अब्राम नव्व्यानव वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे; तूं माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्यामाझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो; तुला मी बहुगुणीत करीन. (उत्पत्ति १७:१-२)
परमेश्वराने त्याचा करार अब्राम बरोबर निश्चित केला. परमेश्वराने स्वतःला अब्रामास एका नवीन नावाने परिचित केले, जे पूर्वी मानवांस अज्ञात होते.
नाव "सर्वसमर्थ देव" मध्ये इब्री शब्द एल-शादाय आहेत. शब्द 'एल' म्हणजे "शक्तिशाली किंवा सर्वसमर्थ", शब्द "शादाय" चा अर्थ "भरविणारा" किंवा पोषण करणारा.
शादाय हा स्त्रीलिंगी शब्द सुद्धा आहे. परमेश्वर अब्रामास प्रगट करत होता हे सांगत, "येणाऱ्या समयात मी तुझा पूर्णपणे पुरवठा करणारा असेन, जसे एक आई तिच्या बाळाला पुरविते." आपल्यापैंकी अनेक जण परमेश्वराला शक्तिशाली व सामर्थी असे चित्रित करतात परंतु आजचे वचन (उत्पत्ति १७:१-२) आपल्याला सांगते की तो आई प्रमाणे कोमळ सुद्धा आहे. (वास्तवात एक आई जशी असू शकते त्याच्याही पेक्षा अधिक)
एका आईचे तिच्या लेकरांसाठी प्रेम व सांभाळ त्यांना भावनात्मक स्थिर व सशक्त आत्मविश्वासी बनविते. ह्या महामारी दरम्यान आपल्यापैंकी कोणी त्यांचे प्रियजन किंवा काहीतरी महत्वाचे गमाविले असेन, म्हणजे, नोकरी, व्यवसाय वगैरे. त्याची प्रीति भूतकाळातील सर्व दु:खाला स्वस्थ करू शकते, तुमच्या अंत:करणाला पुनर्स्थापित करते, व तुमच्या आत्म्यामध्ये जी काही भावनात्मक पोकळी तुम्हाला कदाचित असेन ती भरू शकते.
हे समजा, की आज तुम्ही ज्या कशातून जात आहात याची पर्वा नाही, तुम्ही ह्या सत्याला धरून राहू शकता की परमेश्वर हा एल-शादाय आहे- सर्व काही पुरवठा करणारा. ज्या कशाची तुम्हाला गरज आहे ते परमेश्वर आहे. "परमेश्वरासाठी काही कठीण आहे काय?" (उत्पत्ति १८:१४)
अंगीकार
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
"मला सर्वसमर्थ परमेश्वर ठाऊक आहे', मी त्याच्यासमोर चालतो आणि मी सिद्धतेच्या दिशेने वाटचाल करतो."
कुटुंबाचे तारण
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)
आर्थिकतेचा नवीन मार्ग
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील (फिलिप्पै ४:१९). मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तूं तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देतो की आमच्या मार्गामध्ये आम्हांला सुरक्षित ठेवावे आणि आम्हांला मार्गदर्शन करावे. पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्यांसाठी तुझे पवित्र दिव्यदूत पाठिव, येशूच्या नांवात. त्यांच्या विरोधातील अंधाऱ्या शक्तीचे प्रत्येक कार्य नष्ट कर.
देश
पित्या, असे होवो की तुझी शांती व धार्मिकतेने आमच्या देशाला भरून टाकावे. आमच्या देशाच्या विरोधातील अंधार व विनाशकारी सर्व शक्ती ह्या नष्ट केल्या जावोत. असे होवो की आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात प्रभु येशूचे शुभवर्तमान हे पसरवो. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अनुकरण करा● कृपेवर कृपा
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● संकटाच्या काळाकडे पाहणे
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● स्वतःवरच घात करू नका
● ते व्यवस्थित करा
टिप्पण्या