प्रकार: विश्वास, आई-वडील, प्रार्थना
कालेब म्हणाला, जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील, त्याला मी आपली मुलगी अखसा देईन. तेव्हा कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले; म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली. (शास्ते १:१२-१३)
जरी कालेब हा पंच्याऐंशी वर्षाचा होता, त्यास देवाच्याआश्वासना मध्ये पूर्ण विश्वास होता. तो एक प्रबळ चारित्र्याचा एक चांगला मनुष्य होता. त्याला एक मुलगी होती जिचे नाव अखसा होते, जिला विवाहात एक मनुष्य, अथनिएल ला देण्यात आले होते.
लेकरांच्या विश्वासावर सर्वात जास्त प्रभाव हा त्यांच्या आई-वडिलांचा असतो. आणि ह्यामध्ये आध्यात्मिक प्रभाव सुद्धा येतो.
एक लहान मुलगा असा, मला आठवते माझी आई मला चर्च ला घेऊन जात असे. जरीती जास्त शिकलेली नव्हती, भोजनाच्या वेळी,ती मला आणि माझ्या लहान भावाला बायबल मधून लहान गोष्टी सांगत असे. ह्याने एक लहान मुलगा म्हणून माझ्यावर मोठा प्रभाव केला होता.
माझ्या तरुण पणाच्या वर्षां दरम्यान, मीउद्धट वागलो आणि अत्यंत भारी धातूचे संगीतवाद्य आणियुद्धविषयक कले कडे वळलो होतो, मी हे पाहत असे की ती सतत माझ्यासाठी उपास आणि प्रार्थना करीत असे की मी देवाकडे वळावे. अनेक वेळेला, मीघरी रात्रीचे उशिरा येत असे केवळ हेच पाहत असे की ती माझ्या सुरक्षे साठी तेव्हाही प्रार्थना करीत आहे. ह्याने माझ्या मनावर मोठा प्रभाव केला आणि त्याने नंतर मला देवाकडे वळविले.
प्रेषित पौल ही आठवण करून देतो कीआई-वडील किंवा आजोबा-आजी मधून एकाची प्रार्थना सुद्धा कुटुंबावर मोठा प्रभाव करते. पौलाने तीमथ्यीला ह्याची आठवण करून दिली हे म्हणत, "तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता; तुझीआई युनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याही ठायी आहे असा मला भरंवसा आहे." (२ तीमथ्यी १:५)
ह्यानेतीमथ्यीच्या जीवनात पाया घातला ज्यामुळे प्रारंभीच्या चर्चमध्ये त्यास शुभवर्तमानाचा एक सामर्थ्यशाली सेवक आणि महान प्रेषित पौलाचा एक विश्वासू सहकारी आणि सहकर्मी असे केले होते.
ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही जमीन मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, मला एक देणगी दया; तुम्ही मला नेगेब प्रदेशात स्थायिक केले आहे तेव्हा मला पाण्याचे झरेही दया; तेव्हा कालेबाने तिला उंचावरचे व पायथ्याचे झरे दिले. (शास्ते १:१४-१५)
एक नवीन वधू अशी अखसा तिच्या बापाकडे परत आली होती की तिचेजीवन व विवाहा वर आध्यात्मिक आशीर्वाद मागावे. तिला ठाऊक होते तिला तिच्या जीवनावर देवाचा आशीर्वाद हवा आहे. तिने प्रथम तिच्या पतीला म्हटले की तिच्या बापाकडे आशीर्वाद मागावा परंतु मग जेव्हा तो शांत राहिला, तिने धैर्याने तिच्या बापाला आशीर्वाद मागितले.
हे मला सांगते की एक मुलगी म्हणून, तिचे तिच्या बापाबरोबर सुंदर संबंध होते. तीचा बापाबरोबर हा तो घनिष्ठ संबंध होता, ज्याने तिला आत्मविश्वास दिला की तिच्या बापाला आशीर्वाद साठी मागावे. तिला आत्मविश्वास होता की जर तिने बापाला मागितले, तो ते तिला नाकारणार नाही.
प्रार्थने मध्ये ही एक अद्भुत शिकवणआहे.
त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे तें ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल; आणिआपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. (१ योहान ५:१४-१५)
प्रार्थने मध्ये आत्मविश्वास हा परमेश्वराबरोबर रोजच्या संबंधाने येतो. आत्मविश्वास हा आपल्याला आपल्या मागण्या मध्ये निडर करतो. परमेश्वराबरोबर संबंध हे नेहमीच याची खात्री देईल की आपण असे काहीही कधीही मागणार नाही जे त्याला अप्रसन्न करेल.उत्तरीत प्रार्थनेचे हे गुपित आहे. अखसा चा विवाह आणि कुटुंब हे आशीर्वादित होते आणि म्हणून तुमचे आणि माझे सुद्धा होईल जेव्हा आपण हे सिद्धांत आचरणात आणू.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, तुझा आत्मा व वचन द्वारे मला मार्गदर्शन कर, की असीमित यश आणि कृपा मिळावी.
पित्या, येशूच्या नांवात, माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधातील कोणत्याही प्रकारचीसैतानी दखलहे पवित्र आत्म्याच्या वाऱ्या द्वारे विखरून टाकले जावो.
पित्या, येशूच्या नांवात, माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधातील कोणत्याही प्रकारचीसैतानी दखलहे पवित्र आत्म्याच्या वाऱ्या द्वारे विखरून टाकले जावो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?● स्वयं-गौरवाचा सापळा
● उपासाचे जीवन-बदलणारे लाभ
● उपासना: शांतीसाठी किल्ली
● चिंते वर वर्चस्व मिळविण्यासाठी, ह्या गोष्टींवर विचार करा
● बदलण्यासाठी उशीर हा कधीहीझालेला नाही
● कर्जामधून बाहेर या: किल्ली# १
टिप्पण्या