नुकतेच, येथे देवदूतांच्या स्तर मध्ये खूपच रुची होती. मी अनेक लेख पाहिले (अगदी प्रसिद्ध व्यक्तींकडून सुद्धा) हा दावा करताना की ख्रिस्ती लोक देवदूताला आदेश देऊ शकतात आणि त्यांना काय करायचे आहे ते करण्यास त्यांना सांगू शकतात .
आपला एकमेव अधिकृतपणा हा वचन आहे म्हणून चला आपण वचन काय म्हणते ते पाहू या:
१. देवदूत हे देवाचे सेवक आहेत, आपले नाही.
मी ऐकले आहे, अनेक लोक प्रार्थना करतात, "हे धन्यवादीत आद्यदेवदूता गैब्रिएल माझ्यासाठी मध्यस्थी कर." मीखाएल जो स्वर्गीय सैन्यांचा प्रमुख आहे, मी तुला आदेश देतो की त्या शक्तीकडे जा आणि त्यास नष्ट कर.
देवदूत हे देवाचे सेवक आहेत, आपले नाही. ते त्याच्या आदेशाने येतात व जातात. ते त्याचे वचन व त्याच्या वाणी ला प्रत्युत्तर देतात आणि आपला सरळ आदेश किंवा विनंतीला नाही. पुढील वचनाकडे पाहा आणि जे मी म्हणत आहे ते समजेल.
"अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहा, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा.
अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा." (स्तोत्रसंहिता १०३:२०-२१)
स्तोत्रसंहिता ९१:११ कडे पाहा,
"कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल."
ह्या वाक्प्रचार कडे पाहा, "तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल."
आपल्या रक्षणासाठी दिव्यदूतांना आज्ञा देणे हे स्वर्गातील पित्याकडे येशूच्या नांवात प्रार्थना करण्याच्या प्रत्युत्तरासाठी आहे.
प्रभु येशू ख्रिस्त जेव्हा येथे पृथ्वीवर चालला, त्याने हे मानले की देवदूत हे त्याच्या पित्याच्या अधिकाराखाली आहेत.
"तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आत्ताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही?" (मत्तय २६:५२-५३)
१ पेत्र ३:२१-२२ म्हणते की, पुनरुत्थानानंतर, आता देवदूत हे येशूच्या अधिकाराखाली आहेत.
"त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे, असा आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आतां देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत."
आणि हा प्रभु आहे जो ह्या देवदूताला आज्ञा देतो.
"ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठविलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?" (इब्री १:१४)
म्हणून तुम्ही पाहता की हे देवदूत अवश्य आपली सेवा करतात, परंतु ते केवळ प्रभूचा आध्यात्मिक अधिकार मानतात.
अंगीकार
१. आज उपासाचा ८वा दिवस आहे. आता अनेकांना ठाऊक आहे, की आपण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रत्येक आठवडयात (मंगळावर, गुरुवार व शनिवारी) उपास करीत आहोत. ह्या उपास करण्यास ५ महत्वाचे उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
प्रत्येक ओझे हे माझ्या खांद्यावरून काढून टाकले जाईल, आणि माझ्या मानेवरील प्रत्येक जूं, आणि अभिषेकमुळे जूं हे नष्ट केले जाईल. मी वचनाच्या समज मध्ये वाढेन. (यशया १०:२७)
कुटुंबाचे तारण
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)
आर्थिकतेचा नवीन मार्ग
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील (फिलिप्पै ४:१९). मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तूं तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देतो की आमच्या मार्गामध्ये आम्हांला सुरक्षित ठेवावे आणि आम्हांला मार्गदर्शन करावे. पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्यांसाठी तुझे पवित्र दिव्यदूत पाठिव, येशूच्या नांवात. त्यांच्या विरोधातील अंधाऱ्या शक्तीचे प्रत्येक कार्य नष्ट कर.
देश
पित्या, असे होवो की तुझी शांती व धार्मिकतेने आमच्या देशाला भरून टाकावे. आमच्या देशाच्या विरोधातील अंधार व विनाशकारी सर्व शक्ती ह्या नष्ट केल्या जावोत. असे होवो की आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात प्रभु येशूचे शुभवर्तमान हे पसरवो. येशूच्या नांवात.

Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा● छाटण्याचा समय
● त्या गोष्टी कार्यरत करा
● हुशारीने कार्य करा
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
● कार्यवाही करा
● आजच्या वेळेत हे करा
टिप्पण्या