निसर्गात, आपण चिकाटीची शक्ती पाहतो. पाण्याचा प्रवाह कठीण खडकास भेदत वाहतो कारण तो शक्तिशाली आहे म्हणून नाही तर त्याच्या चिकाटीमुळे. हा सामर्थ्याचा प्रगाढ पुरावा आहे जो निव्वळ सामर्थ्याने नाही तर सातत्यपूर्ण प्रयत्नातून आणि चिकाटीने उदयास येतो.
विश्वासाच्या आपल्या प्रवासात, चिकाटी ही मग अधिकच महत्वपूर्ण होते. प्रेषित पौलाने थेस्सलनीकाच्या त्याच्या पत्रात म्हटले, “सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे” (१ थेस्सलनीका ५:१६-१८). या वचनांद्वारे आपल्या विश्वासात स्थिर राहण्याच्या महत्वाबद्दल पौल जोर देत आहे की सतत आनंद व कृतज्ञता आणि देवासोबत सतत संभाषणामध्ये मुळावलेले राहा.
जीवनातील आव्हाने आणि परीक्षा सहसा अजिंक्य पर्वतांसारख्या दिसतात, ज्यामुळे अनेक जण आशा आणि विश्वास गमावतात. तथापि, पवित्र शास्त्र आपल्याला स्मरण देते की युद्धे ही एका दिवसात जिंकली जात नाहीत. अभिवचनाच्या देशात प्रवेश करण्यापूर्वी रानात ४० वर्षे भटकण्याची इस्राएली लोकांची कथा ही त्यासाठी साक्ष अशी आहे. त्यांचा डगमगता विश्वास आणि अनेक त्रुटी असूनही, ते चिकाटीने त्यांच्या नियत ठिकाणावर पोहचले, सतत देवाकडे वळत राहिले.
नीतिसूत्रे २४:१६ आपल्याला सांगते, “कारण नीतिमान सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात.” हे वचन केवळ पुन्हा उठण्याच्या कृत्याबद्दल नाही. तर ते चिकाटीच्या आत्म्याविषयी आहे, आशा आणि विश्वासाची अमर ज्योत जी विझण्यास नकार देते.
थॉमस एडिसन, एक महान शोधक, त्याने एकदा म्हटले होते, “आयुष्यातील बहुतेक अपयशी असे लोक असतात ज्यांना हार मानण्यापूर्वी आपण यशाच्या किती जवळ आहोत हे समजले नाही.” लाईट बल्ब तयार करण्यासाठी एडिसनचे हजारो प्रयत्न याकोब १:१२ चे प्रकटीकरण म्हणून पाहू जाऊ शकते: “जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य’ कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.”
ते यश समजणे महत्वाचे आहे, मग ते व्यवसाय, कौटुंबिक जीवन, वित्त, किंवा आपला आध्यात्मिक प्रवास असो, हे मग तत्काळबद्दल नाही तर चिकाटीबद्दल आहे. समाज अनेकदा जलद यश आणि एका रात्रीतील संवेदनाचे गौरव करते, तर बायबल आपल्याला दीर्घकालीन वचनबद्धता, अढळ विश्वास आणि सतत प्रयत्नांची किंमत शिकवते.
गलती. ६:९ आपल्याला आठवण देते, “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” प्रत्येक कृत्य, प्रत्येक प्रार्थना, विश्वासातील प्रत्येक पावलांची किंमत आहे. ते जमा होतात आणि शेवटी, देवाची कृपा आणि चिकाटीने, आशीर्वादाच्या पीकाकडे नेतात.
आज, जेव्हा तुम्ही आव्हानांचा सामना करता किंवा दुर्गम वाटणाऱ्या पर्वतांकडे पाहता, तेव्हा चिकाटीच्या शक्तीची आठवण करा. तुमच्या प्रयत्नांना देवाच्या वचनाशी सलग्न करा. त्याच्या वेळेवर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास, प्रार्थना आणि सेवेमध्ये सातत्यपूर्ण राहा. बायबलची वचने आणि तुमच्यापूर्वी ज्यांनी चिकाटीने कार्य केले त्यांची उदाहरणे तुमच्यासाठी मार्गदर्शक अशी होवो.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, रस्ता लांब आणि वादळी असतानाही विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आम्हांला आमच्या परीक्षांमध्ये टिकून राहण्याची शक्ती दे. आम्हांला याची आठवण दे की तुझ्याबरोबर, आमचे प्रयत्न हे कधीही व्यर्थ नाहीत. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● काही पुढाऱ्यांचे पतन होते याकारणामुळे आपण माघार घेतली पाहिजे काय?● पापाशी संघर्ष
● व्यसनांना संपवून टाकणे
● पित्याचे हृदय प्रकट केले गेले
● उपास द्वारे देवदूताला कार्य करावयास लावणे
● वचन प्राप्त करा
● २१ दिवस उपवासः दिवस २०
टिप्पण्या