डेली मन्ना
तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
Tuesday, 14th of March 2023
26
16
957
Categories :
Compromise
" १४ मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत; १५ तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावेस अशी विनंती करतो. १६ जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत." (योहान १७:१४-१६)
ख्रिस्ती म्हणून आपल्याला जगात राहण्यास बोलाविले आहे, पण जगाचे होण्यासाठी बोलाविलेले नाही (योहान १७). आपल्याला आपले शेजारी, आणि शत्रूंना देखील प्रेम करण्यासाठी बोलाविले आहे, परंतु याचा हा अर्थ नाही की आपण आपल्या स्वतःला त्यांच्याबरोबर एकरूप करून घेऊ नये जे आपली मुल्ये आणि विश्वास मानीत नाहीत.
आजच्या जगात, ख्रिस्ती लोकांसाठी अधिकच सामान्य आहे की एखादया व्यक्तीबरोबर किंवा मिळून कार्य करावे जे पवित्र शास्त्राचा आदर करीत नाहीत आणि त्यांच्या विश्वासासाठी त्यांचा छळ देखील करतात. ख्रिस्ती लोकांसाठी हे आव्हानात्मक होऊ शकते, कारण देवाबरोबरचे त्यांचे चालणे आणि आध्यात्मिक पारख करण्यावर ते प्रभाव करू शकते. याचा अर्थ हा होत नाही की आपण आपल्या स्वतःला जगापासून वेगळे करावे, परंतु त्याऐवजी ज्या लोकांच्या संगतीत आपण राहतो त्याविषयी हेतुपूर्वक काळजी घेतली पाहिजे.
तुम्हांला योग्य जे ठाऊक आहे त्यापेक्षा जरा खालच्या पातळीवर जाणे हे तडजोडीमध्ये सामाविलेले असते. बायबल अशा तडजोडीस असे संबोधिते -"लहान कोल्हे द्राक्षमळ्याची नासधूस करतात" (गीतरत्न २:१५). यामुळेच, आपला विश्वासूपणा, विशेषतः लहान गोष्टींबाबत, फारच महत्वाचा आहे.
"ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघडया होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला." (दानीएल ६:१०)
विश्वासूपणा उन्नतिकडे कसा नेतो याबद्दल दानिएलाचे उदाहरण मुख्य रूपाने कार्य करते. मृत्यूच्या धोक्याला तोंड देत असताना देखील, दानिएलाने विश्वासाशी तडजोड करण्याचे नाकारीले. असे करण्याने, त्याने आशिया मधील एक सर्वात शक्तिशाली पुरुष होण्यासाठी मार्ग उघडीला.
एक व्यक्ति जो तडजोड करण्यास नकार देतो हा तो कोणीतरी आहे ज्यावर देव जीवनातील मोठया आणि मोठया संधीसाठी भरवसा ठेवू शकतो. हे महत्वाचे आहे हे लक्षात घेणे की हा केवळ परमेश्वरच नाही जो एखादया व्यक्तीकडे लक्ष देतो. इतर लोक देखील याकडे लक्ष देत असतात, मग ते मालक, सहकारी किंवा गुरुजण असतील.
भटकलेल्या आणि मृतमय जगासाठी तडजोड करणे हे तुमच्या साक्षीला देखील बिघडवू शकते, जसे याकोब ४:४ चेतावणी देते: "जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे." एक ख्रिस्ती म्हणून आपल्याकडे मोठी जबाबदारी आहे जी आपले तारण, आणि सत्याचे ज्ञान, आणि सर्वशक्तिमान परमेश्वराची लेकरे म्हणून आशीर्वादाच्या स्थानासह येते.
ज्यावेळेस आपल्या भोवतालच्या लोकांचा आपण आदर केला पाहिजे, त्याचवेळेस आपण पवित्र शास्त्राची आपली मुल्ये व विश्वास याशी तडजोड नाही केली पाहिजे.
प्रार्थना
प्रेमळ पित्या, तुझ्या वचनात तडजोडीस नाकारण्यासाठी मला कृपा पुरीव, जरी जेव्हा ते कठीण किंवा लोकप्रिय नाही असे दिसत असेन. तुझ्या नेत्रांसमोर मला विश्वसनीय राहण्याची इच्छा आहे. माझ्या जीवनास तुझी प्रीति व सत्याचे प्रतिबिंब असे कर, की या अंधाऱ्या जगामध्ये उज्वलपणे चमकत राहावे. येशूच्या नावाने, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पैसा चरित्राला वाढवितो● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● देवाच्या सान्निध्यासह ओळखीत होणे
● तुमच्या नवीन वाटचालीस प्राप्त करा
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- २
● येशूचे रक्त लावणे
टिप्पण्या