माझी खात्री आहे की हे तुम्हांला तुमच्या जीवनात अनेक वेळेला झाले असेन.
तुम्ही कोठेतरी गीत ऐकले, आणि तुम्ही स्वतःला म्हटले, "कायहास्यास्पद गीत आहे?" मग तुम्ही तेच गीत नंतर कोठेतरी पुन्हा वाजताना ऐकले.
एके दिवशी, जेव्हा तुम्ही तुमच्या घरी बसलेले असताना, अचानक तुम्ही ते "तथाकथित खराब गीत" गाऊ किंवा गुणगुणू लागता. माझा मुद्दा हा की, जर गीत हे हास्यास्पद किंवा खराब होते, तर मग ह्या पृथ्वीवर तुम्ही ते का गात आहात?
सत्यता ही आहे की जे काही तुम्ही वारंवार ऐकत राहता ते मग तुमच्या मनाच्या अगदी सर्वात प्रथम असते. मनाला जे काही वारंवार पुन्हा म्हटले जाते त्या गोष्टीवर लक्ष देण्याची वृत्ती होते. यास पुन्हा भरण्याचा नियम असे म्हणतात.
जर आपण काहीतरी खूप वेळ ऐकतो, आपली वृत्ती होते की आपण त्यावर विश्वास ठेवावा आणि त्यावर कार्य करावे.
प्रक्रिया ही सरळ आहे. गीत हे अनेक वेळेला वारंवार लावले जाते, म्हणून आपण ते ऐकतोच, मग आपण त्या गीता विषयी विचार करू लागतो, आणि मग लवकरच आपण ती धून गुणगुणू किंवा गाऊ लागतो.
हे आपल्याला स्पष्टपणे सांगते की योग्य विचार हे आपल्याला प्रेरणा देतात की योग्य कृती करावी किंवा कमीत कमी त्या योग्य दिशे मध्ये चालण्यास सुरुवात करावी.
आपण आपल्या मनाला योग्य विचाराने भरण्यासाठी सर्वात लाभकारी मार्ग हा की दररोज तुमच्या मनाला देवाच्या वचनाने भरावे.
देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया. (रोम १२: २)
रोम १२: २ मध्ये पौल सांगतो की आपले आध्यात्मिक रुपांतर हे "आपल्या मनाच्या नवीकरणाने" होते. याची खात्री बाळगा की तुमचा दिवस हा बायबल वाचून किंवा ऑडीओ बायबल ऐकण्याद्वारे सुरु करा.
प्रेषित पौलाने आपल्या मनाला योग्य गोष्टींद्वारे भरण्याच्या महत्वाला सुद्धा सांगितले आहे म्हणजे आपण देवाची उपस्थिती सदैव घेऊन चालू.
बंधुंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सदगुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, व माझे जे ऐकले, पाहिले तें आचरीत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील." (फिलिप्पै ४: ८-९)
अंगीकार
मी कबूल करतो की मी माझ्या मनाच्या आत्म्यात नवीन झालो आहे. (इफिस ४: २३)
मी कबूल करतो की मी ख्रिस्ताच्या मना द्वारे कार्य करतो. मी ख्रिस्ताच्याविचारातून घेतो, आणि त्याच्या विचाराची शक्ती माझ्या विचारात मोकळी करतो, येशूच्या नांवात. (१ करिंथ २: १६, फिलिप्पै २: ५)
मी विश्वास ठेवतो आणि कबूल करतो कीमी ह्या जगाच्या पद्धती आणि संस्कृतीनुसार वागत नाही परंतु मी दररोज देवाच्या वचनाद्वारे माझ्या मनाच्या नवीकरणाद्वारे रुपांतरीत होतो. (रोम १२: २)
मी कबूल करतो की मी ख्रिस्ताच्या मना द्वारे कार्य करतो. मी ख्रिस्ताच्याविचारातून घेतो, आणि त्याच्या विचाराची शक्ती माझ्या विचारात मोकळी करतो, येशूच्या नांवात. (१ करिंथ २: १६, फिलिप्पै २: ५)
मी विश्वास ठेवतो आणि कबूल करतो कीमी ह्या जगाच्या पद्धती आणि संस्कृतीनुसार वागत नाही परंतु मी दररोज देवाच्या वचनाद्वारे माझ्या मनाच्या नवीकरणाद्वारे रुपांतरीत होतो. (रोम १२: २)
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
● एक मृत व्यक्तिजिवंत व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे
● पहाडीव दरी यांचा परमेश्वर
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● लहान बियापासून ते उंच झाडांपर्यंत
● कृपेचे प्रगट होणे
टिप्पण्या