डेली मन्ना
दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Friday, 20th of December 2024
33
20
217
Categories :
उपास व प्रार्थना
पुरस्कार आणि परिचयाचा हा माझा हंगाम आहे
“पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तुत्वाचे तुम्हांला फळ मिळेल.” (२ इतिहास १५:७)
या वर्षी, तुमच्यासाठी माझी प्रार्थना ही आहे की तुमच्या कामाला येशूच्या नावाने पुरस्कृत केले जाईल.
हे शक्य आहे की काम करावे आणि पुरस्कृत नाही केले जावे. आपण याकोबाच्या जीवनात पाहिले आहे जेव्हा तो त्याचा चुलता लाबानासोबत राहत होता. याकोबाने पुष्कळ वेळा काम केले आणि त्याच्या कामाला पुरस्कृत केले गेले नाही. देवाने याकोबाची भेट घेतली, आणि सर्वकाही बदलून टाकले, आणि लाबानाची संपत्ती दैवीपणे याकोबासाठी परिवर्तीत झाली. (उत्पत्ती ३१:३८-४२)
याकोब हा कराराचा मुलगा आहे. लाबान जगाच्या पद्धतीला प्रतिनिधित करतो. आपण या जगात विश्वासणारे म्हणून आहोत, परंतु आपण या जगाचे नाहीत. या जगाची पद्धती लाबानासारखी कार्य करते. या जगात, व्यवसायात, बाजारात आणि जेथे कोठे तुम्ही वळता तेथे फसवणुकीचे पुष्कळ प्रमाण वापरले जातात. देवाची मुले म्हणून, देवाने मध्यस्थी करावी म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे जेणेकरून आपला पुरस्कार हा थोडक्यात बदलणार नाही. देवाने पाऊल टाकले पाहिजे जर आपण आपला पुरस्कार प्राप्त करायचा आणि त्याचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे. हेच ते याकोबाच्या जीवनात घडले. देवाने जे आशीर्वाद त्याच्या मुलांना द्यायचे आहेत ते अजूनही मागे धरून ठेवले आहेत.
२ इतिहास १५:७ म्हणते, “तुमच्या कर्तुत्वाचे तुम्हांला फळ मिळेल”. प्रत्येक कामाला पुरस्कार आहे. आणि देव आपल्याला शास्वती देतो की आपल्या कामाला पुरस्कृत केले जाईल. पाच वर्षे, सात वर्षे, किंवा दहा वर्षे तुम्ही काय काम केले आहे हे मला माहित नाही. हे वर्ष येशूच्या नावाने पुरस्कार आणि परिचयाचा तुमचा हंगाम आहे. जर कोणीही तो पुरस्कार खाऊन टाकत आहे, तर देव ते त्यांच्या हातातून घेईल आणि येशूच्या नावाने ते तुम्हांला परत करेल.
एस्तेर अध्याय ६, वचन ३ मध्ये, राजाने म्हटले, “ह्या कामगिरीबद्दल मर्दखयाचे काही गौरव अथवा मानसन्मान करण्यात आला काय?” मर्दखयाने राजाचे जीवन वाचवण्यासाठी मदत केली होती, पण त्याला पुरस्कृत करण्यात आले नव्हते. जरी त्याची नोंद केली गेली होती, तरी त्याला पुरस्कृत करण्यात आले नव्हते. योग्य वेळी, देवाने दैवीपणे पाऊल टाकले, आणि नोंदवही जोपर्यंत आणली जात नाही तोपर्यंत राजा झोपू शकला नाही आणि मर्दखयाला पुरस्कृत आणि ओळख देण्यात आली.
जो पुरस्कार तुमचा आहे तो तुम्हांला परत देण्यासाठी देवाची आवश्यकता लागते. मी प्रार्थना करतो की या हंगामात, तुम्ही येशूच्या नावाने पुरस्कार आणि परिचयाचा आनंद घ्याल. आपल्यापैकी बहुतेकांनी, सेवाकार्य, व्यवसाय, समाजात आणि इतरांच्या जीवनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी परिश्रम केलेले आहेत. एक किंवा इतर मार्गाने त्यातील काही लोकांनी आपल्याला ओळख दिलेली नाही, जेव्हा त्यांना आशीर्वादित केले गेले तेव्हा त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला नाही आणि त्यांनी आपल्याला पुरस्कार दिला नाही, परंतु देवाजवळ पुरस्कार देण्याची पद्धती आहे ते तुम्हांला पुरस्कार देईल जे तुम्हांला द्यायचे राहिले आहे. आणखी एक वचन जे आपण पाहावे अशी माझी इच्छा आहे ते उपदेशक अध्याय ९, वचने १५-१६ आहेत. ते म्हणते, “त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धीबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरण कोणाला राहिले नाही तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे; तथापि गरीबाची अक्कल लोक तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत.” शहाणपण हे उत्तम आहे पण या वचनात, तो माणूस बुद्धिमान होता तरीही तो गरीब होता. त्याच्या शहाणपणाने त्याने संपूर्ण नगराचा बचाव केला, आणि तरीही कोणीही त्याचे स्मरण केले नाही. मनुष्य, मुलभूतरित्या सहज विसरून जातात. म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणतो, “हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको” (स्तोत्र. १०३:२).
पतनानंतर, आपली स्मरणशक्ती चांगल्या गोष्टींसाठी खूपच कमी झाली. चांगल्या गोष्टी ज्या आपल्यासाठी केल्या आहेत त्यांना आपण सहज विसरून जातो पण इतरांनी ज्या वाईट गोष्टी आपल्या विरोधात केल्या आहेत त्यांना आपण आपल्या स्मरणशक्तीमध्ये राखून ठेवतो. जेव्हा लोक तुम्हांला विसरून जातात, तेव्हा देवाने पाऊल टाकावे म्हणून तुम्हांला प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे, म्हणजे तुमचे परिश्रम व्यर्थ होणार नाही. देव याची खात्री करेल की प्रत्यक्षपणे एकतर त्याच व्यक्तीकडून किंवा इतर स्त्रोतापासून तुमचा पुरस्कार तुम्ही प्राप्त कराल. तुम्ही एखाद्या विशेष ठिकाणी परिश्रम करू शकता आणि दुसऱ्या ठिकाणी पुरस्कृत केले जाता. देवाला सीमित करू नका.
ज्या सर्व घटना मी तुम्हांला सांगितल्या आहेत त्या प्रकट करतात की देव पुरस्कार देतो. देव तुमच्यासाठी हंगामाचा पुरस्कार आणू शकतो. तुमचे सर्व परिश्रम व्यर्थ होऊ शकत नाही जेव्हा तुम्ही देवाशी त्याच्या वचनाने धरून राहता. उत्पत्ती १५:१ मध्ये, देवाने अब्राहामाला सांगितले, “अब्रामा, भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.” देव म्हणाला तुला मोठे प्रतिफळ मिळेल.
देव त्यांना पुरस्कार देणारा आहे जे परिश्रमपूर्वक त्याचा शोध घेतात (इब्री. ११:६). म्हणजे देव त्याच्या मुलांना पुरस्कार देऊ शकतो. पौल आपल्याला प्रोत्साहन देतो की जे काही आपण करतो, ते देवासाठी करत आहोत म्हणून केले पाहिजे कारण हा तो देवच आहे जो आपल्याला पुरस्कार देईल. (कलस्सै. ३:२३-२४)
हा तुमचा पुरस्काराचा हंगाम आहे. तुम्ही उठावे आणि मध्यस्थी करावी म्हणून देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. तोच देव ज्याने याकोबाला पुरस्कृत केले तो तुम्हांलाही खात्रीने पुरस्कृत करेल. आज, आपल्या प्रार्थनेचे लक्ष्य हे पुरस्कार आणि परिचयाचा हंगाम सक्रीय करण्याबद्दल आहे.
माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या मनापासून प्रार्थना करावी कारण मी या वर्षात पाहतो की, देव तुम्हांला पुरस्कृत करेल, आणि तुम्हांला ओळखले जाईल आणि अस्पष्टतेपासून प्रसिद्धीच्या प्रकाशात येशूच्या नावाने उन्नत केले जाईल.
Bible Reading Plan : 2 Corinthians 10- Galatians 4
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. पित्या, माझ्या पुरस्काराचा आणि परिचयाचा हंगाम लवकर प्रकट व्हावा म्हणून येशूच्या नावाने कार्य कर. (इब्री. ११:६)
२. पित्या, माझ्यासाठी स्मरणवही उघड आणि या हंगामात मला आशीर्वादित कर. (मलाखी ३:१६)
३. मी वातावरणात माझ्या नावाला मोकळे करीन, जो कोणी मला मदत करण्यासाठी नियुक्त केलेला आहे तो मला चांगल्यासाठी येशूच्या नावाने मदत करील. (एस्तेर ६:१-३)
४. हे परमेश्वरा, येशूच्या नावाने तुझ्या पवित्र स्थानातून मला साहाय्य पाठव. (स्तोत्र. २०;२)
५. पित्या, माझे परिश्रम आणि चांगली कामे ही पुरस्कार आणि ओळखीसाठी येशूच्या नावाने कारणीभूत होऊ दे. (प्रकटीकरण १४:१३)
६. उन्नती, परिचय आणि उत्सवाचा हा माझा हंगाम आहे असे मी येशूच्या नावाने आदेश देतो. (स्तोत्र. ७५:६-७)
७. पित्या, माझ्यासाठी आवाज आणि मनुष्य उत्पन्न कर, म्हणजे माझ्यासाठी उच्च ठिकाणी येशूच्या नावाने त्यांनी बोलावे. (नीतिसूत्रे २२:२९)
८. माझे जीवन, कारकीर्द, सेवाकार्य आणि कुटुंबाला उद्धेशून दोष लावण्याचा आवाज आणि दुष्टता येशूच्या नावाने शांत केली जावी. (यशया ५४;१७)
९. सर्व गोष्टी मिळून माझ्या कल्याणासाठी येशूच्या नावाने काम करत आहे असा मी आदेश देत आहे. (रोम. ८:२८)
१०. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडून पुरस्कार आणि ओळखीच्या माझ्या हंगामाला येशूच्या नावाने मी बोलावत आहे. (अनुवाद २८:१२)
Join our WhatsApp Channel
Most Read
● आत्मे जिंकणे-ते किती महत्वाचे आहे?● दिवस ३९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● प्रभावीपणे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे
● विश्वास: परमेश्वराला संतोषविण्याचा एक निश्चित मार्ग
● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नूतनीकरण कसे करावे -१
● गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही
टिप्पण्या