तकोवा येथील मेंढपाळांतला आमोस याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम यांच्या काळी, भूमिकंपापूर्वी दोन वर्षे, इस्राएलाविषयी दृष्टांतरूपाने प्राप्त झालेली वचने. (आमोस १:१)
नांव आमोस याचा अर्थ ओझे किंवा ओझे वाहणारा. अनेक जण असा विचार करतात की परमेश्वर केवळ त्यांनाच बोलावितो जे पात्र व हुशार आहेत की त्याचा संदेश सांगावा किंवा त्याच्या राज्याची वाढ करावी. संदेष्टा आमोस एक उदाहरण असे चकाकते आपल्याला हे सांगत की अशा प्रकारचे विचार हे खरे नाही.
आमोस हा एक साधारण मनुष्य होता, एक शेतकरी, ज्यास अनोख्या रीतीने बोलाविले गेले होते. तो याजक, एक लेवी नव्हता, परंतु तकोवा येथील मेंढपाळांतला होता.
ज्याप्रकारे परमेश्वराने आमोस ला उपयोगात आणले हे आपल्याला त्या मार्गाची आठवण देते जसे त्याने येशूच्या बारा शिष्यांना उपयोगात आणले-साधारण, कामकरी लोक परमेश्वरासाठी महान गोष्टी करीत होते.
मग आमोस म्हणाला, परमेश्वर सीयोनेतून गर्जना करितो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवितो, मेंढपाळांची कुरणे शोक करितात व कर्मेलाचा माथा सुकून गेला आहे. (आमोस १:२)
इस्राएलाने परमेश्वराच्या प्रत्यक्ष अवज्ञेमध्ये, दान, बेथेल, व गीलगाल मध्ये उपासनेचे विरोधी केंद्र उभे केले. जेव्हा आमोस ने म्हटले की परमेश्वर यरुशलेमेतून बोलतो, त्याने सर्व इस्राएली लोकांना याची आठवण दिली की उपासनेचे खरे केंद्र हे कोठे आहे.
परमेश्वर म्हणतो, दिमिष्काचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण मळणी करण्याच्या लोखंडी यंत्रांनी त्यांनी गिलादला मळिले. (आमोस १:३)
लोखंडाचे उपयोगात आणणे याचा अर्थ निर्दयतेच्या अति क्रूर कार्याचा संदर्भ होऊ शकतो. देवाच्या लोकांबरोबर अत्यंत क्रूर व्यवहार करण्यासाठी दमास्कस वर देवाचा न्याय येईल.
परमेश्वर म्हणतो, गज्जाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी अदोमाच्या हवाली करण्यासाठी झाडून सर्व लोकांस बंदिवान करून नेले; तर मी गज्जाच्या तटावर अग्नि पाठवीन तो त्याचे महाल जाळून भस्म करील. (आमोस १:६-७)
लोखंडाचे उपयोगात आणणे याचा अर्थ निर्दयतेच्या अति क्रूर कार्याचा संदर्भ होऊ शकतो. एदोम ला देवाचे लोक (पुरुष, स्त्रिया व लेकरे) गुलाम म्हणून विकिले यासाठी गज्जावर परमेश्वराचा न्याय हा येईल.
परमेश्वराने गज्जाच्या तटावर अग्नि पाठविण्याचे आश्वासन दिले. शहराचे तट हे महत्वाचे संरक्षण यंत्रणा होते. जर शहराचे तट हे जाळून टाकिले, तर शहर हे शाबूत राहू शकत नाहीत.
परमेश्वर म्हणतो, सोराचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी झाडून सारे बंदिवान अदोमाच्या हाती दिले व ते भाऊबंदांबरोबर केलेला करार स्मरले नाहीत. (आमोस १:९)
सोर चा सुद्धा गज्जा सारखाच न्याय होईल.
परमेश्वर म्हणतो, अदोमाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; त्याने तरवार घेऊन आपल्या बंधूचा पाठलाग केला, त्याने आपला कळवळा दाबून टाकिला, तो आपल्या क्रोधाने एकसारखा तडफडत राहिला; त्याने आपला संताप सतत ठेविला. (आमोस १:११)
अदोमाचे लोक हे एसाव चे वंशज आहेत, जो याकोबाचा (नंतर त्यास इस्राएल हे नाव मिळाले) भाऊ आहे. अब्राहम व इसहाक मध्ये त्यांना समान वंशज आहेत. न्याय हा अदोमावर येईल कारण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भावा विरुद्ध क्रोध एकसारखा तडफडत ठेविला.
आपल्याला आपला क्रोध व संताप देवाला देण्यास शिकले पाहिजे व त्यास आपला बदला घेणारा होऊ दयावे. प्रिय मित्रांनो, कधीही बदला घेऊ नका. देवाच्या नीतिमान क्रोधासाठी त्यास सोडून दया. कारण पवित्र शास्त्र म्हणते, "मी बदला घेऊन, मी फेड करीन, असे प्रभु म्हणतो" (रोम १२:१९).
परमेश्वर म्हणतो, अम्मोन वंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढविण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरिले. (आमोस १:१३)
न्याय हा अम्मोन वर येईल कारण त्यांनी अक्षरशः बाळांना गर्भात चिरिले. हे आज गर्भपात करण्यासारखे आहे.