“जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात.” (नीतिसूत्रे 18:21)
शब्दांमध्ये अविश्वसनीय वजन असते. प्रत्येक वाक्य जे आपण बोलतो त्यात सामर्थ्य असते की उन्नती करावी किंवा फाडून टाकावे, प्रोत्साहन द्यावे किंवा निराश करावे, आशा किंवा निराशा आणावी. वास्तवात, आपले शब्द इतके शक्तिशाली आहेत की बायबल त्याचे वर्णन जीभ म्हणून करते जी मृत्यू व जीवन असे दोन्हीही आणण्यास सक्षम आहे. आपण काय बोलतो त्याच्या प्रभावाबद्दल आपण किती वेळा विचार करतो, विशेषतः जेव्हा आपण कठीण समयातून जात असतो? संकटाच्या क्षणा दरम्यान, शब्द जे आपल्या तोंडातून निघतात ते नेहमी आपल्या अंत:करणाच्या अवस्थेला प्रतिबिंबित करतात. आणि आपण जर काळजी घेतली नाही, तर आपण ते शब्द बोलू शकतो जे आपल्या भावनात्मक आणि आध्यात्मिक संघर्षातून वर काढण्याऐवजी अधिक खोलवर नेतात.
एलीया, बायबल मधील एक सर्वात शक्तिशाली संदेष्टा, त्याने त्याच्या जीवनात निराशेच्या सखोल क्षणाचा अनुभव केला. अत्यंत दबाव आणि धोक्याचा सामना केल्यानंतर, एलीया रानात पळून गेला, त्याला पूर्णपणे पराभूत झालेले वाटले. या समयी देवाजवळ त्याची प्रार्थना धक्कादायक होती : “हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर; मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही” (1 राजे 19:4). एलीया, ज्याने चमत्कारिक मार्गांनी देवाच्या सामर्थ्याचा अनुभव केला होता, त्याने आशाहीनता आणि पराभूततेचे शब्द बोलले जेव्हा त्याचे अंत:करण निराशेने भरून गेले होते. त्याच्या बोलण्याने त्यांच्या मानसिक आणि भावनात्मक अवस्थेला प्रतिबिंबित केले.
आपण आपल्या स्वतःला तशाच परिस्थितीत कितीदा तरी पाहतो? जेव्हा जीवन कठीण वाटते, आपल्या प्रार्थना अनुत्तरीत राहतात, किंवा जेव्हा आपल्याला आपल्या परिस्थितीमुळे भारावून गेलेले वाटते, तेव्हा आपले शब्द बदलू लागतात. विश्वास आणि आशा बोलण्याऐवजी, आपण पराजयाचे शब्द बोलू लागतो : “मी येथून पुढे हे करू शकत नाही” किंवा “हे कधीही चांगले होणार नाही”, किंवा “मी अयोग्य आहे.” हे केवळ शब्द नाहीत-ते घोषणा आहेत जे आपल्याला निराशा आणि आशाहीनतेमध्ये खोलवर नेतात.
आपल्या शब्दांमध्ये जी अफाट शक्ती आहे त्याबद्दल बायबल आपल्याला स्मरण देते. नीतिसूत्रे 18:21 म्हणते, “जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात.” याचा अर्थ हा आहे की ज्या गोष्टी आपण बोलतो ते एकतर जीवन किंवा एकतर मृत्यू आणू शकतात-केवळ दुसऱ्यांना नाही, तर आपल्या स्वतःला. जेव्हा आपण पराजयाचे शब्द बोलतो, तेव्हा आपण स्वतःला अधिक पराजय मिळत असताना पाहतो. परंतु जेव्हा आपण अंधाराच्या क्षणी देखील विश्वासाचे शब्द बोलतो, तेव्हा आपण आपल्या परिस्थितीत देवाच्या जीवन देणाऱ्या शक्तीसाठी मार्ग उघडतो.
याबद्दल विचार करा : जेव्हा देवाने जग निर्माण केले, तेव्हा त्याने ते शब्दाने केले. त्याने म्हटले, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला. आपले शब्द हे केवळ रिकामी आवाज नाहीत-त्यात निर्माण करणारी शक्ती असते. जेव्हा आपण देवाच्या अभिवचनाच्या एकरूपतेमध्ये बोलतो, तेव्हा आपण त्याच्या सत्याशी सहमत असतो आणि आपल्या जीवनात त्याच्या शक्तीला कार्य करू देतो. परंतु जेव्हा आपण नकारात्मकपणे बोलतो, तेव्हा आपण शत्रूच्या खोटेपणाशी सहमत होतो, भीती, शंका आणि निराशेला स्थिर होण्यास जागा देतो.
संकटाच्या काळात, हे विशेषकरून महत्वाचे आहे की आपल्या जिभेवर पहारा ठेवावा. निराशा, चिंता आणि तणाव नेहमी आपण जसे बोलतो त्यास बदलते. आपण कदाचित आपल्या यातनेला बोलू लागतो, हे न जाणून की जितके अधिक आपण नकारात्मक गोष्टी बोलू, तितकेच अधिक आपण नकारात्मकतेमध्ये खोलवर जात राहतो. परंतु जरी आपल्या भावना आपल्याला विरोधी दिशेमध्ये ओढत असल्या तरी येथेच आपण आपले शब्द बदलण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय करू शकतो.
किल्ली ही आहे की जीवन बोलावे, जरी जेव्हा सर्वकाही मृत्यू असे वाटते. आशा घोषित करावी, जरी जेव्हा आपण ती पाहू शकत नाही. सर्वकाही चांगले आहे असा ढोंग करण्याबद्दल हे नाही-तर आपले शब्द देवाच्या अभिवचनाशी एकरूप करण्याबद्दल आहे, हा भरवसा ठेवून की आपल्या परिस्थितीपेक्षा त्याचे शब्द अधिक शक्तिशाली आहेत.
तुमच्या जीवनावर आणि तुमच्या परिस्थितीवर तुम्ही बोलत असलेल्या शब्दांवर विचार करण्यासाठी आज काही क्षण घ्या. तुमचे शब्द जीवनाने भरलेले होते काय किंवा तुमच्या परिस्थितीमध्ये मृत्यूबद्दल बोलत होते?
विश्वास, आशा आणि प्रीतीचे शब्द जरी जेव्हा तुम्हाला तसे वाटत नसले तरी तसे बोलण्यासाठी तुमच्या स्वतःला जाणीवपूर्वक आव्हान द्या. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्यक्षतेला घडवण्यामध्ये तुमच्या शब्दाकडे सामर्थ्य आहे.
तुमच्या जीवनावर देवाच्या अभिवचनांना घोषित करण्याची सवय लावा. जेव्हा तुम्हाला अशक्त वाटत असेल, तेव्हा म्हणा, “मला शक्तिशाली करणाऱ्या ख्रिस्ता द्वारे मी सर्वकाही करू शकतो” (फिलिप्पै. 4:13). जेव्हा तुम्हाला चिंता वाटते, तेव्हा घोषित करा, “देवाची शांती जी सर्व समजेपलीकडील आहे, ती माझ्या अंत:करणाचे आणि मनाचे रक्षण करील” (फिलिप्पै. 4:7). तुमच्या बोलण्यास मार्गदर्शन करण्यासाठी देवाच्या वचनाच्या सत्याला अनुमती द्या.
पुढील सात दिवसांसाठी, जे शब्द तुम्ही बोलता त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या, विशेषतः कठीण क्षणांमध्ये. ज्या प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या स्वतःला काहीतरी नकारात्मक किंवा निराशापूर्ण बोलताना पाहता तेव्हा थांबा आणि वचनांमधून सकारात्मक घोषणेसह ते बदला. कालांतराने तुम्ही पाहाल, की तुमच्या शब्दांमधील हा बदल तुम्ही अनुभव करत असलेल्या तुमच्या आव्हानांचा मार्ग बदलतो.
प्रार्थना
प्रभू, माझ्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रत्येक परिस्थिती जिला मी सामोरे जात आहे त्यामध्ये जीवन बोलण्यासाठी मला मदत कर. विशेषेकरून गोष्टी कठीण झालेल्या असताना, माझ्या शब्दांच्या शक्तीची मला आठवण करून दे आणि माझ्या जीवनावर तुझ्या अभिवचनांना घोषित करण्यासाठी मला मार्गदर्शन कर. मी तुझे शब्द आणि जीवन जे ते आणते त्यावर भरवसा ठेवतो. येशूच्या नावाने, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस ०५● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
● नवीनजीव
● चांगले हे उत्तमतेचे शत्रू आहे
● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
● देवदूताचे साहाय्य कसे सक्रीय करावे
टिप्पण्या