त्यांच्या पूर्वजांनी असत्यावर विश्वास ठेवला. यहूदाच्या लोकांनी परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यास हे असत्यच कारणीभूत झाले. (आमोस २:४)
एक जीवन हे काहीतरी आहे जे सत्य नाही.
प्रभु येशूने योहान १७:१७ मध्ये म्हटले, "तुझे वचन हे सत्य आहे"
स्तोत्र ११९:१६० म्हणते, "तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे"
एक जीवन जे काहीतरी आहे जे देवाच्या वचनात सापडत नाही.
एक जीवन हे नरकमय रचले आहे की व्यक्तीला वाईट मार्गाला न्यावे. त्याहूनही अधिक धोकादायक वास्तविकता ही आहे की मुलगा किंवा मुलगी खोट्याच्या मागे आंधळेपणाने काहीही विचार न करता चालतात जे त्याच्या किंवा तिच्या पित्याने आचरिले आहे.
अनेक लोक सरळपणे म्हणतात, "आम्ही केवळ ते आचरण ठेवत आहोत जे आमच्या पूर्वजांनी आचरणात आणले होते. आम्ही ते करीत आहोत जे आमच्या पूर्वजांनी केले." तुमच्या पूर्वजांनी जर वाईट गोष्टीचे आचरण ठेवले असले तर मग काय? याचा अर्थ हा आहे काय आपण सुद्धा वाईट गोष्टी आचरणात आणाव्यात?
परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाने पुष्कळ अपराध केले असल्यामुळे मी यहूदाला शिक्षा करीन. कारण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्यास नकार दिला. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. (आमोस २:६)
यहूदा विरोधात न्याय हा इतर लोक किंवा राज्या विरुद्ध केलेल्या अत्याचार मुळे नव्हता, परंतु याव्हे बरोबरच्या करारास मोडल्यामुळे होता.
मुले वडील यांनी एकाच स्त्रीशी शारिरिक संबंध ठेवले. त्यांनी माझे नाव धुळीला मिळवले. (आमोस २:७)
लेवीय १८:१८ व लेवीय २०:१-१२ मधील नियम पुत्र व पित्याला एकाच स्त्री बरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास मनाई करतो. असले कृत्य गोत्रगमन चा प्रकार व एका नैतिक व्यवस्थेचे घोर उल्लंघन असे मानले जाते, अशा प्रकारे देवाच्या पवित्र नामाला अपवित्र करतात.
एक मनुष्य त्याच्या मुलीला कर्ज भरण्यासाठी, बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा सरळपणे तो तिचे पालनपोषण करू शकण्यास असमर्थ असल्यामुळे विकू शकतो. अशा स्त्रियांसाठी नियमाने संरक्षण पुरविले होते (निर्गम २१:७-११ पाहा). हे असू शकते की इस्राएल मधील श्रीमंत मनुष्य फसवीत आहे व गरीब व्यक्तींचा फायदा घेत आहे की त्यांच्या मुलींना "लैंगिक सुख" देणाऱ्या सेविका म्हणून मिळवावे.
परंतु मी त्यांच्या वरील फळांचा
व खालील मुळांचा विध्वंस केला. (आमोस २:९)
हे संपूर्ण विनाश बद्दल बोलते
मी तुमच्यापैकी काही मुलांना संदेष्टे बनविले व तुमच्यातील काही तरुणांना नाजीर बनविले, इस्राएल लोकांनो हे खरे आहे!” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
“पण तुम्ही नाजीरांना मद्य प्यायला लावले व संदेष्ट्यांना संदेश देण्यास मनाई केली. (आमोस २:११-१२)
परमेश्वर इस्राएल ला घोषित करतो की त्यांच्याबरोबर इतका विश्वासुपणे व्यवहार केला असताना सुद्धा, ते त्याच्याबरोबर विश्वासू राहिलेले नाहीत, त्यांच्या स्वतःच्या पुत्रांचे त्यांनी ऐकले नाही, ज्यांना त्याने नियुक्त केले होते, आणि त्याहूनही वाईट, देवाची सेवा करण्यासाठी त्यांच्या पाचारणाशी तडजोड करण्यास प्रभावित केले. आज आपण किती सावधानीपूर्वक राहिले पाहिजे कारण आपण पुढील पिढीला आध्यात्मिकदृष्टया प्रभावित करीत आहोत.
“पण तुम्ही नाजीरांना मद्य प्यायला लावले व संदेष्ट्यांना संदेश देण्यास मनाई केली. (आमोस २:१२)
त्यांनी संदेष्ट्यांना आदेश दिला हे म्हणत, "भविष्यवाणी करू नको"
यावरून परमेश्वर क्रोधात आला. आपण संदेष्ट्यांना आदेश दिला पाहिजे हे म्हणत, "भविष्यवाणी कर"
त्या वेळी खूप शूर सैनिकसुध्दा पळून जातील. त्यांना कपडे घालण्याससुध्दा वेळ मिळणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो. (आमोस २:१६)
एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून येशूचे मागे चालत होता. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला,परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघाडाच पळून गेला. (मार्क १४:५१-५२)
येशूच्या अटके नंतरच्या वृत्तांता नंतर आपण ही कथा मार्क च्या शुभवर्तमान मध्ये पाहतो आणि संपूर्ण नवीन करारात हे सर्वांत कमी समजलेले कथन आहे. विद्वानांनी ह्या वृत्तांतास हे फारच विचित्र आहे असे वर्णन केलेले आहे.