तरी ज्ञान्यास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले; आणि जगांतील जे हीनदिन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्या करिता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे. (१ करिंथ १: २७-२८)
परमेश्वर हेतुपूर्वक दुर्बळांना उपयोगात आणतो की त्याचे गौरवी उद्देश पूर्ण करावे. कारणकी परमेश्वर अशा प्रकारे करतो ते अशासाठी की, कोणीही मनुष्याने देवाच्या उपस्थितीत गर्व करू नये. (१ करिंथ १: २९)
यहूदा इस्कर्योत हा बारा शिष्यांपैकी एक होता. तो अभिषिक्त मनुष्य होता जो भुते काढू शकत होता आणि रोग्यांना स्वस्थ करू शकत होता. त्यास आणि प्रभूचे इतर शिष्य आणि प्रेरित यांना एका मिशन कार्यांत महानरित्या उपयोगात आणले गेले होते (मत्तय १० वाचा).
तथापि, यहूदा चा एक अशक्तपणा होता जो इतका स्पष्ट नव्हता कारण तो त्यास फार सहजपणे सोंग करून लपवत होता. योहान १२: ६ मध्ये पवित्र आत्मा त्याचा अशक्तपणा प्रकट करतो. "................तो चोर होता आणि त्याच्याकडे पैशाची थैली असे, आणि जे काही त्यात टाकत असत ते तो काढून घेत असे.
अनेक प्रसंगी, यहूदा ने पाहिले होते की अनेक पुरुषआणि स्त्रिया जे प्रभु कडे येत असत त्यांच्या गुप्त गोष्टी प्रभू स्पष्ट करीत असे. त्याने हे सुद्धा पाहिले होते की त्याच्या अद्भुत कृपे द्वारे पापी लोक वाचविले गेले होते. हे सर्व जाणून सुद्धा यहूदा ने गुप्तरित्या सुद्धा त्याच्या चारित्र्याच्या ह्या कमकुवतपणाला येशू कडे नेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. जर त्यास हवे असते तर तो हे करू शकला असता आणि मला खात्री आहे की यहूदा ने कृपा प्राप्त केली असती की त्याच्या कमकुवतपणावर विजय मिळवावा.
प्रभूला सुद्धा हे ठाऊक होते आणि त्यास पाहिजे होते कीते यहूदा ने स्वीकारावे, त्यास पाहिजे होते की यहूदा ने बदलावे परंतु यहूदा बदलला नाही, शेवटी, चारित्र्याच्या ह्याच कमकुवतपणामुळे यहूदा ने त्याच्या गुरूला केवळ 30 चांदीच्या नाण्यासाठी विकले-एका गुलामाची किंमत.खरे चारित्र्य हे दिसते जेव्हा तुम्ही साधन-संपत्तिआणि संबंध कसे हाताळता.
हे केवळ तेव्हाच जेव्हा आपण ओळखतो की आपण अशक्त लोक आहोत, आपणबाह्य मुखवटा बनविण्याचे थांबू आणि त्याऐवजी आपला परमेश्वर याची पूर्तता आणि चांगुलपणाकडे पाहू जेआपल्या संघर्षात उद्धार, स्वस्थता, आणि समाधान आणते.
याची पर्वा नाही की आपण किती दुर्बळ आणि अशक्त आहोत, मी विश्वास ठेवतो की जर आपण आपला अशक्तपणा प्रभु कडे कबूल करतो आणि त्यास शरण जातो आपण त्यावर मात करण्यासाठी पुरेशी कृपा प्राप्त करू. (२ करिंथ १२: ९)
प्रार्थना
पित्या, मी तुझा आभारी आहे की माझ्या अशक्तपणात तुझी कृपा ही सिद्ध झाली आहे. (तुमचा अशक्तपणा प्रभूला कबूल करा)
पित्या, मी तुझा आभारी आहे की तू मला कधी सोडणार नाही आणि माझा त्याग करणार नाही.
येशूच्या नांवात, आमेन.
पित्या, मी तुझा आभारी आहे की तू मला कधी सोडणार नाही आणि माझा त्याग करणार नाही.
येशूच्या नांवात, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस १८● तुमचा विश्वासघात झाला असे अनुभविलेआहे काय?
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● उपासना: शांतीसाठी किल्ली
● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
● देवाचा आरसा
● अगापेप्रीति मध्ये कसे वाढावे
टिप्पण्या