ख्रिस्ती म्हणून, आपल्या सर्वांची इच्छा असते की देवाने ज्या आशीर्वादाचे आश्वासन आपल्याला दिले आहे त्याचा अनुभव करावा. तथापि, सत्य हे आहे की, येथे अनेक वेळेला बालेकिल्ले असतात त्यांना हाताळण्याची गरज असते जेणेकरून त्या आशीर्वादांचा पूर्णपणे आनंद घ्यावा. काही नवीन ख्रिस्ती व्यक्ति हे कदाचित भ्रमनिरास होऊ शकतात जेव्हा ते सतत छळ, आध्यात्मिक युद्धे, आणि त्यांच्या जीवनात समस्यांना तोंड देत राहतात.
ते खडकाळ जमिनीवरील बी प्रमाणे होतात, त्यांना प्रतिनिधित करीत असतात जे संदेश ऐकतात आणि ताबडतोब आनंदाने त्यास ग्रहण करतात. पण कारण की त्यांना खोलवर मुळे नसल्यामुळे, ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात." (मार्क ४:१६-१७). ते काय ओळखत नाहीत ते हे की आशीर्वादा अगोदर येथे नेहमी युद्धे आहेत.
यहोशवा १:३ मध्ये, देवाने इस्राएली लोकांना आश्वासन दिले की "ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे." तथापि हे आश्वासन ते शत्रू राष्ट्र जे त्या देशात राहत होते त्यांना घालवून देण्याची आज्ञा पाळणे आणि त्यांच्या तयारीसाठी सशर्त असे होते. गणना ३३:५५ मध्ये, देवाने इस्राएली लोकांना चेतावणी दिली होती की जर त्यांनी त्या देशातल्या रहिवाशांना त्यांच्या समोरून घालवून न दिल्यास ज्यांना ते तेथे राहू देतील ते त्यांच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि त्यांच्या कुशीला काट्यांसारखे होतील. आणि ते वस्ती करतील त्या देशात त्यांना त्रास देतील."
त्याचप्रमाणे, आपल्या स्वतःच्या जीवनात, येथे नेहमी आध्यात्मिक बालेकिल्ले असतात त्यांना हाताळले पाहिजे जर देवाने आपल्याला दिलेल्या आशीर्वादाचा आपणांस पूर्णपणे अनुभव घ्यावयाचा आहे. बालेकिल्ले हे अनेक प्रकारात येऊ शकतात, जसे सवयी, नकारात्मक विचारांच्या पद्धती, भय किंवा वाईट संबंध देखील. बालेकिल्ले कोणतेही असो, हे महत्वाचे आहे की आपण त्यास ओळखावे, आणि त्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी पाऊले उचलावीत.
२ करिंथ १०:४ आपल्याला सांगते की, "कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत." बालेकिल्ल्याच्या विरोधातील आपल्या युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र हे प्रार्थना व देवाचे वचन आहे. जेव्हा आपण प्रार्थनेत व देवाचे वचन वाचण्यात वेळ घालवितो, तेव्हा आपण आपल्या जीवनात बालेकील्ल्याना ओळखण्यात व त्यांना हाताळण्यास सक्षम होतो. ख्रिस्ती म्हणून, आपण हे ओळखले पाहिजे की आपल्याला शत्रू आहे जो देवाच्या आश्वासनांना आपल्या जीवनात पूर्ण होण्यापासून रोखण्यास पाहतो. या आश्वासनांना पूर्ण होण्यासाठी वाट पाहण्याच्या वेळेदरम्यान, आपण मन खचू देऊ नये. त्याऐवजी, आपण शत्रूच्या योजनेविरुद्ध देवाच्या वचनाच्या सत्यामध्ये बळकट राहण्याद्वारे आध्यात्मिक युद्धामध्ये व्यस्त राहिले पाहिजे. आपण भरवसा ठेवू शकतो की प्रत्येक युद्ध ज्याचा आपण सामना करतो जे शेवटी आशीर्वादाकडे नेईल. प्रेषित पौलाने तीमथ्याला हे बोलत लिहिले, "माझ्या मुला, तीमथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की, तू त्यांच्या द्वारेच सुयुद्ध कर" (१ तीमथ्यी १:१८).
हे महत्वाचे आहे हे स्मरण ठेवणे की आध्यात्मिक युद्ध हे अशक्तपणाचे चिन्ह किंवा विश्वासाचा अभाव नाही. वास्तवात, ते चिन्ह होऊ शकते की आपण आपल्या विश्वासात वाढत व परिपक्व होत आहोत. जेव्हा आपण आपल्या जीवनातील बालेकील्ल्यांवर प्रभुत्व मिळवितो, तेव्हा आपण बलशाली होतो आणि अधिक परिपक्व होतो की त्या आव्हाहनांना हाताळावे जे आपल्या मार्गात येतात.
याकोब १:२-४ मध्ये, आपल्याला प्रोत्साहन दिले आहे जेव्हा आपण नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड देतो तेव्हा आपण आनंदच मानावा. कारण आपल्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू दयावे, ह्यासाठी की, आपण कशातही उणे न होता आपल्याला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. संकटे व युद्धे ज्यांचा सामना आपण करतो त्या द्वारे, आपण वाढू शकतो आणि अधिक ख्रिस्तासारखे होतो.
म्हणून चला आपण निराश होऊ नये जेव्हा आपण आपल्या जीवनात आध्यात्मिक युद्धे व बालेकील्ल्याना तोंड देतो. त्याऐवजी, प्रथम देवावर भरवसा ठेवावा आणि त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठी त्याच्या सामर्थ्यावर विसंबून राहावे. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपण आशिर्वादांचा पूर्णपणे अनुभव करू जे देवाने या आश्वासित देशात आश्वासन दिले आहे.
"मी तुला आज्ञा केली हे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल." (यहोशवा १:९)
प्रार्थना
पित्या, तुझ्या सत्यामध्ये स्थिर उभे राहण्यास आम्हांला साहाय्य कर जेव्हा आम्ही शत्रूच्या योजनेविरुद्ध आध्यात्मिक युद्धामध्ये जातो. तुझ्या सामर्थ्याने आम्हांला समर्थ कर आणि तू आश्वासन दिलेल्या आशीर्वादाकडे आम्हांला ने. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● योग्य व्यक्तीबरोबर संबंध ठेवा● तुमचे खरे मूल्य शोधा
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
● शत्रू गुप्त आहे
● प्रतिभेपेक्षा चारित्र्य
● तुम्ही देवाचे पुढील सोडविणारे होऊ शकता
● चिंता करीत वाट पाहणे
टिप्पण्या