याप्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरिणीबरोबर सरवा वेचिला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली. (रुथ२:२३)
सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत रुथ ने शेतात धान्य वेचिले. ही योग्य गोष्ट होती असे करणे कारण त्याने तिच्या सासूला साहाय्य केले गेले. ती योग्य गोष्ट करण्यात सतत झटत राहिली जरी ती गोष्ट केवळ नित्याची होती.
कोणतीही गोष्ट सतत करीत राहणे, दिवस-रात्र,ही विश्वासाची मोठी झेप घेणे यासाठी काही खूप विलक्षण गोष्ट नव्हती. रुथ बवाज च्या शेतात खूप दिवसांपासून सरवा वेचित होती आणि सतत करीत होती की इतर कामकरी तिला आता नावाने ओळखीत होते आणि बवाज ने तिला त्या जमावातून बाहेर काढले.
जे त्याच्या न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीति अचारितात, ते धन्य! (स्तोत्रसंहिता १०६:३)
वाक्यरचना"सर्वदा" ह्याकडे लक्ष दया, ते सातत्या बद्दल बोलते. सातत्यपूर्ण आचरण देवाचा आशीर्वाद आणते आणि मनुष्याची कृपा सुद्धा मिळविते.
रुथ च्या शिस्तबद्धपणाने बवाज बरोबरील तिचे संबंध आणि देवा बरोबरील तिचे संबंध यामधीलफरकाने परिणाम केला होता. तेच आपल्या बाबत सुद्धा खरे होऊ शकते.
कोणी योग्यरीत्या म्हटले आहे,"घटना ह्या निर्णय घेण्यासाठी चांगल्या आहेत परंतु आपल्या जीवनातील प्रत्येक भागात प्रक्रिया ही जी बदल आणते." दुसऱ्या शब्दात, जर आपल्याला आपल्या जीवनात खरी प्रगती पहावयाची आहे, तर त्या गोष्टींमध्ये जरी ज्या आपण योग्य अशा करीत आहोत त्यात सातत्य हे असले पाहिजे.
जेव्हा आपण कृत्यांना सातत्याने वारंवार करतो तेव्हा सवयी बनतात, दिवसेंदिवसांनतर ते दुसरा स्वभाव होऊन जातात. जेम्स क्लियर, अॅटॉमिक ह्याबिटस या पुस्तकाचे लेखक, लिहितात, “आपण आपल्या ध्येयाच्या स्तरापर्यंत वाढू शकत नाही; आपण आपल्या पद्धतींच्या स्तराइतके खाली पडतो.” दुसऱ्या शब्दात, आपल्या सवयी-आपल्या पद्धती-ह्या आपल्याला योग्य मार्गावर ठेवतात. पवित्र शास्त्र या भावनेला गलती ६:९ मध्ये प्रतिध्वनित करते: “चांगले करण्याच्या आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” पीक हे प्रयत्नांच्या गाजावाजामुळे येत नाही परंतु स्थिर, सातत्यपूर्ण बियांची पेरणी करण्यापासून येते.
सातत्य हा जोड आहे जो प्रेरणा आणि सवयींना एकत्र जुळवून ठेवतो. तुम्हाला वाटत नसतानाही तो तो दिसून येतो. तो तुम्हाला पुढे नेतो जेव्हा उत्साह निघून जातो. नीतिसूत्रे १३:४ आपल्याला स्मरण देते, “आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो.” परिश्रम-काम सातत्याने करण्याने- पुरस्कार प्राप्त होतो.
आज स्वतःला विचारा, "माझ्या कोणत्या आचरणात सातत्याने वाढले जाण्याची गरज आहे?"
प्रार्थना
पित्या, मी तुझे आभार मानतो की तू नेहमीच तुझे वचन पाळतो. मला तुझ्या वचनावर स्थिर राहण्यासाठी साहाय्य कर जे मला सतत प्रगती करण्यास पुढे नेईल. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● परमेश्वरा जवळ या
● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● परमेश्वर अंत:करण शोधतो
● कृपेचे प्रगट होणे
टिप्पण्या