डेली मन्ना
इतरांची सेवा करण्याद्वारे आशीर्वाद जो आम्ही अनुभवितो
Thursday, 2nd of March 2023
30
24
1058
Categories :
सेवा करणे
आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी, आपण सर्व जण आपल्या जीवनाचा उद्देश आणि परिणाम घडविण्याची आकांक्षा बाळगतो. हे आमचे ध्येय व प्रयत्नांमागील प्रेरक शक्ति आहे. आपण प्रगती आणि पुढारपणाच्या पदासाठी प्रयत्न करतो की अर्थपूर्ण योगदान करावे. त्याचप्रमाणे, आपण आपल्या लेकरांना प्रोत्साहन देतो की शिक्षण प्राप्त करावे आणि यशस्वी कारकीर्द बनवावी, ही आशा ठेवून की ते देखील जगावर छाप पडतील.
जरी संपत्ति आणि प्रभाव सकारात्मक मालमत्ता असू शकतात, त्याचवेळी ते बदल निर्माण करण्यात एकमेव उपाय असे नाहीत. ज्या कारणासाठी आपली उत्पत्ति झाली आहे ते जगाची प्रशंसा व प्राप्तीच्याही पलीकडील आहे. येथे आपल्यामध्ये गहन पाचारण आहे, एक जे आपल्याला प्रेरणा देते की आपल्या एकमेव उद्देशाच्या मागे लागावे आणि आपल्या जगाच्या उत्तमतेसाठी योगदान करावे.
"इतरांना महत्व देण्याद्वारे त्यांची सेवा करणे", माझी आई मला, माझ्या भावाला, व बहिणीला हे नेहमी बोलत असे. माझ्या आईची ही शिकवण वर्षानुवर्षे माझ्यासोबत कायम राहिली आहे, जे मला देवाच्या पाचारणात मार्गदर्शन करीत आहे.
१. सेवा करणे आपल्याला आपली आध्यात्मिक वरदाने ओळखण्यास आणि वाढविण्यास साहाय्य करतात.
प्रेषित पौलाने मंडळीला मानवी शरीरासारखे म्हटले आहे, जेथे प्रत्येक सदस्य देवाचा उद्देश पूर्ण करण्यास महत्वाची भूमिका पार पाडत आहे. ज्याप्रमाणे आपल्या भौतिक शरीराला अनेक अवयव आहेत जे योग्यपणे चालण्यासाठी एकत्र कार्य करतात, त्याप्रमाणेच, मंडळी ही विविध कुशलता व योग्यता असलेल्या लोकांद्वारे बनलेली आहे, प्रत्येक जण एकमेव कार्य करतात. (१ करिंथ १२:१२)
१ करिंथ १२ मध्ये, पौल शिकवितो की कोणत्याही एका व्यक्तीला सर्व वरदाने किंवा योग्यता नाहीत की देवाच्या योजनेस पूर्णपणे करण्यास आवश्यक असे आहेत. त्याऐवजी, आपल्याला एकमेकांची गरज आहे, कारण आपले सर्व वैयक्तिक गुण व शक्ति हे एकत्र केले जाऊ शकते की काहीतरी सुंदर व प्रभावशाली असे करावे. जेव्हा आपण इतरांची सेवा करतो, आपण आपल्या एकमेव वरदानांना ओळखू शकतो आणि त्यांना विस्तृत शरीराच्या लाभासाठी विकसित करू शकतो.
२. सेवा करणे आपल्याला चमत्कार अनुभवू देते.
काना येथील विवाहाची कथा, जी योहान २ मध्ये सांगितली आहे, ती एक शक्तिशाली आठवण आहे की इतरांची सेवा करण्याने चमत्कार अनुभविण्याकडे कसे नेले. या कथेमध्ये, येशू व त्याच्या शिष्यांना विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केले होते, जेथे यजमानाच्या घरी द्राक्षारस संपला होता. येशूची आई, मरीया, त्यांना साहाय्य करण्यास त्यास सांगते, आणि सुरुवातीला नकार अनुभविला असताना देखील, तो शेवटी कामकरी लोकांना ते मोठाले रांजण पाण्याने भरण्यास सांगतो.
कामकरी येशूच्या सूचनेचे पालन करतात, आणि जेव्हा ते नंतर पाहुण्यांना पाणी वाटप करतात, तेव्हा ते द्राक्षारसमध्ये परिवर्तीत झालेले असते- दैवी हस्तक्षेपाचे कृत्य ज्याद्वारे पाहुणे आश्चर्य करतात. तरीही, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पाहुणे हे चमत्काराचा लाभ घेणारे होते, हे ते कामकरी होते जे त्या चमत्काराचे प्रथम साक्षीदार होते. हे तेच होते ज्यांनी रांजण भरले होते आणि द्राक्षारस वाटला होता आणि त्यामुळे त्या चमत्कारामध्ये सहकारी होते जो येशूने केला होता. जेव्हा आपण इतरांची सेवा करतो, तेव्हा देवा द्वारे आपल्या स्वतःचा वापर करण्याच्या शक्यता निर्माण करतो की पृथ्वीवर त्याचे उद्देश पूर्ण करावेत.
३. सेवा करणे हे आपल्याला येशू सारखे अधिक बनण्यास साहाय्य करते.
आजच्या समाजात, हे एका व्यक्तीला एखादया विश्वासाद्वारे प्रभावित होणे सामान्य आहे की यशाची किल्ली ही जितके शक्य आहे तितके घ्यावे हे आहे. सामाजिक नियम आणि माध्यमांद्वारे हा दृष्टीकोन अनेकांच्या मनात खोलवर बिंबविला गेला आहे.
परंतु जेव्हा आपण सेवा करतो, तेव्हा सेवा करण्याद्वारे आपण आपले लक्ष्य आपल्यापेक्षा इतरांवर केंद्रित करतो. आणि आपण येशूला इतरांमध्ये पाहतो. "तेव्हा राजा त्यांस उत्तर देईल, मी तुम्हांस खचित सांगतो की, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे." (मत्तय २५:४०)
४. सेवा करणे आपला विश्वास वाढविते.
"जास्तीत जास्त, अर्थ आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे." (इफिस. ३:२०).
जेव्हा आपण आपल्या आरामदायक क्षेत्रातच राहतो, तेव्हा आपल्याला जे अगोदरच माहीत आहे आणि जे आपण करू शकतो तेवढेच आपण आपल्या स्वतःला मर्यादित करतो. परंतु जेव्हा आपण विश्वासात पुढे पाऊल टाकतो आणि नवीन आव्हाहने स्वीकारतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःला नवीन अनुभव व संधीसाठी तयार करतो. या अनुभवांद्वारे, देव नवीन शक्ती प्रगट करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्या विश्वासाला वाढवितो.
आपल्या आरामदायक क्षेत्राच्या बाहेर पहिले पाऊल घेणे भीतीदायक वाटू शकते, परंतु जेव्हा आपण आपल्या जीवनासाठी देवावर व त्याच्या योजनेमध्ये भरवसा ठेवतो, तेव्हा आपल्याला धैर्य येऊ शकते की नवीन गोष्टींसाठी प्रयत्न करावेत आणि नवीन आव्हाहने स्वीकारावीत. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपण नेहमी शक्ती व योग्यता प्राप्त करतो जी आपल्याला होती असे आपणांस कधीही ठाऊक नव्हते, आणि मग आपण इतरांना देखील प्रोत्साहन देऊ शकतो की त्यांच्या आरामदायक क्षेत्रातून बाहेर पाऊल टाकावे. जेव्हा आपण त्याच्या शक्तीमध्ये भरवसा ठेवतो तेव्हा आपण हे पाहू लागतो की देव आपल्याद्वारे काय करू शकतो, तेव्हा जी द्वारे त्याने पूर्वी बंद केली होती त्यातून आपण बळजबरीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो आपल्यासाठी जी नवीन द्वारे उघडत आहे ती पाहू लागतो.
५. सेवा करणे हे तुमच्या आत्म्यासाठी चांगले आहे.
संशोधनाने सातत्याने हे दाखविले आहे की सेवा करणे हे लोक किंवा ज्या संस्थेची सेवा केली जाते त्यांच्यासाठीच केवळ चांगले नाही परंतु ते एका व्यक्तीसाठी देखील लाभदायक असे आहे जे स्वतःहून त्यांचा वेळ व कौशल्य खर्च करतात. असंख्य अध्ययनाने हे दाखविले आहे की स्वतःहून सेवेला समर्पित होणे हे आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव करू शकते.
याशिवाय, सेवा करणे हे आपल्या चिंता करण्यापासून दूर होणे देखील होऊ शकते. जेव्हा आपण इतरांच्या गरजा आणि कल्याणावर केंद्रित असतो, तेव्हा आपल्या स्वतःच्या समस्या किंवा तणावावर आपण फारच कमी लक्ष देण्यासारखे होते. दुसऱ्या शब्दात, सेवा करणे हा स्वतःची काळजी घेण्याचा एक सामर्थ्यशाली प्रकार होऊ शकतो.
हे सर्व लाभ असताना देखील, आपल्यापैकी बरेच जण सेवा न करण्यासाठी आजही बहाणे शोधत आहेत. आपल्याला कदाचित असे वाटेल की आपल्याकडे पुरेसा वेळ नाही, की आपले कौशल्य हे उपयोगी नाही, किंवा आपल्याला हे ठाऊक नाही की कोठून सुरुवात करावी. तथापि, हे बहाणे केवळ तेच-बहाणे आहेत. एक लहान पाऊल उचलणे, आणि सेवा करण्यासाठी मार्ग शोधणे जे आपला उत्साह व रुचीसह एकरूप होते त्याद्वारे, आपण देवाच्या राज्यासाठी सकारात्मक प्रभाव पाडीत असताना सेवा करण्याच्या अनेक लाभांचा अनुभव करू शकतो.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, येशूच्या नावाने, मी आज तुझ्यासमोर कृतज्ञ अंत:करणाने येतो, हे स्वीकारतो की तू मला एकमेव वरदाने व आवेश दिले आहे. मी धैर्य व इच्छुकतेसाठी विनंती करतो की माझ्या आरामदायक क्षेत्रातून बाहेर पडावे आणि या वरदानांचा उपयोग करावी की इतरांची सेवा करावी आणि तुझ्या राज्यास वाढवावे.
पित्या, येशूच्या नावाने, सेवा न करण्यासाठी मी माझे बहाणे कबूल करतो. या बहाण्यांवर मात करण्यासाठी मला साहाय्य कर.
पित्या, जेव्हा मी तुझी व लोकांची सेवा करतो, तेव्हा मला नवीन गोष्टी प्रगट कर. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा विश्वासघात झाला असे अनुभविलेआहे काय?● त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार कसे व्हावे-२
● एक गोष्ट: ख्रिस्तामध्ये खरा खजिना शोधणे
● मोठया संकटात
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- २
● बी बद्दल आश्चर्यकारक सत्य
● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
टिप्पण्या