त्याच दिवशी [कोणत्या] संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, "आपण पलीकडे [त्या तलावाच्या] जाऊ या." (मार्क ४:३५)
मुलभूत संदेश हा आहे की प्रभु येशूची तुमच्यासाठी ही इच्छा आहे की तुम्ही प्रगती करावी आणि तुमच्या जीवनात स्वतःला पुढच्या स्तरापर्यंत वाढवावे. त्याच स्थितीत राहणे हे ध्येय नाही; त्याऐवजी वाढ आणि सतत सुधार ही किल्ली आहे. मग तुम्ही व्यवसायिक किंवा वेतन घेणारे व्यक्ति असो. देवाची इच्छा आहे की तुम्ही वरच्या नवीन स्तरावर पोहचावे आणि तुमच्या सामर्थ्यास उघड करावे. देवाबरोबरच्या तुमच्या चालण्यामध्ये, तो तुम्हांला प्रोत्साहन देतो की गहन विचार करावा आणि उंचावर आरूढ व्हावे. आज, पलीकडे जाण्याच्या मार्गाची माहिती घ्या आणि शोध करा की त्या संधीला आत्मसात करावे.
येशूचे शब्द लक्षात घ्या, "चला आपण जाऊ या." त्याचा हा हेतू नाही की तुम्ही या प्रवासावर केवळ एकटेच निघावे परंतु त्याऐवजी त्या मार्गाच्या प्रत्येक पाउलांवर तुमच्यासोबत राहावे. येशू हा लांबून शिक्षण देणारा शिक्षक नाही जो केवळ दुरून निरीक्षण करतो; तर तो कार्यरत राहून तुमच्या जीवनात सहभागी होत, मार्गदर्शन, साहाय्य आणि प्रीति पुरवतो. तो एक कप्तान नाही की त्याच्या सैनिकांना युद्धात जाण्याची आज्ञा देतो, त्याचवेळेस तो बाजूला थांबत आहे. त्याऐवजी, येशू तुमच्या बाजूला आहे, आणि प्रत्येक युद्ध ज्याचा सामना तुम्ही करीत आहात त्यामध्ये तुमच्यासह युद्ध करीत आहे.
त्याचप्रमाणे, जर तुम्ही एखादया कुटुंबाचा हिस्सा आहात जे आव्हाहने किंवा कठीण परिस्थितींचा अनुभव करीत आहे, तेव्हा ही वेळ आहे की एकत्र मिळून कार्य करावे, आणि पलीकडच्या बाजूला जावे.
पुढच्या स्तरावर जाण्याची प्रक्रिया
तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, तो मचव्यात होता [ज्या मचव्यामध्ये तो बसला होता] तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. (मार्क ४:३६)
मार्क ४:३६ या उताऱ्यामध्ये, हे नोंदले आहे की त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर घेतले जेव्हा ते त्यांच्या मचव्यामधून प्रवासाला निघाले. इतर मचवे देखील त्यांच्याबरोबर प्रवासात होते. हे एक महत्वाचे स्मरण देते की, जेणेकरून पलीकडच्या बाजूला प्रगती करावी आणि देवाने जे पाचारण आपल्यावर ठेवले आहे ते पूर्ण करावे, त्यासाठी हे आवश्यक आहे की तुमच्या स्वतःला जमावापासून वेगळे करावे.
देवाचा उद्देश तुमच्यासाठी आत्मसात करणे याचा अर्थ काही निश्चित कार्यक्रम, पार्टी, किंवा उशिरा रात्रीच्या भेटींना सोडून देण्याचा असू शकतो. त्याऐवजी, तुमच्या स्वतःला त्या लोकांच्या संपर्कात ठेवावे ज्यांना देखील तोच दृष्टांत आणि आवेश आहे जो तुमच्या हृदयात आहे. यशस्वीपणे प्रगती करावी आणि येशूच्या मार्गावर चालण्यासाठी, हे कदाचित आवश्यक होईल की काही मित्रांना आणि परिचितांना सोडून दयावे. ही प्रक्रिया आव्हानात्मक आणि यातनामय असू शकते, परंतु तुमची वैयक्तिक वाढ, तुमची कंपनी, किंवा तुमची संस्था पुढच्या स्तरापर्यंत वाढण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल आहे.
कठीण सत्य हे आहे की येशूबरोबर पुढे जावे आणि त्याने जो दृष्टांत तुमच्यात ठेवला आहे त्या दृष्टीकोनात पाऊले टाकण्यासाठी, काही नातेसंबंधांना मागे सोडण्याची गरज लागेल. जर तुम्ही असे करण्यात चुकला, तर ते व्यक्ति तुमच्या प्रगतीला अडथळा करू शकतील किंवा तुम्हांला त्यांच्या स्तरापर्यंत देखील ओढून घेतील. त्यामुळे, तुमच्या नातेसंबंधांमध्ये पारख करणे हे महत्वाचे आहे आणि त्यांना प्राथमिकता देणे जे तुमच्या आध्यात्मिक वाढीला प्रोत्साहन देतात आणि तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेसह समरूप होतात.
आणि जसे काही हे इतके यातनामय एवढे पुरेसे नव्हते, तेव्हा येथे आणखी अधिक आहे. "नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. (मार्क ४:३७)
जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आरामदायक क्षेत्रातून बाहेर पाऊल टाकण्याचा निर्णय करता आणि ज्या ठिकाणी जावे अशी देवाची इच्छा आहे तेथे जाऊ लागता, तेव्हा सहसा तुम्ही मार्गामध्ये वादळांना तोंड द्याल. मी एकदा एका वैमानिकाबरोबर बोलणे केले होते ज्याने गहन समानता सांगितली होती. मी त्यास विचारले होते की व्यवसायिक विमान किती वेगाने जाते, आणि त्याने उत्तर दिले की ते जवळजवळ मैक ०.७५ वेगाने जाते. जेव्हा मी विचारले की ते त्यापेक्षा अधिक वेगाने का जात नाहीत, तेव्हा त्याने स्पष्ट केले की मैक ०.७५ वेगाच्या पलीकडे जाणे हे विमानाला ध्वनि अडथळ्यास मोडण्यापर्यंत नेऊ शकते, जे मग विमानाविरोधात अत्यंत मोठा दबाव निर्माण करू शकते.
त्याने मग कॉन्कॉर्ड विमानाबद्दल वर्णन केले, ज्याची रचना अशी केली आहे की ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जावे. जेव्हा कॉन्कॉर्ड इतक्या वेगापर्यंत पोहचते, तेव्हा ते सॉनीक बूम निर्माण करते- विमानाच्या शॉक लहरींद्वारे एक शक्तिशाली आवाज.
गहन गोष्ट ही आहे: जेव्हा तुम्ही "सामान्य" वेगामध्ये कार्य करत असता, तेव्हा ते जे तुमच्या सभोवती आहेत त्यांच्याबरोबर राहणे सोपे असते. हे जसे काही कावळ्यांसह उडणे आहे, आनंदाची देवाणघेवाण करणे आणि यथास्थिती राखणे. तथापि, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला नवीन उंचावर जाण्यासाठी झेप घेता आणि तुमच्या प्रगतीला गती देता, तेव्हा तुम्ही हे पाहाल की आव्हाहणे उत्पन्न होतात आणि वादळे तयार होतात.
ज्याक्षणी तुम्ही तुमचे स्वप्नाचे घर बांधावे किंवा तुमच्या जीवनशैलीच्या स्तराला उंचावण्याचा निर्णय करता, तेव्हा कदाचित तुम्ही विरोध किंवा अडथळ्यांना सामोरे जाऊ शकता, जसे स्थानिक अधिकारी किंवा शेजाऱ्यांकडून तक्रार देखील. जेव्हा तुम्ही पुढच्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा वाढीसह जी वादळे येणार आहेत त्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहा.
ही संकल्पना जीवनाच्या विविध पैलूंवर लागू होते:
•जेव्हा तुम्हांला अभिषेकामध्ये वाढण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्हांला वादळांचा सामना करावा लागू शकतो.
•जेव्हा तुम्हांला तुमच्या व्यवसायाला वाढविण्याची इच्छा होते, तेव्हा तुम्हांला वादळांशी संघर्ष करावा लागू शकतो.
•जेव्हा तुम्ही तुमची शारीरक तंदुरुस्ती सुधारण्याचे ध्येय ठेवता, तेव्हा बाह्य घटक तुमच्या संकल्नाची चाचणी घेऊ शकतात.
जोपर्यंत तुम्ही जमावाबरोबर उडण्यात समाधानी राहता, आणि बकरीबरोबर चालता, तेव्हा तुम्हांला कधीही महत्वाच्या समस्या किंवा विरोधाचा सामना करावा लागणार नाही. तथापि, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला उन्नत करण्याचा निर्णय करता आणि देवाने जो मार्ग तुमच्यासाठी दाखविला आहे त्यानुसार चालता, तेव्हा वादळे जी वाढ व प्रगतीसह येतात त्यांच्याबरोबर संघर्ष करणे व त्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी सज्ज राहा.
अंगीकार
माझा पुढील स्तर हा तडजोड करण्याजोगा नाही; येशूच्या नावाने अग्निद्वारे मी पुढे वाटचाल करतो. येशूच्या नावाने, माझ्या पुढच्या स्तरा विरोधातील सैतानाच्या प्रत्येक योजनेस मी नष्ट करतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अनिश्चिततेच्या काळात उपासनेचे सामर्थ्य● ख्रिस्ताबरोबर बसलेले
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● सार्वकालिकता मनात ठेवून जगणे
● त्याच्या ध्वनिलहरींच्या कंपनासह लयबद्ध होणे
● योग्य दृष्टीकोन
टिप्पण्या