"मी म्हणालो, तुम्ही देव आहा, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहा." (स्तोत्र. ८२:६)
दुसरा मुख्य अडथळा हा महाकाय लोकांचे वंशज होता, बलाढय पुरुष, ज्यांची उंची आठ फुटापासून तेरा फुटापर्यंत होती (१ शमुवेल १७:४). हे महाकाय पुरुष खरे आणि भीतीदायक होते. जोसेफस, इस्राएली इतिहासकार, याने या महाकाय वंशजांबद्दल लिहिले आहे.
नोहाच्या जलप्रलया अगोदर व नंतर असे महाकाय पुरुष अस्तित्वात होते. नोहाच्या काळात, महाकाय वंशजाने मनुष्यांची कल्पना सतत वाईट अशी केली होती (उत्पत्ति ६:१-५ पाहा). आश्वासित देशातील महाकाय पुरुषांनी भीति उत्पन्न केली कारण त्यांनी कल्पनेवर प्रभाव केला होता, भीति निर्माण केली होती. जेव्हा बारा पैकी दहा वंशजांनी मोशेकडे वृत्तांत आणला, तेव्हा ते सर्व जण सहमत होते की देश हा आशीर्वादित आहे, परंतु दहा पुरुषांनी म्हटले की महाकाय पुरुष इतके बलाढय आहेत की इब्री लोक हे त्यांच्यासमोर टोळासारखे दिसत आहेत. गणना १३:३३ मध्ये बायबल म्हणते, " तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो."
टोळ प्रतिमा ही त्यांच्या मनात झाली –त्यांनी स्वतःला फारच लहान व कमी लेखले. दोन पुरुष, यहोशवा, व कालेबास वेगळाच आत्मा होता (गणना १४:२४), आणि चाळीस वर्षानंतर, कालेब, जो पंच्याऐंशी वर्षाचा होता, त्याने हेब्रोन डोंगरावरून तीन महाकाय वंशजास घालवून दिले होते. यहोशवा १५:१३-१४ मध्ये, बायबल म्हणते, "परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने यहूदाच्या वंशजांबरोबर वतन दिले तेच किर्याथ-अर्बा ऊर्फ हेब्रोन होय; हा अर्बा अनाक्यांचा मूळपुरुष. कालेबाने शेशय, अहिमान, व तलमय ह्या अनाकाच्या तीन वंशजांस तेथून घालवून दिले."
तुम्ही तुमच्या मनात कोणती प्रतिमा बनविली आहे जी तुम्हाला विचार करावयास लावते की तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकणार नाही? तुमच्या प्रगतीमध्ये तुम्ही कोणाचे वृत्तांत वाचले आहेत जे तुमच्यापुढे होऊन गेले आहेत जे तुम्हांला विचार करावयास लावते की तुम्ही असे विक्रम मोडू शकत नाही? काय प्राप्त करावे याची तुम्ही इच्छा केली जे अशक्य असे दिसते? माझ्याकडे तुमच्यासाठी सुवार्ता आहे, ते शक्य आहे. महाकाय पुरुषांची पर्वा न करता, तुम्ही खात्रीने विजयी व्हाल. मी हे खात्रीने जाणतो कारण सर्वात शक्तिमान तुमच्यात राहत आहे. तुम्ही त्रैक्यत्वाचे मूर्तिमंत आहात.
तुमच्याकडे अमर्याद शक्ती व योग्यता आहे की कोणत्याही विरोधावर मात करावी जे तुमच्या विरोधात येते. तुमच्यात आध्यात्मिक तग धरण्याची क्षमता आहे की तुमच्या मार्गावरील महाकाय पुरुषांवर विजय मिळवावा आणि त्यांना नष्ट करावे. परंतु तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला त्याकडे पाहण्याची गरज आहे.
निर्गम ७:१ मध्ये, बायबल मोशे विषयी म्हणते, "त्या समयी परमेश्वराने मोशेला म्हटले, पाहा, तुला मी फारोचा देव करितो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल." हे देव मोशेला दाखवीत होता की तो कोणत्या स्वभावाचा आहे. मोशेने कदाचित स्वतःला अशक्त मेंढपाळ, अपराधी, आणि पळून गेलेला व्यक्ती असे पाहिले असेन. जो एका देशातून पळून गेला आहे तो जीवनात काय बनू शकतो, याहूनही अधिक की ज्या देशात त्यास पकडून आणावे अशी घोषणा केलेली आहे. तरीही, देवाने त्यास म्हटले, " पाहा, तुला मी फारोचा देव करितो."
फारोचे नाव मोशेला भीति देणारे होते. त्या नावाचा उल्लेख केल्यावर तो पळून जात असे व लपत असे कारण त्याला मृत्यूची शिक्षा ठोठावली होती. फारो हा त्या महाकाय वंशजासारखा होता जो मोशेला त्याच्या नशीबामध्ये कार्य करू देत नव्हता. परंतु देवाने म्हटले होते, "तू या डोंगराला पार करू शकतो." तू या महाकाय वंशजांसोबत लढण्यास व त्यांजवर विजय मिळविण्यात सक्षम आहे.
दावीद देखील गल्ल्याथसमोर उभा राहिला होता, जो महाकाय व्यक्तीचे मूर्तिमंत स्वरूप होता आणि त्याच्या तरुणपणापासून योद्धा होता. तरीही त्यास भय वाटले नाही; त्याऐवजी, त्याने देवाचे वचन बोलले, आणि शेवटी त्याने त्या महाकाय व्यक्तीला मारले. मित्रा, तुमच्या मार्गावरील महाकाय व्यक्तींची पर्वा करू नका; देव तुमच्याबरोबर आहे; केवळ पुढे जात राहा. तोच परमेश्वर ज्याने कालेबाला साहाय्य केले की महाकाय व्यक्तींवर विजय मिळवावा आणि त्यांना त्यांच्या देशातून बाहेर घालवून दयावे, तो तुम्हांला समर्थ करील की त्यावर मात करावी.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आज तुझ्या वचनाच्या समज साठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की तू मला शक्तिशाली बनीव की माझ्या मनात योग्य प्रतिमा असावी. आयुष्याच्या प्रगतीमध्ये मी येथूनपुढे बळी ठरणार नाही. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दैवीव्यवस्था-२● विचार करण्यास वेळ घ्या
● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात
● सर्वसामान्य भीती
● तुमच्या आत्म्याची पुनर्स्थापना
● चांगले युद्ध लढ
● कर्जामधून बाहेर या: किल्ली# १
टिप्पण्या