डेली मन्ना
सुदृढ मन हे एक दान आहे
Wednesday, 16th of October 2024
21
18
279
Categories :
मानसिक आरोग्य
“कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे” (2 तीमथ्य. 1:7)
वेगवान, भारावून टाकणाऱ्या ज्या जगात आपण राहत आहोत, त्यात मानसिक स्वास्थ्यसाठी संघर्ष हा मुख्य विषय होऊन गेला आहे. आपल्यापैकी अनेक जण चिंता, भीती, आणि निराशेमुळे देखील दबून गेलो आहोत. हे मानसिक संघर्ष हे केवळ सामाजिक किंवा शारीरिक समस्या नाहीत-ते आध्यात्मिक देखील आहेत. यास सामोरे जात असताना, बायबल आपल्याला अविश्वसनीय आशा प्रदान करते : देवाने आपल्याला सुदृढ मनाचे दान दिले आहे. हे ते मन आहे ज्यावर भीती किंवा अशांततेचे वर्चस्व नाही परंतु जे शांती आणि स्थिरतेमध्ये मुळावलेले आहे, जे देवाच्या हृदयापासून येते.
भीती हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे हे जे शत्रू आपल्या विरुद्ध वापरतो. ते आपले मन आणि हृदयात शिरकाव करते, नेहमी चिंता किंवा काळजीचे रूप धारण करते आणि देवाच्या इच्छेनुसार जीवनाची परिपूर्णता अनुभवण्यापासून आपल्याला रोखते. शत्रू भीतीचा वापर आपल्याला असुरक्षित, अपुरे आणि अस्वस्थ करण्यासाठी करतो-ज्यामुळे अनेकांना तात्पुरते उपाय शोधण्यास प्रवृत्त करतो -मग त्या झोपेच्या गोळ्या, मद्य किंवा अडथळे जसे अत्यंत मनोरंजन असो. ह्या गोष्टी जरी क्षणभराची सुटका प्रदान करत असल्या तरी, ते कधीही खरी शांती प्रदान करू शकत नाहीत. का? कारण शांती ज्याची आपल्याला आवश्यकता आहे ती ह्या जगाच्या गोष्टींमध्ये सापडू शकत नाही.
देवाची शांती ही जसे जग प्रदान करते तशा शांतीसारखी नाही. ती गहन, विपुल आणि टिकावू आहे. योहान 14:27मध्ये प्रभू येशूने अविश्वसनीय वचन दिले : “मी आपली शांती तुम्हाला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही.” ही शांती जी येशू देतो ती आपल्या परिस्थितीवर अवलंबून नाही, किंवा ती काहीतरी नाही जे आपण प्राप्त करू शकतो. हे त्याचे आपल्यासाठी दान आहे, एक जे आपले मन शांत करते आणि जीवनात गोंधळ वाटत असतानाही आपल्याला विसावा देते.
म्हणून सुदृढ मनाने जगणे हे कशा समान दिसते? त्याचा अर्थ भीतीला तुमच्या विचारांवर वर्चस्व करू देऊ नये. त्याचा अर्थ जरी तुमच्या सभोवतालचे जग अनियंत्रित आहे असे वाटत असले तरी देव नियंत्रण ठेवून आहे यावर विश्वास ठेवणे. एका सुदृढ मनाला रात्री विश्रांती घेण्यासाठी मद्य घेण्याची किंवा योग्य वाटण्यासाठी बाह्य मान्यतेची आवश्यकता नाही. त्याऐवजी, ते सत्यात स्थिर असते की देवाची प्रीती आणि शक्ती पुरेशी आहे.
सुदृढ मन असणे याचा अर्थ भीती ही देवापासून नाही हे ओळखणे देखील आहे. 2 तीमथ्य. 1:7 यास स्पष्ट करते : देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, त्याऐवजी, त्याने आपल्याला शक्ती, प्रीती आणि स्पष्टपणे विचार करणे, शहाणपणाचे निर्णय करणे आणि शांतीचा अनुभव करण्याची क्षमता दिली आहे. जेव्हा हे सुदृढ मन देवापासून दान आहे हे तुम्ही खरेच समजता, तेव्हा तुम्ही समजू लागता की तुमच्या आंतरिक शांतीला कोणतेही बाह्य वादळ अशांत करू शकत नाही.
तुमच्या स्वतःला विचारण्यासाठी काही क्षण घ्या : तुमच्या मनावर नियंत्रण करण्यासाठी तुम्ही भीती आणि चिंतेला अनुमती देत आहात काय? तुम्ही देवा व्यतिरिक्त शांतीचा शोध घेत आहात काय? जर तसे आहे, तर त्या क्षेत्राला त्यास समर्पित करण्याची वेळ आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही भीतीने शासित मनाने नाही तर सुदृढ मनाने चालावे. फिलिप्पै. 4:7 आपल्याला सांगते की देवाची शांती जी सर्व समजेपलीकडील आहे, ती तुमचे अंत:करण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” याचा अर्थ हा आहे की जेव्हा आपण आपल्या चिंता देवाला सोपवतो, तेव्हा तो त्याची शांती आपली अंत:करणे व मनावर संरक्षित ढालीसारखे ठेवतो.
येथे एक साधारण काम आहे जे तुम्ही आज प्रयत्न करू शकता :
सध्या तुम्हाला तणाव, भीती किंवा चिंता आणत असलेल्या गोष्टी तुम्ही लिहून काढाव्यात. मग, एक एक करून प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करा, आणि ते देवाला सोपवून द्या आणि तुमच्या चिंतांऐवजी त्याच्या शांतीने बदलून टाकण्यासाठी त्याला विनंती करा. पुढील आठवड्यासाठी फिलिप्पै 4:7वर मनन करण्यास समर्पित व्हा, देव ज्या शांतीचे वचन देतो त्याची तुम्हाला आठवण करून द्या.
प्रार्थना
पित्या, सुदृढ मनाच्या दानासाठी तुझे आभार. माझ्या अंत:करणाला भीती आणि चिंतेपासून राखून, तुझ्या शांतीत जगण्यास मला मदत कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आत्म्याची नांवे आणि शीर्षक: पवित्र आत्मा● पैसा चरित्राला वाढवितो
● अशी संकटे का?
● बोललेल्या शब्दाचे सामर्थ्य
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे
● दिवस २२:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
टिप्पण्या