चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. (योहान १०: १०)
देवा-द्वारे दिलेले स्वप्न हे तुम्हाला वादळ व पुरा मधून बाहेर काढू शकते. ते अत्यंत आवश्यक आशा आणि प्रोत्साहन देऊ शकते जेव्हा तुमच्या भोवतालचे सर्व काही जसे नष्ट होत आहे.
तथापि अनेकांनी त्यांच्या स्वप्नाला धूसर होऊ दिले किंवा सरळपणे त्यास नष्ट होऊ दिले आहे. स्वप्नेनष्ट करणाऱ्याकडून सावधान व्हा ज्यास पाहिजे की तुमच्या स्वप्नातून धूर्तपणे जीवन हे काढून टाकावे. काहीही झाले तरी त्यास तसे करू देऊ नका.
"आता, योसेफ ला एक स्वप्न पडले, आणि त्याने ते त्याच्या भावांना सांगितले, आणि त्यांनी त्याचा अधिकच द्वेष केला" (उत्पत्ति ३७: ५). योसेफ हा सुरुवातीला अपरिपक्व होता आणि त्याने त्याचे स्वप्न चुकीच्या लोकांना सांगितले, आणि मग त्यांनी त्याउलट, योसेफाचे स्वप्न त्याच्यामधून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. योसेफाचे भाऊ हे स्वप्ने मारणाऱ्याचे एक आदर्श उदाहरण आहेत.
जेव्हा परमेश्वर प्रार्थने मध्ये, किंवा स्वप्नात काहीतरी प्रगट करतो किंवा देवाचे पुरुष किंवा स्त्री द्वारे काहीतरी प्रगट करतो; तर ते सर्वत्र सांगण्याचा प्रयत्न करू नका. ती अपरिपक्वता आहे आणि गुपित गर्वा चा इशारा आहे. तुमचे स्वप्न, तुम्हाला देवाने दिलेले गुपित केवळ त्यांना प्रगट करा जे आत्म्या मध्ये परिपक्व आहेत.
जे सर्व तुमच्या भोवती आहेत त्या प्रत्येकाला तुमचे स्वप्न पूर्ण व्हावे असे वाटत नाही. ते तसे व्हावे असा ढोंग करतील परंतु शेवटी, तुम्ही त्याविषयी ओळखाल. कसे? त्यांच्या बोलण्या द्वारे. ते कदाचित तुम्हाला हे सांगतील की हे तुमच्यासाठी अशक्य आहे,की तुम्ही त्यासाठी तितके हुशार असे नाही किंवा तसे पूर्वी कधीही केलेले नाही.
तसेच, भीती, धमकी, शंका, आर्थिकतेचा अभाव यांस तुम्हाला आदेश देण्यास परवानगी देऊ नका की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. ह्या स्वप्न मारणाऱ्यास उलटून बोला.
दाविदाने गल्याथ ला उलटे बोलले. त्या स्वप्ने मारणाऱ्यास बोला, "मी ख्रिस्त येशू मध्ये देवाने दिलेले अंतिम कार्य पूर्ण करेन." तुम्हाला कदाचित असे दररोज करावे लागेल, परंतु ते ठीक आहे. जितके अधिक तुम्ही अशा प्रकारे बोलाल, तितके अधिक स्वप्न तुमच्यात वाढेल आणि ते तुमच्यात सुरक्षित राहील.
परमेश्वराने आपल्याला आश्वासन दिले आहे, "परमेश्वर असे म्हणतो की, बाबेलाची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हांस या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन. परमेश्वर म्हणतो, तुम्हांविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांस तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. (यिर्मया २९: १०-११)
नेहमी हे लक्षात ठेवा, देवा सह हा कधीही उशीर झालेला नाही की स्वप्ने पाहण्यास सुरुवात करावी किंवा स्वप्न शोधावे किंवा ते पूर्ण करावे जे देवाने तुम्हाला दिले आहे. तुमच्या स्वप्नाच्या दिशेने कार्य करा आणि तुमचा भाग पूर्ण करा, परमेश्वर त्याचा भाग पूर्ण करेल.
प्रार्थना
मी ख्रिस्त येशू मध्ये देवाने दिलेले माझे अंतिम कार्य पूर्ण करेन कारण मी ख्रिस्ता द्वारे ते सर्व काही करू शकतो जो मला समर्थ करतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मनुष्यांची परंपरा● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
● विश्वासात स्थिर उभे राहावे
● चिंता करीत वाट पाहणे
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● इतरांसाठी मार्ग प्रकाशित करणे
● २१ दिवस उपवासः दिवस २०
टिप्पण्या