"कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्यासारखा आहे, तो तुला खा, पी म्हणतो, पण त्याचे मन तुजवर नाही." (नीतिसूत्रे २३:७)
जीवनात तुझ्यासाठी देवाकडे स्थान आहे. तर मग, तू अजून तेथे का नाही? कारण येथे "भिंती" आहेत ज्या तुला बाहेर ठेवत आहेत. त्या भिंतींपैकी एक हे चुकीचे विचार आहे ज्यांचा परिणाम मानसिक अडथळ्यांमध्ये होतो. चुकीचे विचार असे विचार म्हणून व्याखीत केले आहे की जे तुमच्या जीवनासाठी देवाची इच्छा, योजना आणि उद्देशाशी जुळत नाहीत. व्यक्ति त्यांच्या मुखाने काय बोलतात यापेक्षा ते त्यांच्या हृदयात काय विचार करतात हे अधिक महत्वाचे आहे. आपली मने आपल्या जीवनास घडवितात. आपली वास्तविकता ही आपल्या विचारांची कृती आहे.
फिलेमोन १:१४ मध्ये देवाने म्हटले, "तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही; ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा." तुमच्या मनाचा विचार घेतल्याशिवाय परमेश्वर काहीही करणार नाही. म्हणून, तुमचे विचार काय आहेत?
गणना १३:३१-३३ मध्ये देवाने म्हटले, "पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणांहून बलाढय आहेत. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्राएल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली; ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो ते तेथील रहिवाश्यांना ग्रासून टाकणारा आहे, तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो."
देवाने त्यांच्यासाठी काय तयार केले होते त्याविषयी देवाने लोकांना अगोदरच सांगितले होते. परंतु पुढारी परत आले आणि आश्वासित देशात देवाच्या पुरवठ्याबद्दल त्यांची मने विचार करू शकली नाही. बायबल म्हणते त्यांच्या मनात त्यांना स्वतःला नाकतोड्यासारखे भासले. हे वयस्कर पुरुष होते, परंतु त्यांचे विचार चुकीचे होते. देवाची इच्छा होती की त्यांनी त्याच्या आशीर्वादाबद्दल विचार करावा, परंतु ते त्यास स्वतः पात्र नाहीत असा विचार करीत होते.
किती वेळा देवाने तुम्हांला काहीतरी महान असे दाखविले आहे, परंतु तुमच्या मनाने म्हटले हे कदाचित इतर काहीतरी असेल? "मी अत्यंत संपन्न होऊ शकत नाही? अशा पदासाठी मी पात्र नाही? हे असे काही चुकीचे विचार आहेत जे आपल्या जीवनासाठी आपणांस देवाच्या आशीर्वादापासून वंचित ठेवतात.
रोम १२:२ मध्ये प्रेषित पौलाने असे का लिहिले ते, आपल्याला याचे स्मरण देत की आपण या जगाशी समरूप होऊ नये परंतु आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतरू होऊ दयावे. देवाचे सत्य पाहणे आणि त्याच्या आशीर्वादाचा अनुभव करण्यापासून चुकीचे विचार आपणांस रोखू शकतात. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा शिष्य एकत्र जमले होते, तेव्हा "द्वार बंद असताना" देखील, येशूने त्या खोलीमध्ये प्रवेश केला (योहान २०:१९-३१ पाहा). पुनरुत्थित ख्रिस्तासाठी भिंती ह्या अडथळा नव्हत्या.
ज्या कोणत्याही भिंती-भौतिक किंवा मानसिक-कदाचित तुम्हाला मागे ओढून धरत असतील, तुम्हांला एकाच ठिकाणी सीमित किंवा वेगळे ठेवत असतील. "माझ्या देवाच्या साहाय्याने, मी कोणत्याही तटबंदी पार करू शकतो" असे राजा दाविदाने म्हटले. (२ शमुवेल २२:३०)
गणना १३:३० मध्ये कालेबने म्हटले, "तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ; कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहो." अशी विचारसरणी आपल्याला देखील असली पाहिजे. आपल्याला योग्य विचार असले पाहिजे जे म्हणते की देश ताब्यात घेण्यास आपण समर्थ आहोत. देवाचा आशीर्वाद प्रगट करण्यास आपण अत्यंत सक्षम असे आहोत. आपल्याकडे जबाबदारी आहे की प्रत्येक नकारात्मक कल्पना बाजूला काढून टाकाव्यात. २ करिंथ. १०:५-६, "तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काहीं पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो; आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध आहो."
देवाच्या वचनाने प्रत्येक नकारात्मक विचार काढून टाका. असे होवो की त्याचे वचन तुमच्यामध्ये समृद्धपणे राहो. लोक ज्यांनी आश्वासित देशाबद्दल चुकीचा विचार केला होता त्यांनी त्यात प्रवेश केला नाही. म्हणून असे होवो की तुमचे मन देवाच्या वचनाने भरलेले आणि संरक्षित असावे. जर देव म्हणतो की तुम्ही असे करू शकता, तर तुमच्या मनाला तसाच विचार करू दया, आणि तुम्ही तसेच व्हाल.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, माझ्या जीवनातील तुझ्या चांगुलपणासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की मी नेहमीच योग्यपणे विचार करावा म्हणून तू मला साहाय्य कर. मी माझ्या मनाला तुझ्या वचनाच्या अधीन करतो आणि प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे तुझ्या वचनात आश्वासन दिले आहे त्याप्रमाणे माझे जीवन तुझ्या आशीर्वादाचा आनंद करील. मी आदेश देत आहे की माझे जीवन तुझ्या गौरवाला पूर्ण प्रगट करील. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२● पापाशी संघर्ष
● कृतज्ञतेसाठी एक धडा
● महानतेचे बीज
● मृतामधून प्रथम जन्मलेला
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● पेंटेकॉस्ट चा उद्देश
टिप्पण्या