"ख्रिस्त-केंद्रित घर" काय आहे?
आजच्या समयात कुटुंब आणि विवाह मजबूत ठेवणे हे तितके सोपे नाही. ते तुमच्याकडून तुमचे सर्वस्व मागते, तुमचा सर्व वेळ आणि ऊर्जा-अक्षरशः सर्व काही. तथापि, ह्या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा घटक हा की जोपर्यंत परमेश्वर घर बांधीत नाही, तोपर्यंत बांधणाऱ्याचे सर्व परिश्रम व्यर्थ आहेत (स्तोत्रसंहिता १२७: १). प्रत्येक दिवशी आपण परमेश्वराकडे मागावे की आपले कुटुंब, वैवाहिक जीवन हे स्थिर ठेवावे-ही पहिली किल्ली आहे.
एक ख्रिस्त-केंद्रित घराला काही निश्चित गुणवैशिष्ट्ये आहेत. चला आपण त्यांच्याकडे पाहू या.
एक ख्रिस्ती घर व्यवस्थित आहे
प्रेषित पौल १ करिंथ १४: ३३ मध्ये लिहितो, "परमेश्वर अव्यवस्थेचा परमेश्वर नाही तर, शांतीचादेव आहे." जेव्हा मी व्यवस्था म्हणत आहे त्याचा अर्थ, हा नाही की सर्व काही चकाचक, करकरीत असे असेल (अर्थातच ते चांगले असेन).
व्यवस्था म्हणण्याचा माझा अर्थ, कुटुंबातील सदस्यांनी सतत याची उजळणी करावी की काय स्वीकारयोग्य आहे आणि काय नाही. काय होऊ दयावे आणि काय नाही. प्रश्ने जशी, "काय ह्या गोष्टी कुटुंबाची उन्नती करतात?" हे विचारले पाहिजे. असे सर्व निर्णय देवाच्या वचनाद्वारे प्रभावित केले पाहिजे. हे कुटुंबामध्ये ईश्वरीय व्यवस्था आणेल.
ख्रिस्त केंद्रित घर हे ते स्थान आहे जेथे आध्यात्मिक शिस्तीचे पालन केले जाते.
ख्रिस्त केंद्रित घर हे ते स्थान आहे जेथे कुटुंबाच्या सदस्यांना देवाच्या वचनाचा अभ्यास, प्रार्थना, उपासना वगैरेच्या उदाहरणा द्वारे प्रोत्साहन दिले जाते.
ख्रिस्त केंद्रित घर हे कृपे द्वारे चिन्हित असते
प्रत्येक वैवाहिक जीवनात आणि कुटुंबात कठीण दिवस येतात. मग याची पर्वा नाही की तुम्ही किती ईश्वरीय आहात, तेथे नेहमीच काही वाद किंवा त्यासमान गोष्टी होतील.
तथापि,ख्रिस्त केंद्रित घरातआईवडील आणि वृद्ध जनांनी पुढाकार घ्यावाकीएकमेकांना क्षमा करावी आणि तसे प्रकरण पुन्हा करू नये. हे तरुण लेकरांसाठी एक आदर्श स्थित करते.
घर मग एक सहलीचे स्थान होते जेथे दु:खित व्यक्ति समाधान, आराम व स्वास्थ्य प्राप्त करतात.
परमेश्वर खात्रीने आपले घर ख्रिस्त केंद्रित घर करेल कारण आपल्याला स्वर्गीय पिता आहे ज्याचे नेत्र हे नेहमीच आपल्यावर आहेत, जो नेहमीच आपल्या हाकेला ऐकतो आणि आपल्याला सोडावयाला येतो(स्तोत्रसंहिता ३४: १८).
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मीमाझ्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांना तुला समर्पित करतो.
पित्या, येशूच्या नांवात, ह्या दिवसापासून, मी माझ्या स्वतःला आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना जे काही तुझ्या इच्छेच्या विरोधात त्यापासून वेगळे करतो. येशूच्या नांवात,माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर(माझ्या सह) मागील पिढीच्या सर्व वाईट संगतीलामी तोडतो.
मीआणि माझे घराणे तर येथून पुढे केवळ परमेश्वराचीच उपासना करणार.
पित्या, येशूच्या नांवात, ह्या दिवसापासून, मी माझ्या स्वतःला आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना जे काही तुझ्या इच्छेच्या विरोधात त्यापासून वेगळे करतो. येशूच्या नांवात,माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर(माझ्या सह) मागील पिढीच्या सर्व वाईट संगतीलामी तोडतो.
मीआणि माझे घराणे तर येथून पुढे केवळ परमेश्वराचीच उपासना करणार.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चालण्यास शिकणे● इतरांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकावा
● दिवस १९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
● पावित्रीकरण स्पष्टपणे सांगितले आहे
● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
टिप्पण्या