डेली मन्ना
16
15
128
पवित्रआत्म्याच्या सर्व वरदानांची मी इच्छा करू शकतो काय?
Saturday, 4th of October 2025
Categories :
पवित्र आत्म्याची भेट
"बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही" (१ करिंथ १२:१). लक्षात ठेवा, सैतानाचे यश हे आपल्या अजाणतेपणावर अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ही वरदाने कशी प्राप्त करावी व त्यास कसे कार्यरत ठेवावे हे समजता, तेव्हा तुम्हाला शत्रूवर सामर्थ्य व अधिकार राहील.
नुकतेच मी ऐकले की कोणी हे शिकविले की तुम्ही पवित्र आत्म्याची एक किंवा दोन वरदानाची इच्छा करू शकता परंतु पवित्रआत्म्याच्या सर्व वरदानांची इच्छा करणे हे स्वार्थीपण आहे. सत्यापासून काहीही दूर नाही.
मनोरंजक आहे प्रेषित पौल प्रीति वर त्याचा प्रसिद्ध अध्याय पूर्ण करतो (१ करिंथ १३) आणि १ करिंथ १४:१ सुरु करतो, हे म्हणत, "प्रीति हे तुमचे ध्येय असू दया; तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा."
याचा स्पष्ट अर्थ हा आहे परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्या सर्व वरदानांची इच्छा बाळगावी, स्वार्थी कारणासाठी परंतु "चर्च ची उन्नति व्हावी आणि त्यापासून तिने चांगले प्राप्त करावे (१ करिंथ १४:५). म्हणजे आपण आत्म्याच्या सर्व वरदानांची इच्छा बाळगावी कारण हास्वयं देवाचा आदेश आहे.
"परंतु श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा" (१ करिंथ १२:३१).
प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, एखादया चांगल्या गोष्टीसारखे, वरदानाचादुरुपयोग किंवा गैरवापर केला जाऊ शकतो परंतु कोणी म्हटले आहे, "दुरुपयोग हा निश्चितच दुर्लक्षित करण्यासाठी कारण नाही."
करिंथ चर्च मधील मंडळीला हे गुपितमाहीत होते आणि पवित्र आत्म्याची सर्व वरदाने त्यांची उपासना व सेवे मध्ये प्रगट व्हावीत यासाठी ते आवेशी होते म्हणजे ते ज्या समाजात राहत आहेत त्यावर त्याचा मोठा प्रभाव व्हावा. प्रेषित पौलाने हे जाणून त्यासाठी त्यांची प्रशंसा केली. त्याने पुढे त्यांना प्रोत्साहन देत म्हटले: "तरआता तुम्ही त्या गोष्टींविषयी अधिक उत्सुकराहा, जे संपूर्ण चर्च ला सामर्थ्यशाली करते. (१ करिंथ १४:१२ ऐम्पलीफाईड)
Bible Reading: Zephaniah 1-3; Haggai 1
अंगीकार
पित्या, येशूच्या नांवात,असे होवोकीतुझे गौरव व महिमे साठी माझे जीवन पवित्र आत्म्याची सर्व वरदाने प्रगट करण्यास सुरु करो.
Join our WhatsApp Channel

Most Read
● मध्यस्थी करणाऱ्यांसाठी एक भविष्यात्मक संदेश● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २
● अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
● देवाचे ७ आत्मे: उपदेशाचाआत्मा
● वेदीवर अग्नी कसा प्राप्त करावा
● चिकाटीची शक्ती
टिप्पण्या