"सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते." (नीतिसूत्रे ३१:३०)
एस्तेरचे रहस्य काय होते? ते तिचे सौंदय किंवा इतर काही रहस्य होते काय? विदेशी राष्ट्राची बंदिवासातील एका शेतकरी मुलीला एका शक्तिशाली पर्शियन राजाने राणी म्हणून का निवडले? अहश्वेरोशने इतर राष्ट्रातील जवळजवळ १, ४५९ आणि पर्शियाच्या १२७ प्रांतातील इतर सर्व उमेदवारांना का सोडले होते? हे केवळ तिच्या सौंदर्याच्या कारणामुळे होते काय, किंवा तिला रहस्य ठाऊक होते?
प्राचीन धर्मगुरूंच्या परंपरेनुसार, एस्तेर ही त्या काळाच्या सर्वात सुंदर चार यहूदी स्त्रियांपैकी ( इतर हे सारा, राहेल, आणि अबीगईल) एक होती. राजा अहश्वेरोश जगातील सर्वात सुंदर स्त्रिया मिळवू शकत होता आणि महिलांसाठी विस्तृत निवास त्याचा पुरावा होता. अशा मनुष्याला मोहित करण्यासाठी बाह्य सौंदर्य आणि कामुक आकर्षणापेक्षा जास्त आवश्यक आहे. अहश्वेरोशने एस्तेरला एक रखेल किंवा उपपत्नी म्हणून राहू दिले असते तरीही तिच्याविषयी काहीतरी गोष्टीने त्याच्याकडून वचनबद्धतेची मागणी केली.
एस्तेर एक बाहेरची व्यक्ति होती, ती खानदानी नव्हे तर निर्वासित लोकांमध्ये जन्मलेली होती! तिच्यासाठी या कोणत्याही गोष्टी कामी येणाऱ्या नव्हत्या, परंतु कसेतरी तिने मन जिंकिले आणि मग पर्शियन पूर्वग्रह आणि परंपरा असताना सुद्धा राजाचे लक्ष वेधले. तिचे रहस्य काय होते?
मी पाहिले आहे की आपण अशा पिढीत राहतो जी आंतरिक भागापेक्षा बाह्य गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करते. आपण केवळ इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी खूप पैसे खर्च करून अत्यंत महागडे फोन विकत घेतो. परंतु आपण फोनच्या कार्याबद्दल फारच कमी विचार करतो परंतु ब्रान्ड चिन्हास महत्त्व देतो.
मत्तय २३:२६ मध्ये येशूने म्हटले आहे, "अरे आंधळ्या परुश्या, पहिल्याने वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल." येथे, येशू आंतरिक सौंदर्यावर भर देत आहे. एस्तेर सुंदर होती, परंतु तिच्या जीवनात या क्षणी, तिला बाह्य सौंदर्यापलीकडील सुगंधाची गरज होती. तिला कृपा आणि आंतरिक चरित्राची गरज होती.
एस्तेर २:१५-१७ मध्ये बायबल म्हणते, "मर्दखयाचा चुलता अबीहइल याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून पाळिले होते. तिची राजापाशी जाण्याची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिजवर कृपादृष्टि झाली. ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकीर्दीच्या सातव्या वर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे तेबेथ महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली. राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीति केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टि विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले."
एस्तेरने खोजाच्या सूचनेकडे लक्ष दिले. ती आपल्या गर्वामध्ये नव्हती; त्याऐवजी, देवाची कृपा तिच्या द्वारे प्रदर्शित व्हावी इतकी ती नम्र झाली होती. तिच्यावर पूर्ण कृपा झाली होती आणि तीचा आत्मविश्वास हा तिच्या बाह्य सौंदर्यावर नव्हता पण आंतरिक कृपा आणि अनुग्रहाच्या सुगंधावर होता.
या वर्षी जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्नशील राहता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास काय आहे? ही तुमची हुशारी, पैसा, परिश्रम आणि तुमचे संबंध आहेत काय? माझी इच्छा आहे तुम्ही हे ओळखावे की ते सर्व काही अपयशी होईल ज्याप्रमाणे इतर स्त्रियांच्या सौंदर्याने अपयशी केले होते. म्हणून देवाची कृपा व अनुग्रह आत्मसात करा. एस्तेरवर राजाची कृपा झाली. म्हणून, मी या वर्षी भविष्य करतो, तुम्ही सुद्धा उच्च ठिकाणी कृपेचा आनंद प्राप्त कराल.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मला माझ्या सिंहासनापर्यंत जाणारे रहस्य दाखविण्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की तूं आज, मला तुझ्या कृपेने घेरून ठेव. असे होवो की माझे जीवन मोठया अनुग्रहाने भरून जावो जेणेकरून मी या वर्षी चांगल्या गोष्टींना आकर्षित करू शकावे. मी फर्मान काढतो की मला कधीही नकार सहन करावा लागणार नाही, परंतु माझा स्वीकार होईल. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परिवर्तनाची किंमत● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● सुवार्ता घेऊन जाणारे
● शहाणपणाची पारख होत आहे
टिप्पण्या