मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. (योहान १५: १)
येथे तीन गोष्टी आहेत:
१. पिता"द्राक्षवेल स्वच्छ करणारा" आहे; आणखी एक भाषांतर म्हणते बाप "माळी" आहे.
२. येशू खरी द्राक्षवेल आहे.
३. आपण जे चर्च ते फाटे आहोत.
माझ्यातील फळ न देणाराप्रत्येक फाटा तो काढून टाकतो.....(योहान १५: २)
कार्यकारी अध्यक्ष किंवा संस्थेच्या प्रमुख प्रमाणे, परमेश्वर प्रत्येक फाटा काढून टाकतो-किंवा आपल्या जीवनातील काहीही-जे आपल्याला फळ देण्यापासून किंवा उत्पादन करण्यापासून रोखते. परमेश्वर हा फलदायकपणा आणि उत्पन्न करणारा परमेश्वर आहे.
हे एक कारण असू शकते की लोक निश्चित संबंधामध्ये दिसणाऱ्या विभाजनास का तोंड देतात वगैरे. कृपा करून हे लक्षात घ्या, मी म्हटले, "हे एक कारण असू शकते" परमेश्वर विश्वसनीय आहे आणि तो काही गोष्टी घेतो की काहीतरी उत्तम ते आपल्याला दयावे.
जर तुम्ही व्यवसायिक किंवा एखादया संस्थेचे प्रमुख आहात, हा सिद्धांत आहे जो तुम्हाला लागू करण्याची गरज आहे. तुमचा व्यवसाय तपासा, तुमच्या पद्धती तपासा. तेथे काही प्रक्रिया आहेत काय ज्या अनुत्पादक अशा आहेत? तर मग त्या गोष्टी काढून टाका. नष्ट झालेले लाकूड टाकून दयावयास पाहिजे,
बायबल म्हणते, हनन्या व सप्पीरा हे मृत झाले आणि तरुण लोक आले आणि त्यांना घेऊन गेले (प्रेषित ५: ६, १०).
परमेश्वर मृत अवस्था चर्च मध्ये राहू देणार नाही. लक्षात घ्या, प्रारंभीच्या चर्च ने ह्या गोष्टीभोवती काही स्मारक निर्माण केले नाही. त्यांनी कदाचित म्हटले, "ह्या मृत गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत."
प्रभू येशूने म्हटले, "ज्या कोणास माझ्यापासून वेगळे केले जाते तर मृत होते..." (योहान १५: ६)
खराब झालेल्या लाकडाला काढून टाकले पाहिजे. त्यास वेगळे केलेच पाहिजे. अशा प्रकारे परमेश्वर कार्य करतो. अनेक वेळेला, आपणघातक संबंधांमध्येच अडकून राहतो हे जाणून की ते आपल्याला पुढे नेणार नाही. परमेश्वर तेव्हा त्यात प्रवेश करेल, आणि अशा प्रकारच्या गोष्टी काढून टाकेल. त्यासाठी रडू नका. त्याच्यावर विश्वास ठेवा!
इतरांचे परीक्षण करण्याऐवजी, ही वेळ आहे की आपले आत्मपरीक्षण करावे की मग आपण खरेच फळ आणत आहोत किंवा नाही (१ करिंथ ११: २८). तसेच जर तुम्ही अनेक वर्षांपासून चर्च ला हजर राहात आहात, आणि केवळ बाकांवर बसून राहता, आणि काहीही करीत नाहीत, आज, निर्णय करा की तुमच्या स्वतःला त्याच्या द्वारेत्याच्या गौरवाकरिता वापर करू द्याल.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात,
मी आदेश देतो आणि घोषित करतो की मी वाहत्या झऱ्याच्या ठिकाणी लावलेला, स्थिर झालेला आणि स्थापित झालेला असा आहे.
माझे मूळ हे फलदायकपणा, उगम आणि विपुलतेमध्ये मुळावलेले आहे. येशूच्या नांवात.
मी आदेश देतो आणि घोषित करतो की मी वाहत्या झऱ्याच्या ठिकाणी लावलेला, स्थिर झालेला आणि स्थापित झालेला असा आहे.
माझे मूळ हे फलदायकपणा, उगम आणि विपुलतेमध्ये मुळावलेले आहे. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चालण्यास शिकणे● दैवी रहस्ये उघड करावीत
● देवदूताचे साहाय्य कसे सक्रीय करावे
● आमचे नको
● ऐक्य आणि आज्ञाधारकपणाचा दृष्टांत
● सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
टिप्पण्या