'त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार कसे व्हावे' ह्या आपल्या शृंखले मध्ये आपण पुढे जात आहोत. देवा कडे वळण्याअगोदर, काही परिस्थितींमुळे एका टेरेस वरून मी एकदा उडी मारण्याचा प्रयत्न करणार होतो. "माझे सर्व काही घे" ह्या गीता मध्ये मी हे सर्व काही चित्रित केलेले आहे. नेमके याचवेळी कोणीतरी मला सुवार्ता सांगितली व मला एका प्रार्थना सभेला आमंत्रित केले होते. त्या प्रार्थना सभे मध्ये माझ्यासाठी सर्व काही बदलले होते.
मी गिटार वाजविणारा होतो, व भरकम धातूच्या संगीता मध्ये फारच आवेशी होतो. अश्लील भाषा वापरणे हे नेहमीचे मानदंड झाले होते. दुसऱ्या दिवशी, जेव्हा मी इतर संगीत संघाला भेटलो, त्यांनी मला त्यांच्या नेहमीच्या भाषे मध्ये अभिवादन केले. मी त्यांना सामान्यपणे प्रत्युत्तर दिले व त्यांनी लवकरच ओळखले की माझी भाषा ही बदलली आहे. त्यांनी मला विचारले, काय घडले, "मी त्यांना सांगितले, मी येशूला भेटलो". त्यांनी माझी थट्टा केली व मला वेगळ्या नांवाने हाक मारली. माझ्या स्थानिक ठिकाणी सुद्धा, जेव्हा मी एक जगिक जीवन जगलो होतो, त्यांनी मला एक चांगला व्यक्ति असे म्हटले होते परंतु जेव्हा मी माझे बायबल, गिटार घेऊन आहे व प्रार्थना सभेला जात आहे, तेव्हा मग ते माझी थट्टा करीत असे. अशा प्रकारचे हे आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्यातील एक नाही, तेव्हा ते तुमचा तिरस्कार करतील.
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की, "ख्रिस्त येशू मध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल" (२ तीमथ्यी ३:१२). मला ठाऊक आहे हे योग्य दिसत नाही. परंतु त्याकडे पाहा जे प्रभु येशूने म्हटले, "नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्ट्ये होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला" (मत्तय ५:१०-१२).
इतर सर्व धन्य वचनामध्ये, शब्द "धन्यवादित" हे केवळ एकदाच वापरले आहे, परंतु ह्या विशेष धन्य वचनात, येशूने शब्द 'धन्यवादित' दोनदा वापरला की छळ झालेल्यांसाठी परमेश्वरा द्वारे दिल्या गेलेल्या उदार आशीर्वादावर अधिक भर दयावा.
मी हे लिहिले आहे की तुम्हाला निरुत्साहित करू नये परंतु ईश्वरीय मार्गावर तुमची तयारी करावी व तुम्हाला प्रोत्साहन दयावे. त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार झाले याकारणासाठी तुमचा छळ होईल म्हणून मागे वळू नका.
आता उत्तम भागाकरीता; पूर्वी ज्यांनी माझी थट्टा केली होती त्यापैकी अनेक जण आता प्रभु कडे वळले आहेत. येथे काही आहेत जे अजूनही प्रभु कडे वळलेले नाहीत, परंतु ते मला सावकाशपणे त्यांच्या प्रार्थनेच्या विनंत्या देतात व प्रार्थने साठी विचारतात. मी भविष्यवाणी करतो, "तुमचा छळ करणारे हे तुमची उत्तम प्रसिद्धी करणारे होतील' मृत मासा सुद्धा पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाऊ शकतो परंतु जिवंत मासा च पाण्याच्या प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊ शकतो. प्रेरित व्हा! तुम्ही त्याच्या पुनरूत्थानाचे महान साक्षीदार होणार आहात.
प्रार्थना
प्रभु येशू, मी तुला कृपा मागत आहे की तुझ्या पुनरूत्थानाचे साक्षीदार होत असताना परीक्षा व संकटांना विश्वासूपणे सहन करावे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे
● स्वतःवर लागू केलेल्या शापापासून सुटका
● उपास कसा करावा?
● पहारेकरी
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
टिप्पण्या