मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यांस काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उदयोग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे. (उपदेशक ३: १२-१३)
तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे काय की शब्द 'आनंदी राहा' मध्ये आनंद हा आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आणि लेकारांमध्ये आनंद करण्यासाठी, तुमच्या हृदयात आनंद हा असला पाहिजे. आनंद हा खूपच महत्वाचा आहे. ते आत्म्याचे फळ आहे आणि ते सर्वसामर्थी परमेश्वराकडून प्रवाहित होते.
आनंद हा सुखी राहण्यापेक्षा जास्त आहे
सुख हे चांगले घडण्यापासून येते, परंतु आनंद हा अधिक सखोल असतो. जेव्हा तुम्ही हे जाणता की तुम्ही देवाबरोबर शांति मध्ये आहात, कारण ख्रिस्त येशू मध्ये तुम्ही त्याच्याबरोबर संगती मध्ये आहात, तुम्ही कठीण प्रसंगात सुद्धा आनंद चा अनुभव कराल. आनंद हा अनुभव आहे जो आपल्याला त्याशी जोडतो जे आपण आहोत त्यापेक्षा "महान" आहे.
निराश व दु:खग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात [चिंतेच्याआणि शकून विचाराने] , पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते [परिस्थितीच्या पर्वा विना].
(नीतिसूत्रे १५: १५ ऐम्पलीफाईड बायबल)
नीतिसूत्रे १५: १५ नुसार,जीवन हे जसे काही सदा मेजवानी सारखे आहे, जेव्हा तुमच्या हृदयात आनंद हा असतो! याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे जीवन हे नेहमी उत्सवात जगाल जसे काही गुलाबी रंगांच्या काचेतून पाहत आहात.
याचा अर्थ जेव्हा तुम्ही समस्यांचा सामना करता, तुम्हाला गहन आनंद आणि कृतज्ञतेची भावनाआहे, हे जाणून की परमेश्वर चांगला आहे आणि तो तुमच्या बाजूने आहे. "जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, तर कोण माझा विरोधी होऊ शकतो?" (रोम ८: ३१) ही तुमची सतत पापकबुली असेल. जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगातून जाता, तुम्ही त्याच्यामधील तुमच्या विश्वासावर स्थिर राहता.
आनंदाला तुमच्या शरीरावर सुद्धा भौतिक प्रभाव असतो
नीतिसूत्रे १७: २२ (ऐम्प्लीफाईड) म्हणते, "आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय; खिन्न हृदय हाडे शुष्क करिते." तुमचे जीवन आनंद आणि सुखात राहण्याचे निवडणे हे तुम्हाला स्वस्थ होण्यास आणि सुदृढ राहण्यात साहाय्य करते.
मला तुम्हांला काही व्यवहारिक सुचना देऊ दया की तुमच्या जीवनात आनंद असावा:
१. लहानगोष्टींची प्रशंसा करा
जेव्हा तुम्ही जीवनात लहान गोष्टींची प्रशंसा करण्यास सुरुवात करता आणि त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देता, तुम्ही पाहाल की तुमचा आत्मा हा आनंदाने भरून गेला आहे.
२. स्वतःभोवती सकारात्मक व्यक्तीने भरून टाका
आनंद हा संसर्गजन्य आहे आणि तसेच नकारात्मकता. मरी प्रमाणे नकारात्मक लोकांना टाळा. ते विडीओ पाहा जे तुम्हांला प्रोत्साहन देतील आणि ते नाही जे तुम्हांला गडबडीतटाकतील.
आज, काहीतरी शोधा की हसावे, प्रशंसा करावी किंवा आनंद घ्यावा. तुमच्या संबंधाला आणि तुमच्या शरीराला हसण्याच्या औषधाचा एक डोस दया! जीवन हे मनुष्यास देवाची देणगी आहे. आपण आपल्या जीवनाबरोबर जे करतो ते आपले देवाला दान आहे.
प्रार्थना
परमेश्वराचा आनंद ही माझी शक्ती आहे येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते● तुमच्या समस्या व तुमचा दृष्टीकोन
● त्याच्या ध्वनिलहरींच्या कंपनासह लयबद्ध होणे
● महाकाय लोकांचे वंशज
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
टिप्पण्या