तूं आपल्या शेरडामेंढरांची स्थिती पाहत जा, आपल्या कळपावर चांगली नजर ठेव(नीतिसूत्रे २७: २३). आणिनीतिसूत्रे २८: १८ म्हणते, "ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण धर्मशास्त्र पाळितो तो धन्य."
देवाने त्याचे अद्भुत कार्य करण्याअगोदर, आपण सुद्धा आपले स्वाभाविक कार्य केले पाहिजे.
जर तुम्ही लूक ९: १०-१७ वाचता, येशूने पाच हजारांना भोजन पुरविण्याचा चमत्कार करण्याअगोदर, वचने १४ आणि १५ आपल्याला सांगतात, कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते.
तेव्हा त्याने आपल्या शिष्यांस सांगितले, सुमारे पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा. त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांस बसविले." तुम्ही पाहा प्रभूने जे सांगितले ते शिष्यांना करावयाचे होते. जे सर्व काही प्रभु येशूने केले ते सर्व व्यवस्थित केले होते. यात पर्वा नाही की त्यात वाढ होत होती.
कृपा करून हे लक्षात ठेवा: परमेश्वर नेहमीच वाढ करेन जेथे गोष्टी ह्या व्यवस्थित क्रमाने करण्यात येईल. आज तुमच्या स्वतःला विचारा, मी माझ्या गोष्टी करतो त्यामध्येदैवीव्यवस्था आहे काय?
वीराप्रमाणे तेधावतात, योद्ध्याप्रमाणे ते तट चढून जातात, ते प्रत्येक आपआपल्या मार्गाने कूच करितात, ते आपली दिशा सोडीत नाहीत. ते एकमेकांस रेटून चालत नाहीत; ते आपआपल्या वाटेने जातात; समोर शस्त्रे असता ते जखम न होता त्यातून पार जातात. ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरांत शिरतात, चोरासारखे खिडक्यातून प्रवेश करितात. त्यांच्यापुढे पृथ्वी कांपते, आकाश थरथरते, सूर्य व चंद्र काळे पडतात. तारे प्रकाशावयाचे थांबतात. परमेश्वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करितो; कारण त्याचा तळ विस्तीर्ण आहे; त्याचा हुकुम बजाविणारा बलवान आहे; परमेश्वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे; त्या वेळी कोण टिकेल?" (योएल २: ७-११)
वचन ११ मधील शब्द लक्षात घ्या: "परमेश्वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करितो" यावरून हे स्पष्ट आहे कीहे परमेश्वराच्या सेनेचे वर्णन आहे.
आता मला पाहिजे की तुम्ही वचन ७ आणि ८ मधील वाक्ये लक्षात घ्यावी: "वीराप्रमाणे तेधावतात, योद्ध्याप्रमाणे ते तट चढून जातात, ते प्रत्येक आपआपल्या मार्गाने कूच करितात, ते आपली दिशा सोडीत नाहीत. हे वचन आपल्याला सांगते की येथे देवाच्या सेने मध्ये दैवी व्यवस्था आहे. कारणयेथे देवाच्या सेने मध्ये दैवी व्यवस्था आहे, ते त्याचे प्रभाविपणवाढविते.
आपल्याला दैवी व्यवस्थेचा हा सिद्धांत शिकण्याची गरज आहे आणि त्यास आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू करावे.
उदाहरणार्थ:तुमचे दस्तावेज हे व्यवस्थित ठेवलेले आहेत काय?
तुम्ही तुमचे कमाविणे आणि खर्च करण्याची नोंद ठेवता काय?
तुम्ही देवाला तुमच्या जीवनात प्रथम ठेवता काय? सर्व गोष्टी करण्याची ही दैवी व्यवस्था आहे. पहिली गोष्ट पहिलीच ठेवा!
# १. दैवी व्यवस्था तुमचे प्रभाविपण वाढवेल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक भागात वाढ आणेल.
# २. दैवी व्यवस्था ही तुमच्या जीवनात शांति सुद्धा आणेल.
"तुझे नियमशास्त्रप्रिय मानणाऱ्याना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही." (स्तोत्रसंहिता ११९: १६५)
प्रार्थना
पित्या, माझ्या जीवनातील प्रत्येक भाग हा व्यवस्थित कर म्हणजे माझ्या जीवनात आणि जीवनाद्वारे तुझे जास्तीत जास्त गौरव हे प्रकट होईल. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी● कटूपणाची पीडा
● तुम्ही एक खरे उपासक आहां काय?
● योग्य नातेसंबंध कसे बनवावे
● दयाळूपणाचे मोल आहे.
● तो पाहत आहे
● शेवटच्या समयाच्या चिन्हांची पारख करावी?
टिप्पण्या