डेली मन्ना
24
18
192
तुमची नवीन वाटचाल थांबविली जाऊ शकत नाही
Saturday, 5th of July 2025
Categories :
नवीन वाटचाल
जेव्हा नवीन वाटचाल फारच लांब दिसत असेन, तर हे सोपे आहे की हताश होणे व स्वतःची किंव करणे व इतर सोयीस्कर गोष्टींमध्ये घुटमळत राहणे.
मी स्पष्टपणे आठवतो, जेव्हा माझे वडील मला व माझ्या भावाला बेंगलुरू मध्ये दगडाच्या खाणीत नेत असे जे आमच्या घराच्या अगदी जवळच होते. तेथे असताना, मी पाहिले की हाताने दगड काढण्याद्वारे मोठा खड्डा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला खूप वेळ लागत असे. खडकाला अर्धे सुद्धा हातोड्याने तोडण्याची कल्पना करा.
खडकाला पुन्हा पुन्हा व पुन्हा मारले तरी काहीही होत नसे. तुम्ही आपल्या स्वाभाविक डोळ्यांनी प्रगती पाहू शकत नाही परंतु व्यक्ति त्यास हातोड्याने मारीत राहतो आणि मग शेवटी ते तुटते.
बाहेरून काहीही घडत नाही असे दिसत असले तरी, हातोड्या द्वारे प्रत्येक फटका काहीतरी प्राप्त करीत असतो. खडक आतून कमकुवत होत असतो. हे आपल्याला सांगते की जर आपल्याला नवीन वाटचाल पाहायची असेल, तर आपल्याला कार्य करण्यात सातत्यात राहण्याची गरज आहे जे आपल्याला ठाऊक आहे की ते आपणांस नवीन वाटचालीकडे घेऊन जाईल. "जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य..." (याकोब १:१२).
आणखी एक सत्य आहे की नवीन वाटचाल क्वचित युद्धाशिवाय मिळते. बायबल मध्ये सेनेच्या संदर्भात परमेश्वर नवीन वाटचालीचा परमेश्वर असे प्रथम प्रगट झाला आहे. बायबल परमेश्वराला "नवीन वाटचालीचा परमेश्वर" किंवा " परमेश्वर जो अकस्मात कार्य करतो" असे वर्णन करते. (१ इतिहास १४:१०-११)
ही ती वेळ होती जेव्हा पलिष्टी लोकांनी रेफाईम खोऱ्यावर घाला घातला, ज्याचा अर्थ, "बलाढ्य लोकांचे खोरे" किंवा " संकटाचे खोरे". (१ इतिहास १४:१४-१७)
दाविदाने परमेश्वराचा झटून शोध केला, मार्गदर्शन प्राप्त केले, आणि त्यासुचनेप्रमाणे कार्य केले. जेव्हा तुम्ही नवीन वाटचालीच्या परमेश्वराचा शोध करता व त्याच्या सुचना पाळता, "संकटाचे खोरे" हे ते ठिकाण होईल जेथे तुम्हाला एक नवीन भेट होईल त्याच्याबरोबर "जो आपल्याला नेहमीच विजयात मार्गदर्शन करतो" (२ करिंथ २:१४). तो तुम्हाला नवीन योजना देणार नाही, परंतु तो तुम्हाला नवीन सामर्थ्य देईल की त्या योजना पूर्ण कराव्या. (यशया ४०:३१)
मी प्रार्थना करीत आहे की परमेश्वर नवीन वाटचाल देत आहे की ज्या चमत्काराची तुम्ही अपेक्षा करीत आहात ते तुम्हाला दयावे. तुम्ही लवकरच त्याची साक्ष दयाल.
Bible Reading: Psalms 81-88
अंगीकार
परमेश्वराचा आत्मा मजवर आहे. परमेश्वराने ज्या गोष्टी करण्यास मला बोलाविले आहे ते करण्यात मी थकणार नाही. आता मी माझ्या नवीन वाटचाली मध्ये प्रवेश करीत आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-1
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● तुमच्या स्वप्नांना जागृत करा
● येशूचे नांव
● तुम्ही आणि मी देवाची स्तुति का केली पाहिजे?
● महाकाय लोकांचे वंशज
टिप्पण्या