परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तूं आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषक देवो. (रुथ २: १२)
हे एक आश्चर्यकारक वचन आहे.
आणि चालता चालता पेंढ्यातून मूठमूठ टाकीत जा; तिला वेचू दया, तिला धमकावू नका. (रुथ २: १६)
हे सुद्धा सुंदर होते. बवाज ला रुथ ला आशीर्वादित करावयाचे होते, परंतु त्यास तिला तिच्या मानसन्मानास ठेच पोहोचावयाचे नव्हतेकी तिच्यावर दया करून तिला दान दयावे. म्हणून त्याने काही धान्य पडू दिले, जसे काही ते अपघाताने झाले आहे, म्हणजे ते ती गोळा करू शकेन.
नामी आपल्या सुनेस म्हणाली, ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करावयाचे सोडिले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास हक्क आहे. (रुथ २: २०)
इस्राएल मधील प्रत्येक वंशांमध्ये, कुटुंबाच्या प्रमुखाला सांभाळ करणारा उद्धारित असे समजले जात होते, जो कुटुंबाच्या कल्याणासाठी जबाबदार आहे. ह्या व्यक्तीकडून अपेक्षा केली जात असे की त्याने सोडवावे, खंडणी दयावी, पुन्हा मिळवावे, प्राप्त करावे किंवा कोणाचाही उद्धार करावा किंवा कोणतीही संपत्ति जी गरिबी, युद्ध किंवा मृत्यू द्वारे वंशामधून कायमचे वेगळे केल्या जाण्याच्या धोक्यात आहे (लेवीय २५: २५-५५).
बवाज, नामी च्या कुटुंबासाठी सांभाळणारा-उद्धारित असा झाला.
या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरिणीबरोबर सरवा वेचिला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली. (रुथ २: २३)
प्रत्येक दिवशी, रुथने सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत बवाजाच्या शेतात सरवा वेचिला. ही योग्य गोष्ट होती करण्याची कारण त्यामुळे ती तिच्या सासूला साहाय्य करू शकत होती.
जरी जेव्हा ते एक नियमित कार्य होते तरीसुद्धा योग्य कार्य करण्यात तीसातत्य राखून होती.
दिवस रात्र काहीतरी सतत करीत राहणे हे विश्वासाची एक मोठी झेप घेण्यासारखे काही उत्साहपूर्ण असे नाही, परंतु पारितोषिक हे तसेच मोठे आहे. रुथ बवाजाच्या शेतात फार वेळपासून वेचित होती आणि सातत्य राखून होती की तेथील कापणी करणारे तिला नावाने ओळखत होते आणि बवाज ने तिला त्या जमावातून ओळखले.
Join our WhatsApp Channel