“तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे.” (यशया 41:10)
भीती ही आज जगातील सर्वात व्यापक आणि विध्वंसक शक्तींपैकी एक आहे. मग ते नोकरी गमावण्याची भीती, आजाराची भीती, किंवा अपयशाची भीती काहीही असो, भितीकडे मार्ग आहे की आपल्या जीवनात शिरकाव करावा आणि हळूहळू आपल्याला ग्रासून टाकावे. भीतीला विशेषकरून काय धोकादायक करते ते याची क्षमता आहे की आपल्याला पक्षघाती करावे, जे आपल्याला शक्तिहीन असे वाटू देते आणि देवाच्या वचनापासून वेगळे झालेले असे करते. तथापि बायबल आपल्याला वारंवार सांगते की भीती हे काहीतरी नाही जे देव आपल्याला देतो. वास्तवात, बायबल आपल्याला वारंवार आज्ञा देतो : भिऊ नकोस.”
भीती हे भावनेपेक्षा अधिक आहे-ते एक आध्यात्मिक युद्ध आहे. आपल्याविरुद्ध शत्रूचे ते मुख्य शस्त्रांपैकी एक आहे, आणि जर आपण काळजी घेतली नाही, तर ते आपल्या निर्णयांवर नियंत्रण करू लागते, आपल्या मनावर वर्चस्व करते, आणि आपल्याकडून तो आनंद हिरावून घेते जो आपल्याला देण्याची देवाची इच्छा असते. परंतु येथे आशा आहे. आपण भीतीत जगावे अशी देवाची इच्छा नाही, आणि त्याने त्यावर मात करण्यासाठी आपल्याला आवश्यक ते सर्वकाही दिले आहे.
भीती अनेक प्रकारात प्रकट होऊ शकते. कधीकधी, हे अपयशाची भीती असू शकते-जेथे आपण चुका करू नये म्हणून खूप घाबरलेले असतो की आपण कोणतीही जोखीम घेणे टाळतो. इतर वेळी, अज्ञात गोष्टीची भीती असते, जेथे आपण भविष्यात काय ठेवलेले आहे याबद्दल चिंता करतो, आणि त्याचा परिणाम म्हणून, आपण देवाच्या योजनेवर भरवसा ठेवण्यात संघर्ष करतो. भीती असुरक्षिततेच्या प्रकारात येऊ शकते, जेथे आपल्याला सतत वाटत असते की आपण योग्य नाही, पुरेसे हुशार नाही, किंवा यशस्वी होण्यास पात्र नाही.
तरीही, 2 तीमथ्य. 1:7 आपल्याला काहीतरी शक्तिशाली सागते : “कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे”. याचा अर्थ भीती ही देवापासून नाही- ते शत्रूची योजना आहे. सैतान आपल्याला संभ्रमात टाकण्यासाठी भीतीचा वापर करतो, आपल्या स्वतःवर शंका घ्यावयास लावतो, आणि सर्वात महत्वाचे, आपल्या जीवनासाठी देवाची प्रीती आणि अभिवचनांवर शंका घ्यावयास लावतो.
जेव्हा आपण भीतीत जगतो तेव्हा शत्रू वाढत जातो कारण भीती आपल्याला पक्षघाती करते. जेव्हा आपण भीतीने ग्रासून जातो, तेव्हा आपण स्पष्टपणे पाहू शकण्यास सक्षम होत नाही, विश्वासाने कार्य करण्यास सक्षम होत नाही, देव ज्या मार्गात आपल्याला मार्गदर्शन करत आहे त्यामध्ये पुढे जाण्यास नेहमी सक्षम होत नाही. भीती आपल्या निर्णयांमध्ये गोंधळ करते आणि आपल्याला मोठे दृश्य पाहण्यापासून रोखते. देवाची तरतूद आणि संरक्षणावर लक्ष देण्याऐवजी, भीती आपल्याला इतर सर्व गोष्टींवर लक्ष देण्यास लावते जी शक्यतो चूक ठरू शकतात.
परंतु येथे सुवार्ता आहे : देवाने आपल्यासोबत राहण्याचे वचन दिले आहे. यशया 41:10मध्ये, त्याने वचन दिले आहे, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे.” हे शक्तिशाली सत्य भितीवरील आपल्या दृष्टीकोनाला परिवर्तित करू शकते. आपल्या संघर्षात आपण एकटे नाहीत. देव आपल्याबरोबर आहे, आणि प्रत्येक आव्हान, प्रत्येक संकटे, आणि प्रत्येक अनिश्चित क्षणामध्ये तो आपल्यासोबत चालत आहे. त्याची उपस्थिती भीतीवर लस आहे.
भीतीला लढा देण्यासाठी एक सर्वात मुख्य मार्ग हा त्यास स्वीकारणे आणि त्यास देवाकडे आणणे आहे. नेहमी, भीती अंधारात वाढत जाते-ती वाढत जाते जेव्हा आपण तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो किंवा ती मनात खोलवर दडवून ठेवतो. परंतु जेव्हा आपण आपली भीती देवाजवळ आणतो, तेव्हा तो त्याची शांती आणि शास्वतीने तिला भरून टाकतो. यशया 41:10 हे आपल्याला केवळ भिऊ नका हेच बोलत नाही, तर आपण का भिऊ नये याचे कारण ते आपल्याला देते : देव आपल्याबरोबर आहे. त्याची उपस्थिती सर्वात कठीण परिस्थितीमध्ये देखील शांती, शक्ती आणि स्पष्टता आणते.
आज काही क्षण विचार करा आणि तुमच्या जीवनातील त्या भागांना ओळखा जेथे भीती रुजलेली आहे. ते अपयशाची भीती, अज्ञात भविष्याची भीती, किंवा अपुरेपणाची भीती असू शकते. त्या लिहून काढा आणि त्या प्रत्येकाला प्रार्थनेत देवाजवळ आणा. तुम्ही प्रार्थना करत असताना, तुमच्या जीवनावर देवाच्या वचनांना घोषित करा, हे जाणून की त्याने तुम्हाला सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.” लक्षात ठेवा, भीती तिची पकड गमावते, जेव्हा आपण तिला देवाच्या सत्याच्या प्रकाशात आणतो.
यशया 41:10 आणि 2 तीमथ्य. 1:7 स्मरण करण्यास सुरुवात करा. जेव्हा जेव्हा आपण भटकू लागतो, तेव्हा ह्या वचनांना मोठ्याने म्हणा आणि तुमच्या स्वतःला देवाच्या अभिवचनांची आठवण करून द्या. तुमचे अंत:करण व मनाला त्याच्या वचनाने शक्तिशाली करू द्या.
प्रार्थना
येशूच्या नावाने, माझ्या जीवनातील भीतीच्या आत्म्याचा मी नाकार करतो. पित्या, तुझ्या उपस्थितीवर भरवसा ठेवण्यास आणि तू मला दिलेली शक्ती, प्रीती, आणि शांतीत चालण्यासाठी मला मदत कर. माझ्या भीतीला विश्वासाने बदलून टाक आणि तुझ्या अभिवचनांच्या परिपूर्णतेमध्ये मला मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे● आपल्या हृदयाचे प्रतिबिंब
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● मध्यस्थीचे महत्वाचे घटक
● देवाचे ७ आत्मे: समज चा आत्मा
● एक मुख्य किल्ली
टिप्पण्या