हे मानवपुत्रा, तुझे बांधव भिंतीजवळ, दरवाजाजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत; एक दुसऱ्याला भाऊ भावाला म्हणतो, चला, परमेश्वराकडून काय वचन आले तें एकू या. जनसभेतल्याप्रमाणे ते तुजकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुजपुढे बसतात, तें तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात पण त्यांचे मन लोभवश झाले आहे. आणि पाहा, एखादा मधुर कंठाचा व वाद्ये चांगली वाजविणारा प्रेमगीत गातो तसा तूं त्यांस वाटतोस कारण ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत. (यहेज्केल ३३: ३०-३२)
परमेश्वराने यहेज्केल ला इस्राएल राष्ट्रासाठीएक पहारेकरी असावेम्हणून बोलाविले. त्याने लोकांना येणाऱ्या न्यायाविषयी इशारा द्यायचा होता आणि लोकांना देवाकडे वळण्यास सांगावयाचे होते. जरी यहेज्केल देवाने जे त्यास सांगितले होते ते विश्वासूपणे करीत होता, अनेक लोकांनी त्यांस केवळ आणखी एक व्यक्ति असे पाहिले. त्यांनी त्याचा संदेश ऐकला आणि त्यांनी ते मनावर घेतले नाही. त्यांनी त्याच्या भविष्यात्मक संदेशाला एक मनोरंजन असे मानले.
प्रत्येक आठवडी, जगभरातील चर्च हे अनेक लोकांनी भरलेले असते जे असा दावा करतातकी ते देवावर प्रेम करतात आणि त्याची सेवा करीत आहेत. ह्या चर्च मध्ये अनेक पाळक विश्वासुपणे आणि अचूकपणे देवाचे वचन सांगतात.
अनेक लोक देवाचे वचन ऐकतात जे बोलले किंवा शिकविले गेले आहे आणि स्वीकारतात की हा चांगला संदेश होता. काही'आमेन' हे सुद्धा ओरडतात आणि पाळक जसे बोलत असतो तेव्हा त्यास प्रोत्साहन देतात. अनेक हे त्यांचे मित्र आणि कुटुंबियांना आमंत्रित करतात कीत्यांच्या पाळकाचा संदेश ऐकावा-कारण तो इतका चांगला संदेश देणारा आहे. तथापि, ते संदेशाकडे काहीही लक्ष देत नाही. हे त्यासाठी मनोरंजनाचा आणखी एक प्रकार होऊन जातो.
".....ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत. (यहेज्केल ३३:३२)
आपल्यापैकी जे दररोज पवित्र शास्त्र वाचत आहेत त्यांच्यासाठी हा भविष्यात्मक इशारा आहे. वचनआपल्याला सांगत आहे कीकदाचित काय करावे याविषयी आपण वाचत आहोत परंतु आपण तसे करीत नाही जे आपल्याला सातत्याने ठाऊक आहे, हे केवळ व्यर्थ आहे.
मागील काही वेळे मध्ये मी वाचले होते कीएक टूव्हीलर चालकाने रात्रीच्या वेळी धुक्यामुळे कसे रस्त्यावर पडलेले तेल पाहिले नाही आणि त्यावरून चालविले. त्याची टूव्हीलर एका दगडी कुंपणावर आदळली. तोटूव्हीलर वरून फेकला गेला परंतु चमत्कारिकरित्या कोणत्याही जखमे शिवाय वाचला गेला. तो ताबडतोब उठला, पुढेपळाला आणि इतर टूव्हीलर चालकांना तेथे सांडलेल्या तेला साठी हात हालवून संकेतदेऊ लागला.
अनेकांनी त्यास ऐकले आणि वाचविले गेले परंतु काहींनी विचार केला हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे आणि उगीच हातवारे करीत आहे आणि मग ते चालवीतराहिले आणि पडले. अशीचपरिस्थिती आध्यात्मिकते मध्ये सुद्धा आहे. आपण ऐकतो परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही.
देवाची मनापासून इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याने त्याच्यासहसार्वकालिकते मध्ये असावे आणि म्हणून त्याने लोक ठेवले आहे की आपल्याला इशारा दयावा आणि सुधारावे. आपण त्यांना कधीही हलके असे घेऊ नये.
प्रार्थना
1. पित्या, येशूच्या नांवात, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश असे आहे.तुझे वचन नेहमीच आचरणात आणण्यास मला साहाय्य कर.
2. पित्या, येशूच्या नांवात,माझ्या जीवनात काही प्रशिक्षक ठेवले आहे यासाठीमी तुझा आभारी आहे की त्यांनी मला साहाय्य करावे की माझ्या जीवनाच्या पाचारणास पूर्ण करावे. मला साहाय्य कर की मी त्यांना कधीही सहज असे घेऊ नये.
3. पित्या, येशूच्या नांवात, मला तुझी कृपा पुरीव कीज्या सर्वांना आज व येणाऱ्या दिवसात भेटणार आहे त्या सर्वांबरोबर सत्य हे प्रीति मध्ये बोलावे. आमेन.
2. पित्या, येशूच्या नांवात,माझ्या जीवनात काही प्रशिक्षक ठेवले आहे यासाठीमी तुझा आभारी आहे की त्यांनी मला साहाय्य करावे की माझ्या जीवनाच्या पाचारणास पूर्ण करावे. मला साहाय्य कर की मी त्यांना कधीही सहज असे घेऊ नये.
3. पित्या, येशूच्या नांवात, मला तुझी कृपा पुरीव कीज्या सर्वांना आज व येणाऱ्या दिवसात भेटणार आहे त्या सर्वांबरोबर सत्य हे प्रीति मध्ये बोलावे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याचा शोध घ्या आणि तुमच्या युद्धाला तोंड दया● तुमच्या अंत:करणाचे रक्षण कसे करावे
● पैसा चरित्राला वाढवितो
● दिवस ०९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● देवाचा आरसा
● वेदी व देवडी
● भविष्यात्मक मध्यस्थी
टिप्पण्या