आजच्या आधुनिक वेळेत, आपल्याकडे अनेक सामर्थ्यशाली साधने आहेत की वातावरणाचे भाकीत करण्यास आपणांस साहाय्य करावे. काही आठवडयाच्या अंतरात आपण हे भाकीत करू शकतो की वातावरण हे कसे होईल. आता ती वेगळी गोष्ट आहे की वातावरणा विषयी ती भाकिते नेहमीच अचूक होत नाहीत परंतु ते आपल्याला स्पष्ट सुचना देतात की आपण काय अपेक्षा करावी की वातावरण हे जवळजवळ तसेच होईल.
येशूच्या वेळेस, लोकांकडे वातावरणाचे भाकीत करण्याचे मार्ग होते. आभाळाकडे पाहत, ते याचे भाकीत करू शकत होते की वातावरण हे कसे होईल. जरी ते वातावरणा बद्दल विशेष असे सव्विस्तर वर्णन देऊ शकत नव्हते, ते सामान्यपणे हे जाणू शकत होते की कोणत्याही एका दिवशी काय घडू शकते. आकाशात सकाळी तांबूस आभाळ,वादळी वातावरण. रात्री आभाळ तांबूस, चांगले वातावरण. ह्या सरळ सिद्धांतांना अति विकसित साधनांची गरज नाही जरी पुढारी वातावरणा बद्दल भाकीत करू शकत होते, त्यांना आध्यात्मिक पारख नव्हती.
परुशी, शास्त्री आणि सदुकी लोक हे राष्ट्रात आध्यात्मिक पुढारी असावयास पाहिजे होते. दु:खद आहे की ते आंधळ्यांचे आंधळे पुढारी होते. ते जगिक गोष्टींनी इतके भरलेले होते की त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक गोष्टीविषयी विचार केला नाही.
त्यांच्याप्रमाणे आपण सुद्धा सावधान राहिले पाहिजे. जरी आपण तंत्रज्ञान व इतर विभागात अधिकप्रगती केली असली, ते आपल्या जीवनासाठी आध्यात्मिक दिशा देण्यात आपणांस साहाय्य करू शकत नाही. आपण आपल्या बुद्धीमत्तेवर अवलंबून राहू नये परंतु त्याच्याऐवजी देवाच्या वचनांवर आधारित राहावे. नाहीतर, आपण ढोंगी असे होऊ जसे त्याकाळचे पुढारी होते.
यात काही शंका नाही, की आपण शेवटच्या समयात राहत आहोत. सर्व चिन्हे ही स्पष्ट दिसत आहेत. विषाणू प्रसार प्लेग, भूकंप, वादळ, युद्ध, निषेध, एकमेकांसाठीप्रीति थंडावत चालली आहे हे चिन्हे आहेत जी पूर्ण स्पष्टपणे आपणांस सांगत आहे की आपण शेवटल्या समयात राहत आहोत.
जेव्हा आपण डोळ्याच्या अंजनाने आपल्या डोळ्यांना अभिषेक करतो जे येशू पुरवितो आपण आध्यात्मिक गोष्टी पाहू शकाल जी आपण अगोदर पाहू शकलो नाही .
मी तुम्हाला सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घ्या. म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल. आणि शुभ्र वस्त्रे विकत घ्या व तुमची लज्जास्पद नग्नता तुम्ही झाका. आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घ्या. (प्रकटीकरण ३:१८)
शेवटच्या समयात ह्या अभिषेकाची गरज आहे.
पित्या मला कृपा पुरीव की इतर सर्व वाणी पेक्षा तुझी वाणी स्पष्टपणेसमजावी. येशूच्या नांवात.
प्रार्थना
पित्या, मला कृपा पुरीव चांगले आणि वाईट आणि बरोबर आणि चूक यामध्येपारख करावी. येशूच्या नांवात. पित्या, मला कृपा पुरीव की शेवटच्या समयाच्या चिन्हांचीपारख करावी. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● येशूला पाहण्याची इच्छा● उपासने साठी इंधन
● प्रतिभेपेक्षा चारित्र्य
● २१ दिवस उपवासः दिवस ०२
● देवाचे प्रत्यक्ष गुणवैशिष्ट्ये
● वचनाचा प्रभाव
● आपण वर घेतले जातील (रैप्चर) तयार आहात का?
टिप्पण्या