ह्या जगाचे व्यवहार व आचरणाचे अनुकरण करू नका, तर जसे तुम्ही विचार करता त्यात बदल करण्याद्वारे देव तुम्हाला एका नवीन मनुष्यात रुपांतर करो. (रोम 12:2)
जे सर्व काही ह्या जगात आहे ज्यास कोणत्याही प्रकारचीमुल्ये आहेत ते तुम्हाला अत्यंत महागडे पडेल. कोणीतरी म्हटले आहे, "स्वप्न पूर्ण होण्यासाठी अगोदर किंमत भरावी लागते. स्वप्ने ही मोफत आहेत परंतु ती पूर्ण करण्याचा मार्ग हा सोपानाही. येथे किंमत मोजावयास लागते.
ख्रिस्ताचे शिष्य म्हणून, सुद्धा आपल्याला प्रभू बरोबर घनिष्ठ संबंधात चालावे लागते. दोन प्रकारचे जीवन जगणे याचा प्रश्नच राहत नाही. देवाच्या उपस्थितीला घेऊन चालण्यासाठी किंमत मोजावी लागते.
यिर्मया ला परमेश्वरा द्वारे पाचारण झाले होते जेव्हा तो केवळ एक तरुण मनुष्य होता. तो लिहितो, "विनोद करणाऱ्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात मजवर पडल्यामुळे मी एकांती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहे." (यिर्मया 15:17)
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की जगाबरोबर मैत्री ही तुम्हाला देवाची वैरी करते.(याकोब 4:4) यिर्मया ला ही वास्तविकता स्पष्टपणे ठाऊक होती आणि त्यास एकटेच चालावयाचे होते. एक तरुण मनुष्य असे, ते कठीण होते परंतु त्यास ठाऊक होते की तो जगाबरोबर मिसळू शकत नाही आणि त्याच वेळेला देवाचा मित्र होऊ शकत नाही.
दुसरे, आपण आपल्या विचारसरणी व जीवनशैली वर जगिक आणि धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानाचा प्रभाव होऊ देऊ नये.
त्याऐवजी, आपण केवळ देवाच्या वचनाला आपल्या विचारसरणी आणि जगण्यावर प्रभाव पाडू दयावे. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपण काही लोकांना दुखवू शकतो. सर्वात कठीण निर्णय प्रतिदिवशी जो आपल्याला घ्यायचा आहे की आपण देवाला प्रसन्न करणारे व्हावे की मनुष्याला. प्रभू आणि त्याचे वचन पाळणे हे नेहमीच किंमत मोजावयास लावते.
तिसरे, आपल्या सर्वांना स्वतःच्या जीवनासाठी योजना आहेत. जीवनासाठी योजना असणे यात काही चूक नाही, वगैरे, परंतु त्याच वेळेला, आपण आपल्या योजना त्यागण्यास तयार असले पाहिजे जर तसे प्रभूने आपल्याला करावयास लावले. प्रभु येशूने म्हटले, "ते जे ह्या जगात त्यांच्या जीवनावर प्रेम करतात ते त्यास गमावितील. (योहान 12:25)
येथे असे अनेक आहेत जे भल्या पहाठे उठून आणिप्रभूचा धावा करण्यासाठी किंमत मोजत नाहीत, उपासआणि प्रार्थना करण्याची किंमत, लोकांना क्षमा करण्याची किंमत वगैरे. मग ते आश्चर्य करतात की का इतका वेळ होत आहे की जीवनात त्यांच्या गंतव्य स्थानाकडे जावे. हे पेरणे आणि कापणी करण्याच्या नैसर्गिक नियमाकडेनेते. जर तुम्ही बीज पेरले नाही आणि त्याची किंमत भरली नाही, तुम्ही जीवनात संथ गतीने प्रगती कराल जेव्हा तुम्ही पाहाल की इतर हे जलद प्रगती करीत आहेत.
पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की जरी दानीएल ला हे ठाऊक होते की एक नियम हा जारी केला गेला आहे जोकोणालाही प्रभू कडे प्रार्थना करण्यास प्रतिबंध करतो, तो घरी गेला, गुडघ्यावर आला, आणि प्रार्थना केली जसे तो नियमित करीत आला होता. (दानीएल 6:10)
दानीएल ला स्पष्टपणे ठाऊक होते की जर तो असे करीत असताना पकडला गेला, तर त्यास सिंहाच्या गुहेत टाकले जाईल आणि जिवंत मारले जाईल. तरीसुद्धा, तो ही मोठी किंमत भरावयास तयार होता की प्रभू बरोबर घनिष्ठ संबंधात असावे. मग यात काही आश्चर्य आहे काय कीप्रभु दानीएल च्या वतीने चमत्कारीत रीतीने प्रकट झाला?
सत्य हे आहे जे गुप्तपणे देवाला मोठी किंमत भरतात त्यास प्रभु द्वारे उघडपणे पुरस्कार हा दिला जातो. जग हे त्यांच्यासमोर नतमस्तक होईल. तुम्ही किंमत भरण्यास तयार आहात काय आणि सार्वकालिक बदल हा करावा?
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मला कृपा दे की किंमत मोजावी म्हणजे मी केवळ एक प्रेक्षक असू नये तर ह्या शेवटच्या समयामध्ये एक महत्वाचा मनुष्य व्हावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दोनदा मरू नका● चर्चला न जाता चर्च ऑनलाईन पाहणे ठीक आहे काय?
● २१ दिवस उपवासः दिवस ०६
● रहस्य स्वीकारणे
● प्रकाश हा वचना द्वारे येतो
● देवदुतांकडे आपण प्रार्थना करू शकतो काय?
● उपासनेचा सुगंध
टिप्पण्या