डेली मन्ना
दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Wednesday, 11th of December 2024
30
23
227
Categories :
उपास व प्रार्थना
दर्जा बदल
"परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो,
तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो." (स्तोत्र. ११५:१४)
अनेक लोक अडकलेले आहेत; त्यांना पुढे जाण्याची इच्छा आहे पण हे समजू शकत नाही काय त्यांना मागे ओढून धरत आहे. आज, येशूच्या नावाने अदृश्य अडथळा हा नष्ट करण्यात येईल.
देवाने आपल्याला पुढे जाण्यासाठी निर्माण केले आहे; आपणांस एकाच ठिकाणी कायमचे राहण्यासाठी निर्माण केलेले नाही.
"परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे." (नीतिसूत्रे ४:१८)
कोणते लोक आहेत ज्यांना दर्जामध्ये बदल हवा आहे?
- जो कोणी एकाच स्थितीमध्ये बऱ्याच कालावधीपर्यंत राहिला आहे.
- कोणीही ज्यास बऱ्याच कालावधीपर्यंत लाभ व आशीर्वाद नाकारले गेले आहेत.
- ज्यांनी विश्वासुपणे इतरांची सेवा केली आहे आणि त्यांच्या स्थिरस्थावरतेसह दैवीरीत्या पात्र आहेत.
- ज्यांची इतरांनी फसवणूक केली आहे.
- जे जीवनाच्या मागील स्थानावर आहेत.
- ते ज्यांना निरुपयोगी ठरविले गेले आहे.
- ते ज्यांना साहाय्यक नाही.
- ते जे संघर्ष व परिश्रम करीत आहेत.
- ते जे देवाचे राज्य पृथ्वीवर वाढविण्याची इच्छा बाळगतात.
दर्जामध्ये ज्यांनी बदल अनुभविलेला आहे त्यांची उदाहरणे
- मर्दखय
मर्दखयाची स्थिती एका रात्रीत बदलली; हे काहीतरी होते ज्याची त्याने अपेक्षा देखील केली नव्हती; ते दैवी होते. (एस्तेर ६:१-१२; ९:३-४ वाचा)
- अलीशा
एलीयाच्या अंगावरील पडलेला झगा आणि आत्म्याचे हस्तांतरणाने अलीशाच्या आध्यात्मिक दर्जामध्ये बदला केला. संदेष्ट्यांचे पुत्र त्याच्याकडे आले आणि त्यास नमन केले कारण त्यांनी हे पाहिले की त्याचा दर्जा हा बदलला आहे. (२ राजे २:९-१५ वाचा)
- दावीद
गल्ल्याथाच्या पराभवाने दाविदासाठी दर्जामधील बदलाकडे नेले. जीवनातील लढाया तुम्हांला नष्ट करण्यासाठी नसतात; ते तुम्हांला दर्जा बदलण्याची घोषणा करतील.
शौलाने त्यादिवशी त्याला नेले, आणि तेथून पुढे त्यास त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही. (१ शमुवेल १८:२)
"तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तूं माझ्या प्रजेचा, इस्राएलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणिले." (२ शमुवेल ७:८)
- पौल
पौल, ज्याने चर्चला आंतकीत केले होते, त्याने दर्जामध्ये बदल अनुभविला आणि राज्यासाठी प्रेषित झाला. "तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली." (१ तीमथ्य. १:१६)
- योसेफ
योसेफ एका उच्च पदावर आरूढ झाला ज्यासाठी मानवी प्रमाणाने तो पात्र नव्हता. एका अनोळखी देशात, देवाने त्यास पुढारी बनविले. (उत्पत्ति ४१:१४-४६ वाचा)
दर्जामधील बदलाचा अनुभव कसा करावा?
देव प्रत्येकाच्या दर्जामध्ये बदल करण्यास इच्छूक आहे, परंतु तो केवळ त्याच्या वचनाने कार्य करील. येथे विशेष तत्वे आहेत ज्यांचे कोणीही उल्लंघन नाही केले पाहिजे ज्यांस दर्जामध्ये बदल हवा आहे. पवित्रशास्त्रामध्ये ज्या लोकांनी दर्जामधील बदलाचा आनंद घेतला त्यांनी वेळोवेळी विविध मुद्द्यांवर या तत्वाला प्रदर्शित केले होते. चला आपण मुख्य तत्वाला पाहू या.
- प्रामाणीकपणाने जगा
देवाने दाविदाची निवड केली आणि त्याचा दर्जा बदलला कारण तो प्रामाणिकपणाने जगणारा माणूस होता.
"आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांचे पालन केले, आपल्या हाताच्या चातुर्याने त्यांस मार्ग दाखविला." (स्तोत्र. ७८:७२)
- देवाच्या भय धरून जगा
देवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. देवाचे भय तुम्हांला दर्जामधील बदलासाठी एका स्थानावर नेईल. योसेफाची परीक्षा झाली, आणि जर तो परीक्षेत अपयशी ठरला असता, तर तो त्या दर्ज्यावर आला नसता. तुम्ही पापाच्या सुखाने परीक्षेत पडाल; देवाच्या भयाने तुमच्या हृदयावर राज्य केले पाहिजे जर तुम्ही दर्जामध्ये बदलाची इच्छा करता. (उत्पत्ति ३९:९)
- दर्जामध्ये बदलासाठी प्रार्थना करा
देव तुमचा दर्जा बदलण्यासाठी तयार आहे जर तुम्ही प्रार्थना करू शकाल.
"९ याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. १० याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा; तूं माझे
खरोखर कल्याण करिशील, माझ्या मुलुखाचा विस्तार वाढविशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दु:खी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल !" (१ इतिहास ३:९-१०)
- तुम्हांला देवाच्या कृपेची गरज आहे
एस्तेरचा दर्जा बदलला कारण स्पर्धेसाठी आलेल्या इतर स्त्रियांहून तिने अधिक कृपा प्राप्त केली. कृपा ही तुम्हांला दर्जामध्ये बदलास पात्र करेल.
"राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीति केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टि विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले." (एस्तेर २:१७)
- देवाबरोबर खऱ्या भेटीसाठी प्रयत्न करा
मोशेची देवाबरोबर झालेली ही ती भेट होती जिने त्याची स्थिती बदलली. मोशे फारोपासून रानात पळून गेला होता, पण जेव्हा त्याची देवाबरोबर भेट झाली, तेव्हा तो फारोचा देव झाला. (निर्गम ३:२, ४-१० वाचा)
इतरांच्या समस्यांसाठी उपाय बना
योसेफाने दर्जामध्ये बदलाचा अनुभव केला कारण तो फारो व मिसरसाठी उपाय झाला होता. इतरांच्या जीवनात मुल्ये वाढवा जर तुम्हांला दर्जामध्ये बदलाचा आनंद घ्यायचा आहे.
- ज्ञानासाठी प्रयत्न करा
ज्ञान ही मुख्य गोष्ट होती, आणि त्यासाठीच शलमोनाने विनंती केली. देवाच्या ज्ञानाने शलमोनाला जे दिले त्याने त्याच्या दर्जामध्ये बदल केला. (१ राजे ३:५-१५)
देव कोणाचाही दर्जा कोणत्याही वेळी बदलू शकतो, देवाप्रति निराश होऊ नका. विश्वासुपणे त्याची सेवा करा, आणि योग्यवेळी, तो तुम्हांला उंच करील.
Bible Reading Plan : Act 10-15
प्रार्थना
१. हे परमेश्वरा, येशूच्या नावाने, तुझ्या सामर्थ्याने मला दर्जामध्ये बदलाचा अनुभव येऊ दे.
२. पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की ते प्रत्येक जण जे या २१ दिवसांच्या उपास कार्यक्रमात सहभागी झाले आहेत त्यांनी उच्च दर्जावर पोहचावे.
३. येशूच्या नावाने मी अपयशाच्या आत्म्याचा नकार करतो.
४. येशूच्या नावाने मी माझ्या सर्व परिश्रमामध्ये फलदायक होण्याची कृपा प्राप्त करतो.
५. येशूच्या नावाने मी व्यर्थ परिश्रम करणार नाही. ना ही माझे प्रियजन व्यर्थ परिश्रम करतील.
६. पित्या, येशूच्या नावाने मला त्यांजबरोबर जोड ज्यांनी माझ्या पुढच्या दर्जासाठी तयारी केली आहे.
७. पित्या, येशूच्या नावाने माझ्या पुढील दर्जासाठी नवीन वाटचालीसाठी नवीन कल्पना पुरीव.
८. येशूच्या नावाने विलक्षण साक्षीसाठी मी नवीन समज प्राप्त करतो.
९. पित्या, येशूच्या नावाने माझ्यासाठी वाटचालीचे नवीन दरवाजे उघड.
१०. येशूच्या नावाने आर्थिक नवीन वाटचालीसाठी मी कृपा प्राप्त करतो.
११. पित्या, येशूच्या नावाने माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय दरवाजे उघड.
२. पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की ते प्रत्येक जण जे या २१ दिवसांच्या उपास कार्यक्रमात सहभागी झाले आहेत त्यांनी उच्च दर्जावर पोहचावे.
३. येशूच्या नावाने मी अपयशाच्या आत्म्याचा नकार करतो.
४. येशूच्या नावाने मी माझ्या सर्व परिश्रमामध्ये फलदायक होण्याची कृपा प्राप्त करतो.
५. येशूच्या नावाने मी व्यर्थ परिश्रम करणार नाही. ना ही माझे प्रियजन व्यर्थ परिश्रम करतील.
६. पित्या, येशूच्या नावाने मला त्यांजबरोबर जोड ज्यांनी माझ्या पुढच्या दर्जासाठी तयारी केली आहे.
७. पित्या, येशूच्या नावाने माझ्या पुढील दर्जासाठी नवीन वाटचालीसाठी नवीन कल्पना पुरीव.
८. येशूच्या नावाने विलक्षण साक्षीसाठी मी नवीन समज प्राप्त करतो.
९. पित्या, येशूच्या नावाने माझ्यासाठी वाटचालीचे नवीन दरवाजे उघड.
१०. येशूच्या नावाने आर्थिक नवीन वाटचालीसाठी मी कृपा प्राप्त करतो.
११. पित्या, येशूच्या नावाने माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय दरवाजे उघड.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● मोठी कार्ये
● प्रेमाद्वारे प्रेरित व्हा
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● कार्यवाही करा
● रहस्य स्वीकारणे
● त्याचे दैवी दुरुस्तीचे दुकान
टिप्पण्या