म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. (रोम १२:१)
जिवंतयज्ञ
जुन्या करारात, अनेक यज्ञ हे अर्पिले जात होते. एकदा देवाला यज्ञ अर्पिला गेला, पक्षी किंवा प्राणी तो मृत होता आणि तो आता देवाचे गौरव करू शकला नाही. ते मृत यज्ञ होते.
परंतु नवीन करारात, आपल्याला जिवंत यज्ञ व्हावे यासाठी बोलाविले गेले आहे. एक जिवंत यज्ञ असे, आपण प्रतिदिवशी क्षणो क्षणी देवाला गौरव आणतो.
प्रेषित पौलाने लिहिले, "ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्या ठायी मला तुम्हांविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की, मी रोज रोज मरतो." (१ करिंथ १५:३१)
प्रेषित पौल दररोज शारीरिक असा मरण पावला नाही. याचा अर्थ त्याने दररोज त्याच्या शारीरिकतेवर प्रभुत्व मिळविले. तो दररोज तो संघर्ष जिंकत असे जो शरीर व आत्म्या मध्ये होत असे. हाच काय तो अर्थ आहे की जिवंत यज्ञ व्हावे.
कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यांत पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही. (रोम १२:४)
शरीराच्या कोणत्याची भागाला दुसऱ्या भागाने बदलता येऊ शकत नाही. प्रत्येक भागाचे एकमेव असे महत्त्व आहे. किल्ली ही आहे की त्याचे कार्य, त्याचेमहत्त्व ओळखावे, आणि ते विकसित करावे.
Chapters