यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाश्यांनी ऐकले, तेव्हा आपल्यापरीने त्यांनीही कपटाची युक्ती योजिली, त्यांनी प्रवासासाठी शिधासामग्री घेतली आणि आपल्या गाढवांवर जुनी गोणताटे व झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले; त्यांनी आपल्या पायांत झिजलेले व ठिगळाचे जोडे घातले, अंगात जुने पुराणे कपडे चढविले; त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरसल्या होत्या. ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, आम्हीं दूर देशांहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करारमदार करा. (यहोशवा९: ३-६)
तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले; पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही. मग यहोशवाने त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला; मंडळीच्या सरदारांनीही त्यांच्याशी आणभाक केली. (यहोशवा९: १४-१५)
जेव्हा तुमच्याबरोबर सर्व काही चांगले होत आहे, जेव्हा तुम्ही आत्ताच तोनवीन मार्ग प्राप्त केला आहे ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, अशा वेळी, प्रत्येकाला सावधान राहण्याची गरज आहे, कारण ह्याच वेळीव्यक्ति बेखर होतो-गौरवात बुडून जातो. अशाच वेळी शत्रू फसवणुकीच्या मार्गाने येण्याचा प्रयत्न करतो.
यहोशवा यरीहो आणि आय वरील त्याच्या विजयानंतर (यहोशवा ९:३), त्याने परमेश्वराचा सल्ला घेतला नाही (यहोशवा ९:१४), आणि मग गिबोनी लोकांबरोबर करार करण्यात फसविला गेला.
लक्षात घ्या, मुख्य कारण की फसवणूक झाली. हे ह्या कारणासाठी की त्यांनी परमेश्वराचा सल्ला घेतला नाही. त्यांनी बुद्धिमत्तापूर्वक आणि तर्कसंगत निर्णय घेतला. ती एक चांगली कल्पना असे दिसते परंतु ती देवाची कल्पना नव्हती.
अनेक वेळेला आपण गिबोनी लोकांसोबत अडकून जातो कारण आपण परमेश्वराचा सल्ला घेण्यात चुकलेले असतो. आपण पुढे जातो आणि आपण काय केले आहे ते योग्य आहे असे आपल्याला वाटते आणि मग आपण प्रार्थना करतो ही आशा ठेवून की सर्व काही चांगले होईल. अनेक निराशा आणि धक्कादायक गोष्टींचा जो आपण आज कदाचित सामना करीत आहोत त्याची ही नेहमी मुख्य कारणे असतात. "तुम्ही परमेश्वराचा सल्ला घेतला नाही."
ते घर, ती संपत्ति विकत घेण्याअगोदर, प्रार्थने मध्ये परमेश्वरासाठी थांबून राहा. त्यावर त्याचे मत जाणा.
भागीदारी कार्य, ते व्यवहारिक कार्य करण्याअगोदर, प्रार्थने मध्ये जा आणि त्याचा सल्ला घ्या.
त्या सुंदर व्यक्तीला किंवा त्या सुंदर मुलीला हो म्हणण्याअगोदर, परमेश्वराचा सल्ला घ्या. प्रार्थने मध्ये हे ठेवा. परमेश्वराचा सल्ला घ्या.
कोणा प्रचाराकास तुमच्या चर्च मध्ये, तुमच्या सेवेत संदेश देण्यासाठी बोलाविण्याअगोदर, परमेश्वराचा सल्ला घ्या. ते अधिक त्रास आणि समस्यांपासून वाचवेल.
कोणीतरी हे म्हटले आहे: तुम्ही कार्य करण्याअगोदर विचारावयास शिका.
जेव्हा तुम्ही विचारता, तुम्ही आशा आणि अपेक्षा करता की परमेश्वर कार्य करेल.
परमेश्वर म्हणतो, फितुरी मुळे हायहाय करितील;
ती मसलती करितात पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत;
ती करारमदार करितात पण माझ्या आत्म्यास अनुसरून करीत नाहीत;
अशी ती पापाने पाप वाढवितात. ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिसराच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिसराची वाट धरीतात. (यशया ३०: १-२)
जेव्हा आपण परमेश्वराचा सल्ला घेण्यात चुकतो, बायबल म्हणते आपण परमेश्वरा विरुद्ध बंड करतो. जेव्हा आपण योजना करतो जे त्याच्या आत्म्याद्वारे प्रेरित नाहीत, तेव्हा आपण त्याच्या आत्म्याला दु:ख देतो. सर्वात मोठी चूक जी आपण करतो ती असा विचार करणे की ह्या जगात विजय मिळविण्यासाठी आपली ५ ज्ञानेद्रीये पुरेशी आहेत.
त्या बद्दल विचार करा, कितीतरी आशीर्वादास आपण मुकलो आहोत, जर आपण केवळ त्याच्या उपस्थितीत वाट पाहत त्यास विचारण्यास शिकलो असतो.
प्रार्थना
हे परमेश्वरा, माझे हृदय क्रोध, कटुत्व आणि क्षमाहीनतेपासून शुद्ध कर येशू ख्रिस्ताच्या नांवात.
पवित्र आत्म्या मला साहाय्य कर की ख्रिस्ताचा सल्ला दररोज अनुभवावा येशूच्या नांवात.
पवित्र आत्म्या मला साहाय्य कर की ख्रिस्ताचा सल्ला दररोज अनुभवावा येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-१● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
● त्याच्या ध्वनिलहरींच्या कंपनासह लयबद्ध होणे
● वचनाचा प्रभाव
● परमेश्वर अंत:करण शोधतो
● देवाने-दिलेले सर्वात उत्तम स्त्रोत
● दिवस ०९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या