"मग असे झाले की, तो यरुशलेमेकडे चालला असता शोमरोन व गालील ह्यांमधून गेला; आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटावयास आले." (लूक १७:११-१२)
त्या दहांपैकी एक असण्याची कल्पना करा. पीडा, एकाकीपणा, अस्वीकार आणि भय जे कुष्ठरोगाबरोबर येते त्याची कल्पना करा. ही कल्पना करा, हे जाणून की, मोशेच्या नियमशास्त्रानुसार, त्यांना इतरांपासून दूर राहणे, आणि त्यांचे वस्त्रे फाडणे आणि अशुद्ध, अशुद्ध असे ओरडावयाचे होते. आशाहीनता आणि निराशेची कल्पना करा ज्याने त्यांची हृदये भरलेली होती.
आणि तरीही, या कुष्ठरोग्यांना काहीतरी ठाऊक होते जे आपल्यापैकी अनेक विसरतात; दयेसाठी कशी ओरड करावी हे त्यांस ठाऊक होते. "ते दूर उभे राहून मोठमोठयाने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हांवर दया करा." (लूक १७:१३)
मोठयाने बोलणे हे प्रार्थनेच्या रुपकासारखे आहे. जर तुमची इच्छा असेन की देवाने तुमच्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करावा, तेव्हा मग हे आवश्यक आहे की तुम्ही प्रार्थनेमध्ये मोठयाने बोलावे.
त्यांनी ओळखले की केवळ येशू हाच त्यांची आशा आहे, आणि त्यांनी त्याजकडे दयेसाठी विनंती केली. आणि येशूने काय केले? "त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा.' मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले" (लूक १७:१४). तथापि, "त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठयाने देवाचा महिमा वर्णीत परत आला. आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता." (लूक १७:१५-१६)
कितीतरी लोक आरोग्य आणि सुटका प्राप्त करतात, परंतु फारच थोडे लोक येतात आणि साक्ष देण्याद्वारे देवाला महिमा देतात.
ही कथा आपल्याला कृतज्ञतेबद्दल कितीतरी गोष्टी शिकविते. पहिली, कृतज्ञता ही निवड आहे. आपल्याकडे काय नाही यावर आपण आपले लक्ष देण्याची निवड करू शकतो किंवा आपल्याकडे काय आहे त्यासाठी आभार मानण्याची निवड आपण करू शकतो. एक कुष्ठरोगी जो येशूकडे परत आला त्याने विचारपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याची निवड केली, आणि त्यामुळे तो आशीर्वादित झाला.
दुसरी, कृतज्ञता ही उपासनेचा प्रकार आहे. जेव्हा आपण देवाचे त्याच्या आशीर्वादासाठी आभार मानतो, तेव्हा आपण त्याचा चांगुलपणा, प्रीति आणि त्याच्या दयेला मानतो. आपण त्याचे गौरव करतो आणि ज्या सन्मानास तो पात्र आहे ते त्यास देतो.
शेवटी, कृतज्ञता ही संसर्गजन्य आहे. जेव्हा आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपण इतरांना देखील तसे करण्यास प्रोत्साहन देतो. आपण आनंद व आशेला पसरवितो, आणि मग जे आपल्यासभोवती आहेत त्यांच्यासाठी आपण आशीर्वाद असे होतो.
आपण जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात पुढे वाटचाल करतो, चला आपण ते कुष्ठरोगी आणि दयेसाठी त्यांची ओरड याची आठवण करू. चला आपण त्याची देखील आठवण करू जो माघारी आला की येशूचे आभार मानावे, आणि चला आपण त्याच्या आदर्शाचे अनुकरण करू या. चला आपण कृपाळू होण्याची निवड करू की देवाची उपासना करावी, आणि जेथे कोठे आपण जाऊ तेथे देवाचा आनंद आणि आशा पसरवावी.
प्रार्थना
पित्या, मी आज तुझ्यासमोर कृतज्ञ अंत:करणाने येतो. माझ्याप्रती आणि माझ्या कुटुंबाच्या प्रती तुझ्या दयेसाठी तुझे आभार; ती प्रतिदिवशी नवीन अशी आहे. जेथे कोठे मी जाऊ तेथे मला तुझ्या आशीर्वादाचे माध्यम बनीव. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● बुद्धिमान व्हा● गौरव आणि सामर्थ्याची भाषा-जीभ
● महान पुरुष व स्त्रिया पतन का पावतात - ५
● तो शब्द पाळ
● उपासाचे जीवन-बदलणारे लाभ
● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
● बी बद्दल आश्चर्यकारक सत्य
टिप्पण्या