डेली मन्ना
ख्रिस्त-केंद्रित घर निर्माण करणे
Monday, 27th of January 2025
22
17
211
Categories :
कुटुंब
आजच्या वेगवान आणि आव्हानात्मक जगात वैवाहिक जीवन आणि कुटुंब स्थिर ठेवणे हे लहान उद्धिष्ट नाही. त्यासाठी अटळ समर्पण, प्रयत्न आणि शहाणपणाची गरज लागते. तरीही, एक खरेच धार्मिक घर बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक हा देवाला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूंमध्ये आमंत्रित करणे आहे.
स्तोत्र. १२७:१ म्हणते, “परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत.”
ख्रिस्त-केंद्रित घर हे केवळ एक ठिकाण नाही जेथे ख्रिस्ती लोक राहतात परंतु निवास आहे जे ख्रिस्ताचे चारित्र्य आणि उपस्थितीला प्रतिबिंबित करते. ख्रिस्त-केंद्रित घराला काही वैशिष्ट्ये आहेत. चला
१.आपण त्याचा विचार करू या:
एक पाया जो ख्रिस्तावर आधारित आहे
ज्याप्रमाणे एका भौतिक रचनेला एक मजबूत पायाची आवश्यकता असते त्याप्रमाणे एक घर येशू वर स्थिर असले पाहिजे जेणेकरून जीवनाच्या वादळाच्या विरोधात भक्कम असे उभे राहावे. मत्तय. ७: २४-२७ मध्ये, येशू जो व्यक्ती खडकावर घर बांधतो त्याची तुलना जे त्याचे वचन ऐकतात आणि त्याचे पालन करतात त्यांच्याशी करतो. त्याप्रमाणे, एक ख्रिस्त-केंद्रित घर देवाच्या वचनात मुळावलेले आणि त्याच्या तत्वांद्वारे मार्गदर्शित असले पाहिजेत. हा पाया संकटाच्या काळात स्थिरता आणि टिकवून घेण्याच्या वृत्तीची निश्चिती करते.
असे करण्यासाठी काही व्यवहारिक पाऊले :
- एक कुटुंब म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात किंवा शेवट लहानशा प्रार्थनेने आणि वचन वाचण्याने करावे.
- जगिक प्रमाणापेक्षा पवित्र शास्त्राच्या मुल्यांवर आधारित निर्णय घ्या.
२.व्यवस्था आणि शांतीचे घर
१ करिंथ. १४:३३ मध्ये प्रेषित पौल आपल्याला स्मरण करून देतो की, “कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे.” एक ख्रिस्त-केंद्रित घर हे पूर्ण व्यवस्थेचे आहे-सर्वकाही अगदी नीटनेटके आणि पद्धतशीर असणे नाही, परंतु धार्मिक प्राधान्य आणि प्रमाण जपणारे असावे. कुटुंबाच्या सदस्यांनी देवाच्या इच्छेशी जे काही समरूप आहे किंवा नाही याचे नियमितपणे मुल्यांकन केले पाहिजे. प्रश्न जसे, “हे आपल्या कुटुंबाला विश्वासात वाढवत आहे का?” किंवा “हे कृत्य देवाचे गौरव करीत आहे का?” हे आध्यात्मिक व्यवस्थेला जपण्यास साहाय्य करते.
३.आध्यात्मिक शिस्तीचे एक ठिकाण
ख्रिस्त-केंद्रित घर हे आध्यात्मिक केंद्र आहे जेथे देवाच्या वचनाचा अभ्यास केला जातो, प्रार्थना केल्या जातात, आणि जीवनशैली ही उपासना असते. अनुवाद ६:६-७ मध्ये, “देव त्याच्या लोकांना त्यांच्या लेकरांना देवाचे वचन काळजीपूर्वक शिकणे आणि त्यांच्या संपूर्ण दैनंदिन आयुष्यात त्याच्याबद्दल बोलत राहावे याची आज्ञा देतो. पालक असा आध्यात्मिक शिस्तीचा नमुना दर्शविण्याद्वारे आध्यत्मीकदृष्ट्या प्रेरित घराण्यास स्थिर करतात.
४.कृपेने चिन्हित आश्रय
कोणतेही कुटुंब हे असहमती किंवा आव्हानावाचून नाहीत. सर्वात धार्मिक घरांमध्ये देखील, तेथे तणावाचे क्षण असतील. ख्रिस्त-केंद्रित घर हे तेथील कृपा आणि क्षमेच्या वातावरणामुळे वेगळे वाटते. इफिस. ४:३२ आपल्याला प्रोत्साहन देते, “आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.” जेव्हा पालक कृपा आणि क्षमेचा नमुना दर्शवतात, तेव्हा ते लेकरांनी त्यांच्या चुका स्वीकाराव्या आणि समेट करावा यासाठी एक सुरुक्षित ठिकाण निर्माण करते.
असे करण्यासाठी काही व्यवहारिक पाऊले :
- जेव्हा चुकलेले आहे तेव्हा स्वीकारा आणि त्वरित क्षमा करा.
- भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळा आणि पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा.
५.आदर्शाने नेतृत्व करा
यहोशवाची घोषणा, “मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार” (यहोशवा २४:१५), हे आध्यात्मिक आदर्श मांडण्यात पालकांच्या भूमिकेला महत्वपूर्ण ठरवते. लेकरे अनेकदा जे पाहतात तसेच करतात. पालक जे चर्च, प्रार्थना आणि उपासनेला प्राधान्य देतात, ते त्यांच्या मुलांना तसेच करण्यास प्रोत्साहन देतात.
व्यवहारिक पाऊले :
- चर्च आणि सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी प्रबळ समर्पण दर्शवा.
- इतरांबरोबर संवादामध्ये ख्रिस्तासमान प्रीती आणि नम्रता दर्शवा.
६.अधार्मिक प्रभावापासून संरक्षण देणे
जर ख्रिस्त हा घराचा प्रमुख नसेल, तर सैतान त्या जागेला भरण्यास पाहतो. नीतिसूत्रे ४:२३ आपल्याला ताकीद देते, “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.” पालकांनी त्यांच्या घरात कोणते प्रभाव शिरकाव करतात त्यावर लक्ष दिले पाहिजे, मग ते प्रसार माध्यमे, नातेसंबंध किंवा सवयी असोत.
व्यवहारिक पाऊले :
- कुटुंबाच्या सदस्यांनी टीवी किंवा मोबाईल वर काय पाहावे याच्या मर्यादा निश्चित करावे.
- तुमच्या घरासाठी प्रार्थना करा, कमीत कमी महिन्यातून एकदा त्यावर तेलाने अभिषेक करा जेणेकरून देवाच्या उपस्थितीसाठी ठिकाण म्हणून समर्पित करा.
ख्रिस्त-केंद्रित घर रातोरात निर्माण होत नाही, परंतु दैनंदिन हेतुपुरस्सर निवडी, प्रार्थना, आणि देवाच्या कृपेवर अवलंबून राहण्याने होते.
Bible Reading: Exodus 26-28
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावात, मी माझ्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना तुझ्याकडे समर्पित करतो.
पित्या, येशूच्या नावात, आजपासून, मी माझ्या स्वतःला आणि माझ्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना काहीही जे तुझ्या इच्छेच्या विरुद्ध आहे त्यापासून वेगळे करतो.
येशूच्या नावात, माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांवर (त्यामध्ये मी देखील आहे) असलेले मागील पिढीच्या सर्व वाईट सवयींना मी मोडून टाकतो.
मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सुटकेचा दिवस (दिवस १०)● वनातील मानसिकतेवर प्रभुत्व करणे
● उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा
● आपल्यामध्येच खजिना
● आशीर्वादाचे सामर्थ्य
● चर्चमध्ये ऐक्यता जपणे
● काहीही अभाव नाही
टिप्पण्या