english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दिवस १८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
डेली मन्ना

दिवस १८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे

Tuesday, 9th of December 2025
31 22 277
Categories : उपास व प्रार्थना

शापाला मोडणे


"याकोबावर काहीं मंत्रतंत्र चालावयाचे नाहीत; इस्राएलावर काहीं चेटूक चालावयाचे नाही." (गणना २३:२३)

शाप हे शक्तिशाली आहेत; शत्रू त्यांचा उपयोग नशिबास मर्यादित करण्यासाठी करू शकतो. शापाभोवती काही रहस्ये आहेत ज्याविषयी अधिकतर विश्वासणारे अज्ञात आहेत.

अनेक विश्वासणाऱ्यांना हे ठाऊक नाही की देवाचे वचन योग्यपणे कसे भाषांतरित करावे. गलती. ३:१३ म्हणते, ख्रिस्ताने आपणांला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले आहे. ख्रिस्ताने आपणांस कोणत्या प्रकारच्या शापापासून सोडविले आहे? हा तो शाप आहे जो "मोशेच्या नियमशास्त्रासंबंधी" होता.

येथे तीन मुख्य प्रकारचे कायदे आहेत जे तुम्ही स्पष्टपणे समजावे अशी माझी इच्छा आहे, जे पुढील प्रमाणे आहेत:

१. दहा आज्ञा. या नियमांना "कायदा" असे देखील संबोधले गेले आहे.

२. पेंटाट्युख, म्हणजे पवित्र शास्त्राची पहिली पाच पुस्तके (उत्पत्ति, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद): यांना देखील नियमशास्त्र असे संबोधले गेले आहे.

३. देवाचे वचन. प्रत्येक वचन जे देवाच्या मुखातून बाहेर येते त्यास देखील "नियमशास्त्र" असे संबोधले गेले आहे, कारण देव एक राजा आहे, आणि एका राजाचा बोललेला प्रत्येक शब्द हा बोललेले नियम आहे.

ख्रिस्ताने आपल्याला मोशेच्या नियमशास्त्रात असलेल्या नियमांपासून सोडविले आहे. त्याने इतर विधींच्या नियमांपासून देखील आपल्याला सोडविले आहे जे धार्मिकता मिळविण्यासाठी बनविले गेले होते.

एक ख्रिस्ती व्यक्ति शापित असू शकतो काय?

सत्य हे आहे की एक ख्रिस्ती व्यक्ति ज्याचे देवाबरोबर मजबूत संबंध आहेत तो शापित केला जाऊ शकत नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत जेथे शाप हा एका ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतो, परंतु त्याचा हा अर्थ नाही की एक ख्रिस्ती व्यक्तीला "सरळपणे शापित" केले जाऊ शकते.

ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात शाप कार्य करू शकतील अशा कोणत्या परिस्थिती आहेत? 

  • शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात जर तो देवाच्या संगतीच्या बाहेर चालत असेन.
  • शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात जर त्याने पापाच्या जीवनशैलीने जगण्याद्वारे कुंपण मोडले आहे. कारण की जेव्हा आपण १०० टक्के सिद्ध नाहीत, तेव्हा हे शक्य आहे की कधी कधी पाप करावे परंतु जेव्हा व्यक्तीला पापाची कायमची जीवनशैली आहे, तेव्हा शाप अशा व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात कारण त्याने सैतानाला स्थान दिले आहे. (इफिस. ४:२७)
  • शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात जर एक ख्रिस्ती व्यक्ति त्याची कराराची सुरक्षितता, स्थान आणि अधिकारासंबंधी अज्ञात आहे.
  • शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात जर एक ख्रिस्ती व्यक्ति देवाला लुबाडत आहे किंवा देवाच्या गोष्टींचा अपमान करीत आहे.
  • शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात जर ख्रिस्ती व्यक्ति देवाची आज्ञा मोडून जगत असेल.
  • शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात जर ख्रिस्ती व्यक्ति प्रार्थना करू शकत नाही आणि पापाविरुद्ध त्याचा अधिकार वापरू शकत नाही. हेच जे तुम्ही कार्यरत करता त्याचाच तुम्ही आनंद घेता. एका ख्रिस्ती व्यक्तीने आध्यात्मिक युद्धामध्ये निष्क्रिय नसावे.

जर एका ख्रिस्ती व्यक्तीने कोणाला फसविले आहे किंवा इतरांचे वाईट केले आहे, जर त्यांनी त्यास शाप दिला, तर ते कार्य करू शकते. शापाने कार्य करण्यासाठी येथे कारण आहे. शापाने कार्य करण्यासाठी येथे कायदेशीर आधार आहे. नीतिसूत्रे २६:२ म्हणते, "....निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही."

शापाबद्दल वास्तविकता

  • शाप निश्चित करू शकतात की जीवनात किती जलद आणि किती लांबचा पल्ला तुम्ही गाठू शकता.
  • शाप हे आध्यात्मिक शस्त्र आहेत ज्यांस नशिबाच्या विरोधात कार्यरत करू शकतात.
  • शाप हे आजार, अपयश आणि मृत्यूकडे नेऊ शकते.
  • शाप आशीर्वादाच्या उलट आहेत.
  • शाप विनाशकारक आहेत.
  • शाप मोडले जाऊ शकतात.
  • जेव्हा शाप दिले जातात, जर त्यासाठी कोणतीही विशेष वेळ जुळलेली नाही, तर ती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालू राहू शकते.
  • ते जे अधिकारामध्ये आहेत त्यांच्याजवळ शाप किंवा आशीर्वाद देण्याचे सामर्थ्य आहे.
  • स्वतःहून ओढून घेतलेले शाप हे शापांचे सर्वात धोकादायक प्रकार आहेत. 
  • सामान्य शाप आहेत.
  • सामान्य आशीर्वाद आहेत.

शापांच्या कार्याची पवित्रशास्त्रातील उदाहरणे:

१. गेहजी आणि त्याच्या पिढीला कुष्ठरोगाचा शाप देण्यात आला. (२ राजे ५;२७)

२. यहोशवाने यरीहोस शाप दिला. यहोशवा ६:२६ मध्ये, यहोशवाने यरीहोस शाप दिला; आणि जवळजवळ ५३० वर्षानंतर, हिएल नावाच्या माणसाने यरीहो पुन्हा बनविले, आणि त्या माणसाच्या प्रथम आणि शेवटच्या पुत्राविरुद्ध शाप हा कार्यरत केला गेला. (१ राजे १६:३४ पाहा)

एकतर हिएलने शापाची अवहेलना केली किंवा तो त्याविषयी अज्ञानी होता. अज्ञान माणसाला शापाच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्त करू शकत नाही, त्यामुळेच एखादया ख्रिस्ती व्यक्तीने असे समजू नये की वंशातील कोणत्याही अस्तित्वातील शापाबद्दल अज्ञानी राहणे याचा अर्थ त्यापासून सुटका झाली आहे.

३. आदामास आशीर्वादित केले गेले होते, परंतु त्याच्या आज्ञा मोडण्याने शापाकडे नेले. परमेश्वर पाप क्षमा करीत नाही; तो पाप्यास प्रेम करतो परंतु पापाप्रती आपली निष्काळजीपणाची वागणूक सहन करीत नाही. आपण पापाविरुद्ध लढा दिला पाहिजे. (उत्पत्ति ३:१७-१९)

४. बालाक आणि बलाम. बालाकाने बलामास कामासाठी घेतले होते; त्याची इच्छा होती की त्याने इस्राएलास शाप दयावा जेणेकरून तो त्यांचा पराभव करू शकेन. बालाकाने कोणालाही शाप देण्याच्या आध्यात्मिक प्रभावास समजले होते आणि त्याची इच्छा होती की त्यांच्याबरोबर आध्यात्मिक युद्ध सुरु करण्याअगोदर आध्यात्मिक बाण सोडावे (शाप). जर बालाम हा इस्राएली लोकांना शाप देण्यात यशस्वी झाला असता, तर मोआबी लोकांविरोधात कोणत्याही भौतिक युद्धात त्यांचा पराभव झाला असता.

शापांना कसे मोडावे.

  • आत्म्याने पारख करा जर तेथे शाप कार्यरत आहे.
  • शापाच्या कारणावर दैवी प्रकटीकरणासाठी प्रार्थनापूर्वक धावा करा.
  • कोणतेही ज्ञात व अज्ञात पापापासून पश्चाताप करा ते सैतानाला आणि पापाला कदाचित एक कायदेशीर आधार देईल. देवाचे अभिवचन निवडा ज्याचा उपयोग तुम्ही आत्म्याची तरवार म्हणून कराल. तुम्हीं वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि देवाची इच्छा जाणली पाहिजे. ही देवाची इच्छा आहे की तुम्ही शापाचे बालेकिल्ले आणि कार्यांना नष्ट करावे.
  • एखादया परिस्थितीवर येशूचे रक्त लावा, आणि त्या शापाद्वारे कायदेशीर आधारांना मोडून काढा.
  • देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा, आणि देवाने हस्तक्षेप करावा म्हणून प्रार्थना करा. युद्धमय प्रार्थनेची गरज आहे की भूतांना त्या शापांद्वारे कार्य करण्यापासून बांधून टाकावे. 
  • भविष्यात्मक आदेश व घोषणा कार्यरत करण्याद्वारे ख्रिस्तामधील तुमच्या अधिकाराचा वापर करा. तुम्ही सतत त्या आशिर्वादांना कबूल करावे जे त्या शापांच्या विरोधात कार्य करतील.
  • पवित्रतेमध्ये जगा, पापमय जीवनशैलीमध्ये जाऊ नका.

शाप हे शक्तिशाली आहेत, आणि तुमच्या जीवनात तुम्ही त्याच्या विरोधात युद्ध केले पाहिजे. देवाची इच्छा आहे तुम्ही अंधाराची कार्ये नष्ट करावीत जे तुमच्या नशिबावर परिणाम करीत आहते. ही तुमची जबाबदारी आहे, आणि तुम्हांकडे अधिकार आहे. तुमच्या आत्म्यामध्ये क्रोधीत व्हा आणि तुमच्या जीवनाविरुद्ध दिले गेलेल्या वाईट शापांना नष्ट करा. मी तुमच्या जीवनावर घोषित करतो की कोणताही शाप जो तुमच्या जीवनाविरुद्ध कार्य करीत आहे तो आज येशूच्या नावात मोडला जावा.

बायबल वाचन योजना: योहान २० , प्रेषितांची कृत्ये ४
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र कमीत कमी २ मिनिटे किंवा तुमच्या आत्म्यात सुटका जाणवेपर्यंत प्रार्थना करा.

१. माझ्या नशिबाच्या विरोधात कार्य करणारे कोणतेही नकारात्मक करार येशूच्या नावाने नष्ट होवो.

२. माझ्या वंशपरंपरागत प्राप्त प्रत्येक नकारात्मक शापाला मी येशूच्या नावाने मोडतो.

३. पूर्वजांची शापे आणि वाईट वेद्यांपासून येशूच्या नावाने मी स्वतःला वेगळे करीत आहे. 

४. मला शाप देणाऱ्या कोणत्याही जादुई व्यक्तीवर मी अधिकार घेतो; असे होवो की येशूच्या नावाने ती शापे आशीर्वादामध्ये बदलून जावीत.

५. कोणतेही शाप जे माझ्या जीवनाविरुद्ध सोडले आहे, हे पित्या, येशूच्या नावाने त्यास आशीर्वादामध्ये बदल.

६. माझी प्रगती आणि संपत्तीच्या विरोधात कार्य करणाऱ्या कोणत्याही तत्वांना मी येशूच्या नावाने बांधत आहे.

७. माझ्या वंशपरंपरागत प्राप्त मूर्तिपूजेचे नकारात्मक प्रभाव येशूच्या नावाने मी नष्ट करीत आहे.

८. पित्या, येशूच्या नावाने माझ्या नशिबाच्या विरोधात कार्य करणारा कोणत्याही शापापासून मला मुक्त कर.

९. येशूच्या रक्ताद्वारे, येशूच्या नावाने माझ्या नशिबाच्या विरोधातील वडिलोपार्जित कोणत्याही शापास मी निष्कामी करीत आहे.

१०. अपयशाचा आत्मा आणि माझ्या जीवनावरील आदेशास मी अस्वीकार करतो; येशूच्या नावाने मी यशस्वी होईन.

११. देवाच्या सामर्थ्या, येशूच्या नावाने वंशपरंपरागत वारशाने प्राप्त केलेल्या प्रत्येक शापापासून मला मुक्त कर.

१२. कोणतीही वाईट शक्ती जो चांगल्या गोष्टींना मजकडे येण्यापासून अडथळा करीत आहे; येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीने मी तुला मोडून काढीत आहे.

Join our WhatsApp Channel


Most Read
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -६
● परमेश्वराचा धावा करा
● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
● परमेश्वरा सोबत चालणे
● बहाणा करण्याची कला
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
● दिवस १७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन