प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ति ज्यांस मी भेटलो त्यांना उपास विषयी चुकीचे विचार होते. उपास हा सर्वात जास्त गैरसमज करून घेतलेला एक विषय आहे. वास्तविकता ही, येथे अविश्वसनीय लाभ आहेत जे तुम्ही प्राप्त करता जेव्हा तुम्ही देवाच्या वचनानुसार उपास करता.
"उपास जो देवाने निवडलेला आहे" याविषयीचे बारा विशेष लाभ जे यशयाचे पुस्तक अध्याय ५८ मध्ये नोंदले आहे.तथापि,आज, मी योग्य उपासाच्या ५ लाभा कडे पाहणार आहे.
असे करिशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. तेव्हा तूं हाक मारिशील ती परमेश्वर ऐकेल; तूं धावा करिशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. (यशया ५८:८-९)
१. तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल,
प्रकटीकरण तुझ्या जीवनात प्रवाहित होईल. तुम्ही वचनामध्ये त्या गोष्टी पाहू लागाल ज्या तुम्ही पूर्वी कधी पाहिल्या नाही.
२. तुझी जखम लवकर भरेल,
बरे होणे व संपूर्ण स्वस्थता. योग्य उपास तुम्हाला आरोग्य व स्वस्थता आणेल. वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की उपास हा तुमच्या शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकतो.
३. तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल
जेव्हा तुम्ही परमेश्वराबरोबर चालता, तुम्ही एक व्यक्ति म्हणून प्रशंसा प्राप्त कराल जो गोष्टी योग्यरीतीने करतो.
४. परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल.
जेव्हा इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर आले, तेव्हा परमेश्वराने मेघस्तंभ व अग्निस्तंभ चा उपयोग केला की इस्राएली व आक्रमण करणाऱ्या मिसरी लोकांच्या मध्ये भिंत निर्माण केली की इस्राएली लोकांचे रक्षण करावे जेव्हा ते तांबडया समुद्राला पार करीत होते. (निर्गम १४: १९-२०)
तथापि, अमालेकी लोकांनी शेवटच्या टोकावर त्यांच्यावर आक्रमण केले. तुम्ही जेव्हा उपास व प्रार्थना करता, तुम्हाला तुमच्या पाठींब्या विषयी विचार करण्याची गरज नाही. परमेश्वराची उपस्थिती तुमचे रक्षण करील.
५. तेव्हा तूं हाक मारिशील ती परमेश्वर ऐकेल
उपास, प्रभावशाली प्रार्थनेचा हा एक प्रमुख उद्देश आहे. तुमच्या प्रार्थनांना परमेश्वराने जलद उत्तर दयावे असे तुम्हांला पाहिजे काय? उपासाचा विचार करा.
तुमचा उपास तुम्हांला वर-उल्लेखिलेले लाभ देईल. त्यासोबत तुमचे आध्यात्मिक जीवन शक्तिशाली होईल व तुमचे उपास करणे शेकडो जीवनांस स्पर्श करेल. फक्त त्याविषयी विचार करा.
अंगीकार
जसे आपल्यातील बहुतेकांना ठाऊक आहे की आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
१. मी स्वतःला, माझ्या कुटुंबाला, व ते सर्व जे करुणा सदन सेवाकार्याशी जुडलेले आहेत त्यांना येशूच्या रक्ताने आवरण घालतो.
२. मला, माझ्या कुटुंबाला, व ते सर्व जे करुणा सदन सेवाकार्याशी जुडलेले आहेत त्यांच्यावर जी प्रत्येक शक्ती आक्रमण करीत आहे, ती येशूच्या नांवात, देवाच्या अग्निद्वारे नष्ट केली जावो.
३. प्रभु येशू ख्रिस्त, पुनर्स्थापित करणारा, माझी आर्थिक संपन्नता पुनर्स्थापित कर.
४. पित्या, येशूच्या नांवात, असे होवो की आर्थिक नवीन वाटचालीचे तुझे देवदूत, माझ्या जीवनात प्रगट होवो.
५. माझ्या कुटुंबाच्या वंशाकडून आर्थिक बंधने जी माझ्या आर्थिकतेवर परिणाम करीत आहे, ते येशूच्या नांवात तोडले जावो.
६. असे होवो की परराष्ट्रीयांची संपत्ति माझ्याकडे स्थानांतरीत केली जावो, येशूच्या नांवात.
७. मी धन्यवादीत मनुष्य आहे जो देवाचे भय धरतो, जो त्याच्या आज्ञेमध्ये हर्ष करतो. संपत्ति व श्रीमंती ही माझ्या घरात असेन.
८. माझ्या जीवनात शत्रूने पेरलेले प्रत्येक वाईट बीज, ते येशूच्या नांवात अग्निद्वारे उपटून टाकिले जावो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कृपे द्वारे तारण पावलो● शरण जाण्याचे ठिकाण
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नूतनीकरण कसे करावे -१
● तुमची मनोवृत्ती तुमची उंची ठरवते
● परमेश्वर अंत:करण शोधतो
● संकटाच्या काळाकडे पाहणे
● कृपे मध्ये वाढणे
टिप्पण्या