प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. (रोम १३:१)
अधीन राहणे व आज्ञाधारक असणे यामधील फरक समजण्यास चूक केल्याने अनेक चुकीच्या शिकवणींना जन्म दिला आहे ज्यामुळे काही लोकांना बहकून जावयास लाविले आहे. अधर्मी आज्ञा स्वीकारल्याशिवाय कोणी व्यक्ति अधीन होऊ शकतो. याचे उदाहरण हे प्रेषित पेत्र आहे. त्याने मुख्य याजकाचे ऐकण्यास नकार दिला जेव्हा त्यांनी आदेश दिला की येथून पुढे येशूच्या नांवाने काही प्रचार किंवा शिकवू नये. (प्रेषित ४:१८-१९)
प्रभु येशूला हे ठाऊक होते आणि हेच तर कारण होते त्याने पिलाताला म्हटले, "तुला माझ्यावर काहीही अधिकार नसता जर ते तुला तो वरून देण्यात आला नसता." (योहान १९:११)
म्हणून जो अधिकाराला आड येतो; तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणांवर दंड ओढवून घेतील. (रोम १३:२)
प्रारंभीचे ख्रिस्ती लोक सर्वात भ्रष्ट व निर्दयी सरकार खाली राहिले. रोमन सम्राट हे स्वतःला प्रभु म्हणून घेत होते. तरीही पवित्र शास्त्रात कोठेही तुम्हांला हे सापडणार नाही की कोणा विश्वासणाऱ्यास काही सुचना दिलेल्या आहेत की सरकारला उलथून टाकावे व त्यास बदलावे. याउलट, पौलाने सरकारमधील त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करण्याचा आदेश दिला आहे. (१ तीमथ्यी २:१-४)
कारण चांगल्या कामाला अधिकाऱ्याची भीति असते असे नाही तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकाऱ्याची भीति नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल. (रोम १३:३)
येथे यासाठी काही अपवाद आहेत. तथापि, सत्य हे आहे की वाईट सरकार सुद्धा चांगल्या साठी ठाम राहिलेले आहे. प्रेषित पौल हा याचे उदाहरण होता. अनेक वेळेला रोमन सरकार त्याच्या समर्थनात उभे राहिले.
Join our WhatsApp Channel
Chapters
