english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बायबल भाष्य
  3. अध्याय ४
बायबल भाष्य

अध्याय ४

Book / 44 / 1454 chapter - 4
1227
कारण जर अब्राहाम हा चांगल्या कामा द्वारे न्यायी ठरला [अपराधा पासून मुक्त होण्याद्वारे न्यायी ठरणे] तर त्यास गर्व करण्यास जागा आहे. परंतु देवासमोर नाही! (रोम ४:२)

जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो तेव्हा आपले स्वतःचे काम हे आपल्याला गर्व करू देईल (२ करिंथ १०:१२). तथापि, देवाच्या दृष्टीसमोर, आपल्यापैकी कोणीही कशाविषयीही अभिमान बाळगू शकत नाही.

कारण शास्त्र काय सांगते? अब्राहामाने देवावर विश्वास [भरवसा] ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व [देवाबरोबर योग्य जीवन व योग्य संबंध असणे] असे गणण्यात आले. (रोम ४:३)

ग्रीक शब्द "लोगीझोमाय" जो येथे "गणण्यात" असे भाषांतरीत करण्यात आला आहे. आणि याचा अर्थ "यादी घ्यावी, म्हणजे "अंदाजे किंमत ठरविणे". हा हिशोब ठेवण्याचा शब्द आहे, याचा अर्थ "हिशोबाच्या लेखात प्रवेश करणे".

आता जो काम करितो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण [काहीतरी त्यास देणे असतो] अशी गणली जाते. पण जो काम करीत नाही [नियमानुसार] तर अभक्ताला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवतो [पूर्ण विश्वास ठेवतो] त्याचा विश्वास नीतिमत्व [देवासमोर स्वीकारयोग्य आचरण] असा गणण्यात येतो. (रोम ४:४-५)

पौल हे म्हणत आहे की जर एक व्यक्ति हा कामा द्वारे तारण प्राप्त करू शकतो, तर परमेश्वरा त्या व्यक्तीला तारण हे एक पगार असे पुरवीत असेन, आणि अर्थातच, याचा काही अर्थ लागत नाही.

येशूच्या पूर्ण केलेल्या कामात विश्वास हे आपल्याला नीतिमत्व देते; आपले कार्य नाही. तथापि, खरा विश्वास योग्य कृती निर्माण करेल (याकोब २:१७-१८), आणि ही कार्ये, किंवा त्याचा अभाव, हे इतरांद्वारे वापरले जाऊ शकते की आपण परमेश्वरा बरोबर स्थिर उभे आहोत की नाही याची खात्री करावी. (१ योहान ३:७-१०)

देव मेलेल्यांना जिवंत करितो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करितो. (रोम ४:१७)

परमेश्वराने बोलले सर्व काही अस्तित्वात येवो आणि ते सर्व तसे झाले. परमेश्वराने आपल्याला तेच सामर्थ्य दिले आहे की विश्वासाने-भरलेल्या शब्दाने निर्माण करावे (नीतिसूत्रे १८:२०-२१). जर आपण देवाच्या विश्वासाच्या प्रकारा प्रमाणे कार्य करू लागलो, आपल्याला त्या गोष्टींना बोलणे शिकले पाहिजे जे नाहीत जसे काही ते तेथे आहेत.

परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. (रोम ४:२०)

प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्याच्या स्तुति करता तुमचा विश्वास हा समर्थ होतो. प्रभु येशूने स्तुति ला शक्ति बरोबर जोडले आहे. (मत्तय २१:१६)

तो प्रभु येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपल्याला परमेश्वरा समोर नीतिमान ठरवावे म्हणून तो उठला आहे. (रोम ४:२५)

येथे कारण होते की ख्रिस्त का मरण पावला व पुन्हा उठला. हे वचन ते स्पष्ट करते. मरण पावला आपल्या पापामुळे, व पुनरुत्थित झाला की देवासमोर आपल्याला नीतिमान ठरवावे.

Join our WhatsApp Channel

Chapters
  • अध्याय १
  • अध्याय २
  • अध्याय ३
  • अध्याय ४
  • अध्याय ५
  • अध्याय १०
  • अध्याय ११
  • अध्याय १२
  • अध्याय १३
  • अध्याय १४
  • अध्याय १५
  • अध्याय १६
मागील
पुढे
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन