डेली मन्ना
23
17
175
कोणाच्या वार्तेवर तुम्ही विश्वास ठेवाल
Wednesday, 16th of July 2025
Categories :
मोक्ष
"आम्ही ऐकलेल्यावार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रगट झाला आहे? (यशया ५३: १)
एका देवाच्या मनुष्याला त्याच्या एका प्रार्थनेच्या समया दरम्यान दृष्टांतामध्ये वर स्वर्गात नेण्यात आले. स्वर्गाला त्याच्या भेटी दरम्यान, त्याने एक चमकणारे पुस्तक पाहिले. त्याने परमेश्वराला विचारले, हे पुस्तक काय आहे? परमेश्वराने स्मित हास्य केले आणि त्याला स्वतःलाच ते पाहण्यास सांगितले. ते बायबल होते. जे काही त्याने पाहिले त्याने त्यास आश्चर्यात टाकले, बायबल यशया ५३ हा अध्याय उघडा होता.
आजचे वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते कीअनेक हे तारणाच्या सुवर्तेच्या संदेशाचा नकार करतील. अनेक लोक तारणाच्या संदेशाला विविध कारणांसाठी नकार करतात.
काही लोक हे समाजाला घाबरतात जर त्यांनी तारणाच्या संदेशाला स्वीकारले तर त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात येईल. योहान ९: २२ मध्ये आपण पाहतो कीआंधळ्या मनुष्याचे आई-वडील ज्यास येशूने बरे केले होते, यहुद्यांच्या भीतीमुळे, त्यांनी त्यास ख्रिस्त असे मानले नाही. त्यांना याची सुद्धा भीती वाटली की त्यांना सभास्थानातून बाहेर काढून टाकण्यात येईल.
आज सुद्धा, मनुष्य आणि समाजाच्या भीतीमुळे तारणाच्या खऱ्या संदेशासाठी अनेक जण हे तडजोड करतात.
त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला ठाऊक आहे काय ज्या मनुष्याला स्वस्थ केले आणि त्यास सभास्थानाबाहेर काढूनटाकले- हा मनुष्य हे पाहत आहे की येशू त्याची वाट पाहत आहे.
आज, देवाच्या वचना करिता एक भक्कम विचार घ्या. तुमचा पुरस्कार हा तुम्ही येशूला प्राप्त कराल. याईर प्रमाणे व्हा जो उघडपणे येशूच्या चरणावर पडला आणि समाजामध्ये त्याचे पद आणि स्थान याचाविचार न करता आणि परिणामाचा शेवट हा त्याची मुलगी पुन्हा जिवंत झाली.
Bible Reading: Proverbs 12-15
अंगीकार
मला सत्य ठाऊक आहे आणि सत्याने मला मुक्त केले आहे. येशू हा माझ्याजीवनाचा प्रभु आहे, माझा परमेश्वरा आणि माझ्या आत्म्याचा तारणारा.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुमचे हृद्य तपासा● तुमच्या समस्या व तुमचा दृष्टीकोन
● प्रार्थनेची निकड
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – २
● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● देवाच्या प्रकारची प्रीति
टिप्पण्या