डेली मन्ना
दिवस २७:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Wednesday, 18th of December 2024
33
23
226
Categories :
उपास व प्रार्थना
पवित्र आत्म्याबरोबर सहभागीता
“मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे.” (योहान. १४:१६)
पवित्र आत्मा हा एक व्यक्ती आहे आणि दैवत्वाचा एक भाग आहे. पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी जरी पुष्कळ गोष्टी लिहिलेल्या असल्या आणि देवाच्या वेगवेगळ्या अभिषिक्त माणसांकडून, येथे तरीही त्या देवाच्या माणसांकडून त्या अभिषिक्त पुस्तकांमध्ये, आपण त्याच्याविषयी कितीतरी म्हटले पाहिजे याच्या तुलनेत फारच थोडे लिहिलेले आहे.
मुळात, आपल्याला पवित्र आत्म्याविषयी बरेच काही म्हणण्याची आवश्यकता आहे, परंतु मागील अनेक वर्षांमध्ये आपण त्याच्याविषयी फारच थोडे म्हटले आहे. दैवत्वामध्ये पवित्र आत्मा हा तिसरा व्यक्ती आहे, आणि त्याच्या भूमिकेला कमी लेखले जाऊ शकत नाही किंवा कमी लेखले नाही गेले पाहिजे.
प्रारंभी, देवाचा आत्मा तळपत होता (उत्पत्ती १:२). देवाचा आत्मा सृष्टी निर्मितीच्या वेळी सक्रीय होता. आज, माझी इच्छा आहे की आपण पवित्र आत्म्याबरोबर सहभागीता करावी आणि त्याच्याबरोबर निरंतर सहभागीतेत राहावे.
पवित्र आत्मा कोण आहे?
१. पवित्र आत्मा देव आहे. तो दैवत्वाचा भाग आहे-देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा.
तो एक व्यक्ती आहे आणि तो देव आहे. पवित्र आत्मा एक शक्ती नाही, जसे काही गैरसमजुतीने तसे गृहीत धरतात. तो अग्नी, एक पक्षी, एक कबुतर किंवा पाणी नाही. ह्या गोष्टी प्रतिक म्हणून त्याचे व्यक्तिमत्व किंवा शक्ती प्रदर्शित करण्यासाठी तो त्यांचा वापर करतो, तो कोण आहे हे त्या नाहीत.
तो देव आहे आणि तो एक व्यक्ती आहे. त्याला भावना आहेत. तो समजून घेतो, तो दु:खी होतो, आणि आनंदी होतो. तो बोलू शकतो-ही सर्व जीवनाची चिन्हे आहेत.
२. पवित्र आत्मा हा आपल्यातील देवाचा आत्मा आहे. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आत्मे आहेत, जसे, मानवी आत्मे, देवदूताचे आत्मे आणि भुताटकी आत्मे. पवित्र आत्मा आपल्या आत्म्यात निवास करणारा देवाचा आत्मा आहे.
३. तो आपल्या जीवनात जीवन, प्रीती, स्वभाव आणि देवाची शक्ती टाकतो. आपल्या जीवनात त्याची उपस्थिती देवाच्या अग्नीला प्रज्वलित ठेवते. पवित्र आत्म्याच्या उपस्थितीद्वारे, आपण देवाची प्रीती आणि स्वभावाने भरून जातो, आणि देवाची शक्ती आपल्या जीवनात निवास करते.
४. तो सार्वकालिक आहे. पवित्र आत्मा, देव जो पित्यासारखा, देव जो पुत्रासारखा, कधी मरू शकत नाही. त्याला प्रारंभ आणि शेवट नाही. इतर सर्वकाही निर्माण केलेले आहे-मनुष्य, देवदूत, भुते, सृष्टी, स्वर्ग आणि पृथ्वी.
देवाने सैतानाला किंवा भूतांना जसे ते आहेत तसे निर्माण केले नव्हते; त्याने त्यांना देवदूत म्हणून निर्माण केले होते. कालांतराने, ते स्थलांतरित झाले आणि सैतान आणि भुते झाले. तथापि, पवित्र आत्मा सार्वकालिक आहे; तो जीवनाचा आत्मा आहे (झो). तो मरू शकत नाही आणि देवासारखे, त्याला प्रारंभ किंवा शेवट नाही. म्हणून, तो सार्वकालिक आहे.
५. पवित्र आत्मा देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला मदत करतो. ही त्याची भूमिका आहे. तो साहाय्यक आहे.
६. आपल्या प्रार्थनेच्या जीवनात तो आपल्याला मदत करतो (रोम. ८:२६); ह्या त्या गोष्टी आहेत ज्या पवित्र आत्मा सक्रियपणे एका विश्वासणाऱ्याच्या जीवनात करत असतो.
७. तो आपल्याला अशक्य गोष्टी करण्यास मदत करतो, अशक्यतेला शक्यतेमध्ये बदलण्यासाठी विशेष असा आहे.
८. पवित्र आत्मा आपल्याला शत्रूवर विजय मिळवण्यास साहाय्य करतो. यशया ५९:१९ स्पष्ट करते की, जेव्हा शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येतो तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारतो. देवाचा आत्मा आपल्याला शत्रूवर विजय मिळवण्यास साहाय्य करतो.
९. तो आपल्या जीवनासाठी देवाच्या परिपूर्ण योजनेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतो.
आपल्या वर्तमान काळात पवित्र आत्म्याची सात प्रमुख सेवाकार्ये काय आहेत?
योहान १४:१६ ऐम्पलीफाईड बायबल अनुवादानुसार, ते पवित्र आत्म्याच्या सात महत्वपूर्ण पैलूंना प्रकट करते.
- तो सांत्वनदाता आहे
- सल्लागार
- साहाय्यक
- मध्यस्थ
- समर्थक
- शक्ती देणारा
- आपल्या पक्षाचा
पवित्र आत्म्याची ही सात सेवाकार्ये आहेत. त्यांना समजणे हे तुम्हांला ह्या वेगवेगळ्या भागात त्याच्याबरोबर सहभागीता करू देते.
म्हणून, चला आपण पहिल्या सेवेला पाहू या.
१. तो सांत्वनदाता आहे. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर सहभागीता करता, तेव्हा तुम्ही सांत्वनाच्या सेवेचा आनंद घेऊ शकता. अशी वेळ येते जेव्हा लोक तुम्हांला समजत नाहीत. परंतु जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर सहभागीता करता, तेव्हा तो तुमचे सांत्वन करतो, कारण त्या क्षणी, मनुष्य मदत करू शकत नाही. मनुष्याचे बोल तुम्हांला दुखावू शकतात परंतु पवित्र आत्म्याचे बोल तुमचे सांत्वन करते.
२. तो सल्लागार आहे. अशी वेळ नेहमीच येते जेव्हा काय करायचे हे तुम्हांला समजत नाही. पवित्र आत्म्याबरोबर खऱ्या सहभागीतेद्वारे, कोणत्या दिशेने जायचे आणि काय करायचे याबद्दल तुम्ही पवित्र आत्म्याकडून सल्ला प्राप्त करू शकता.
३. तो तुमचा साहाय्यक आहे. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर सहभागीता करता, तेव्हा वेळेवर तुम्ही मदतीचा आनंद उपभोगाल. गरजेच्या वेळी तुम्हांला मदत मिळेल.
४. तो तुमचा मध्यस्थ आहे. पवित्र आत्मा तुमच्या जीवनासाठी देवाच्या परिपूर्ण इच्छेनुसार प्रार्थना करत आहे (रोम. ८:२६). अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्यावर माझा विश्वास आहे. जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला मध्यस्थी करण्यास साहाय्य करतो. तो कण्हण्याने प्रार्थना करतो आणि आपल्यासाठी समर्थन करतो. तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो.
पवित्र आत्म्याची ही सेवाकार्ये आहेत, आणि जेव्हा आपण त्याच्याबरोबर सहभागीता करतो, तेव्हा आपण त्या अवस्थेमध्ये असतो की त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याच्या सेवाकार्याचा आनंद उपभोगावा. पवित्र आत्म्याबरोबर सहभागीता करणे हे पवित्र आत्म्याबरोबर संगती करणे आहे.
ही वेळ आहे की तुम्ही त्याच्याबरोबर संगती करावी, आणि जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर संगती करता, तेव्हा सात सेवाकार्ये जे तो पूर्ण करतो ती तुमच्या जीवनात सक्रीय होतात.
तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर सहभागीता करण्याचे कोणते मार्ग आहेत?
त्याला ओळखा. नीतिसूत्रे ३ वचन ६ म्हणते, “तू आपल्या सर्व मार्गात याचा आदर कर”. तो तुमच्यात एक विश्वासणारा म्हणून आहे, पण जर तुम्ही त्याला ओळखले नाही, तर तुम्ही त्याची संगती, सहभागीता आणि सेवेचा आनंद घेऊ शकणार नाही.
त्याची आज्ञा पाळा. अवज्ञा आणि पाप पवित्र आत्म्याला खिन्न करते (इफिस. ४:३०). जेव्हा तुम्ही पापी आचरण करत राहता किंवा त्याच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पवित्र आत्म्याला खिन्न करत असता.
त्याला प्रश्न विचारा. यिर्मया ३३ वचन ३ म्हणते, “मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन.” तो येथे तुम्हांला मदत करण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही कठीण गोष्टींचा सामना करत आहात, तेव्हा प्रार्थना करणे हे चांगले आहे, पण प्रश्ने विचारणे हे प्रार्थनेपेक्षा वेगळे आहे. प्रार्थनेत चौकशी म्हणजे तुम्ही पवित्र आत्म्याला विचारत आहात, “पवित्र आत्म्या, याबद्दल मी काय केले पाहिजे?” हा व्यक्ती कोण आहे? मी कोठे गेले पाहिजे? जेव्हा तुम्ही अशी प्रश्ने विचारता, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर सहभागीता करत आहात, आणि तो तुम्हांला उत्तर देईल कारण त्याला आवाज आहे आणि तो एक व्यक्ती म्हणून बोलतो.
त्यावर अवलंबून राहा. तुमच्या बुद्धीमत्तेवर केवळ अवलंबून राहू नका, डॉक्टर, किंवा कुशल व्यक्ती तुम्हांला काय सांगत आहेत किंवा तुम्ही तुमच्या शारीरिक डोळ्यांनी आणि नैसर्गिक क्षेत्रातील वस्तुस्थिती जी तुम्ही पाहत आहात. पवित्र आत्म्यावर अवलंबून राहा. यशया ४२:१६ म्हणते, “माहित नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.”
पवित्र आत्मा तुम्हांला देण्यात आला आहे की यशया ४२, वचन १६ पूर्ण करावे, म्हणजे तुम्ही आतापासून आंधळे राहणार नाहीत. तुम्ही आता पाहू शकता कारण तो तुम्हांला गोष्टी दाखवतो जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर सहभागीता करता. जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर सहभागीता करता, तेव्हा तो तुम्हांला त्या मार्गावर नेतो जे तुम्हांला माहित नसते. अंधार प्रकाशात बदलला जातो, आणि वाकड्या गोष्टी सरळ केल्या जातात कारण तुम्ही त्याच्याबरोबर सहभागीता करत आहात. देवाने तुम्हांला कधीही न सोडण्याचे किंवा तुमचा त्याग न करण्याचे अभिवचन दिले आहे, पण त्याने तुम्हांला दिलेल्या प्रत्येक अभिवचनाचा आनंद उपभोगण्यासाठी तुम्ही त्याच्याबरोबर सहभागीता केली पाहिजे. पवित्र आत्मा येथे आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही त्याच्याबरोबर सहभागीता करावी. तुमच्या जीवनात त्याच्या उपस्थितीविषयी जागरूक राहा.
जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी करता, तेव्हा तुम्ही ख्रिस्त, पवित्र आत्म्याच्या जाणीवेमध्ये वाढता, आणि तुम्ही पवित्र आत्म्याचे व्यक्तिमत्व आणि सेवाकार्याचा आनंद उपभोगाल.
Bible Reading Plan : 1 Corinthians 10 - 15
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. पित्या. मी तुझ्याजवळ येतो आणि माझ्या स्वतंत्रपणे आचरणाचा पश्चाताप करतो. मी तुला शरण येतो, हे परमेश्वरा, आणि मी माझ्या जीवनात तुझ्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करतो.
२. हे परमेश्वरा, प्रतिदिवशी आणि प्रत्येक समयी तुझ्या पवित्र आत्म्याबरोबर सहभागीता करण्यासाठी येशूच्या नावाने मला कृपा प्रदान कर.
३. पवित्र आत्म्या, माझे जीवन, कुटुंब, व्यवसाय, आरोग्य आणि कारकिर्दीत मी कोठे चुकत आहे ते येशूच्या नावाने मला दाखव.
४. पवित्र आत्म्या, मला मदत कर, मी गरजेत आहे. मी हे स्वतःहून करू शकत नाही. येशूच्या नावाने मला तुझी गरज आहे.
५. पवित्र आत्म्या, येशूच्या नावाने माझे कान उघड की मी तुझे ऐकण्यास सुरुवात करावी, माझे डोळे उघड की मी तुला पाहण्यास सुरुवात करावी, माझी समज उघड की मी तुला जाणण्यास सुरुवात करावी.
६. काही मिनिटांसाठी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा.
७. पवित्र आत्म्या, माझ्या समजेचे डोळे प्रज्वलित कर. मला शक्तिशाली बनव जेणेकरून येशूच्या नावाने मुक्तीची विपुलता ओळखू शकावे.
८. पित्या, मी माझ्या जीवनात पवित्र आत्म्याच्या आनंदाच्या वर्षावासाठी मागत आहे, म्हणजे येशूच्या नावाने मी आनंदी व्हावे, आणि माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसात आनंद आणि शक्तीने भरून जावे.
९. मी माझ्या जीवनात निष्क्रियतेचा आत्मा आणि आध्यात्मिक निस्तेजपणाला येशूच्या नावाने मोडून काढतो.
१०. पवित्र आत्म्याबरोबर चालण्यासाठी मी कृपा प्राप्त करतो, की पवित्र आत्म्याबरोबर सहकारी असावे, आणि येशूच्या नावाने माझ्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रभू येशूच्या अधिकाराला शरण जावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
● एल-शादाय चा परमेश्वर
● अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
● बारा मधील एक
● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
टिप्पण्या