"एस्तेर म्हणाली, माझा अर्ज व मागणी हीच: महाराजांची मजवर कृपादृष्टि झाली असून माझा अर्ज मंजूर करावा व माझी मागणी मान्य करावी असे महाराजांच्या मर्जीस आले असेल तर मी मेजवानी करणार तिला महाराजांनी व हामानाने यावे, मग महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मी उद्या काय मागावयाचे ते मागेन." (एस्तेर ५:७-८)
तीन दिवस उपास व प्रार्थना केल्यानंतर, हामानाच्या फर्मानापासून यहूदी लोकांना वाचविण्यासाठी एस्तेरला तिच्या विनंतीबद्दल राजाबरोबर बोलण्यास संधी मान्य करण्यात आली. तिची विनंती ताबडतोब सादर करण्याऐवजी, तिने राजाला व हामानाला मेजवानीसाठी आमंत्रित केले. कोणी ही अपेक्षा करेल की ती या संधीचा लाभ घेईल की तिची विनंती सादर करावी, परंतु एस्तेरने आणखी एक रात्र वाट पाहण्याची निवड केली. दुसऱ्या दिवसाच्या रात्रीच्या भोजनावेळी तिने तिची विनंती सादर करण्याचा निर्णय घेतला. आणखी एक दिवस वाट पाहण्यामुळे, एस्तेरने तिच्या वतीने कार्य करण्यासाठी देवाला वेळ दिला.
जर तुम्ही एस्तेर ६:१ वाचले, तर तुम्ही हे पाहाल की हे देवाच्या परिपूर्ण वेळेद्वारे की या विशेष रात्री, राजा झोपू शकला नाही. इतिहास ग्रंथ त्याच्याकडे आणण्यात आले की या आशेने वाचावे की त्यास झोप येऊ शकेल. जर एस्तेरने तिची विनंती एक दिवस अगोदरच सादर केली असती, तर तिने राजाने त्याचा वध करण्याच्या योजनेमधील मर्दखयाची भूमिका माहीत करवून घेण्याची संधी गमाविली असती.
आपण एका जेट युगात आहोत, जेथे वेग हे सार आहे. कोणालाही वाट पाहण्यास आवडत नाही. वाट पाहणे हे जसे काही वाया घालविणे आहे. ताबडतोब इच्छा पूर्ण करण्याच्या संस्कृतीमध्ये आपण राहत आहोत. आपल्याला ते आत्ताच पाहिजे, आणि जर ते आपल्याला मिळाले नाही, तर आपण निराश होतो. काही जण तर जे त्यांना पाहिजे असते ते प्राप्त करण्यासाठी हत्त्या करतात. इतर ज्याची वाट पाहू शकतात त्या भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपला आत्मा विकतात. काही तरुणांना तरुण वयातच आधुनिक कार चालवावी असे वाटते की बुद्धिमान जगाचा हिस्सा असे व्हावे. प्रगतीची संकल्पना रद्दबादल झाली आहे. आता आपल्याला केवळ एवढेच हवे आहे की आपले ध्येय गाठण्यासाठी प्रक्रीयेच्या पुढे पाऊल टाकावे.
वास्तवात, देवाबरोबर घनिष्ठ संबंध बनविण्यासाठी यापेक्षा मोठा शत्रू नाही. जर कोणीतरी किंवा काहीतरी खरेच महत्वाचे आहे, तर वाट पाहणे हे महत्वाचे आहे. ज्यास आपण महत्त्व देतो त्यासाठीच आपण वाट पाहतो. ज्यावेळेस सर्व काही म्हटले आणि केले जाते, तेव्हा वाट पाहणे ही उपासना आहे. जर तुम्ही प्राचीन राजाच्या रूढीविरुद्ध (किंवा त्याबाबतीत, एखादया आधुनिक नेत्याच्या) जाण्याची निवड करता, तर तुम्हांला प्रवेश हा नाकारला जाऊ शकतो किंवा टोकाच्या प्रकरणात, सिंहासनाकडे जाण्याची घाई करण्यासाठी तुमचा वध देखील केला जाऊ शकतो.
"तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत." (यशया ४०:३१)
एकदा एका ज्ञानी माणसाने म्हटले, जेव्हा तुम्ही वर उडी मारता, तेव्हा तुम्ही खाली येता, परंतु जेव्हा तुम्ही मोठे होता, तेव्हा तुम्ही वरच राहता. म्हणून, आपल्याला संस्कृती शिकण्याची आणि वाट पाहण्याच्या गुणधर्माची मुल्ये जोपासण्याची गरज आहे. जीवनात गरुडाप्रमाणे उंचावर उडण्याची किल्ली ही वाट पाहणे आहे.
ते वचन गरुडाच्या आयुष्याचे उदाहरण स्पष्ट करते. गरुड इतर पक्षांप्रमाणे उडत नाहीत, ते भरारी घेतात. याचा अर्थ ते अशक्य अशा उंच ठिकाणी त्यांचे पंख पसरवितात. जेव्हा वादळ असते तेव्हा ते चांगली भरारी घेतात आणि मग त्यांचे पंख पूर्ण पसरवितात जेव्हा ते वादळाच्या लाटेवर उडण्याचा आनंद घेतात. परंतु या विलक्षण स्थितीत येण्यासाठी, त्यांना वाट पाहावी लागते. गरुड वादळ निर्माण करू शकत नाही; जो पर्यत वादळ निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांना डोंगरांमध्ये वाट पाहावी लागते.
हीच आपली देखील जीवनशैली झाली पाहिजे. आपले उत्तम हे खात्रीने घडणार आहे. ज्याठिकाणी आपण आहोत तोच आपला शेवट नाही, ते केवळ वळण आहे. यिर्मया २९:११ मध्ये देवाने म्हटले, "तुम्हांविषयी माझ्या मानत जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे हेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांस तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत." जेव्हा तुम्ही वाट पाहता तेव्हा त्याच्या योजना या पूर्ण होणार आहेत. योग्यवेळेपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहा.
काही लोक फार लवकरच त्याठिकाणी पोहचले, आणि गौरव गमाविले आहे. इतर त्यांचे जीवन जगून गेले आणि त्यांचा विसर पडला आहे. परंतु तुम्ही जेव्हा योग्य क्षणासाठी वाट पाहता, तेव्हा गौरव हे टिकून राहील. आपण व्यवस्था ठेवणाऱ्या देवाची उपासना करतो. लूक २:५१ मध्ये बायबल येशूविषयी बोलते, "मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेंत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेविल्या." मंदिरातील नेते व पुढारी यांच्याबरोबर नुकतेच त्याने संभाषण संपविले होते, आणि असे दिसते की ती एक परिपूर्ण संधी होती की तो उद्धारकर्ता आहे याची घोषणा करावी. पण नाही, कारण वेळ परिपक्व झालेली नव्हती. तो बारा वर्षाचा होता आणि त्यास त्याच्या आईवडिलांचे अनुकरण करावयाचे होते आणि त्यांच्या आज्ञेत राहावयाचे होते.
म्हणून वाट पाहा, काहीतरी असण्यासाठी तुम्हांला चोरी करण्याची गरज नाही. देव त्यागोष्टी तुम्हांला देऊ शकतो. पण त्याने मागणी केली आहे की तुम्ही त्याच्या वेळेसाठी वाट पाहण्यास त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की संयमाच्या गुणाने तूं माझे हृदय भरून टाक. मी प्रार्थना करतो की प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर मी निराशेत जाणार नाही. त्याऐवजी, माझ्या जीवनात दिले गेलेल्या त्या वेळेसाठी वाट पाहण्यास मला साहाय्य कर. मी फर्मान काढतो की माझे हृदय हे संयमाच्या आत्म्याने भरलेले आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष कसे बनावे● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● अंतिम रहस्य
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
● वचन प्राप्त करा
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुमच्या अंत:करणाचे रक्षण कसे करावे
टिप्पण्या